Suraj Jagtap   (©®सूरज रतन जगताप)
152 Followers · 143 Following

संवेदना
Joined 11 June 2018


संवेदना
Joined 11 June 2018
27 JAN 2023 AT 15:19

का असू नये ही अभिलाषा
कळावे न साधी तिला
मौनातली भाषा...!

-


24 JAN 2023 AT 13:28

पुन्हा ती येणार
वारंवार येणार ;

आणि काही बोलण्या आधीच
आपल्या सोबत घेऊन जाणार...!

आठवण

-


11 SEP 2022 AT 12:45

ना वाहे मंद वारा
ना चमके चंद्र तारे ;

तिच्या एका अबोल्याने
मौन झालेत सारे...!

-


5 JUL 2022 AT 10:08

गंधाळुनी दाही दिशा
कवेत घेऊन सारा आसमंत ;

चिंब करून सारी धरती
पाऊस मगच घेई उसंत...!

-


23 JUN 2022 AT 10:04

मानवीय भावनांचे
अव्यक्त स्वरूप
म्हणजे "अश्रू" !

-


21 JUN 2022 AT 11:05

क्षण हे विरहाचे
सोसू कसा एकटा ;

गेली ना रात्र एकही
तिच्या आठवणीत न जागता...!

-


17 JUN 2022 AT 10:57

धुक्याने झाकोळलेली दरी
तिच्या स्वभोवार हिरवीगार झाडी;

गवतावर सावरून बसलेल्या थेंबांना
ढग भेटायला आले खाली...!

-


14 JUN 2022 AT 10:04

पावसा तू दे एक थेंब सुखाचा
जो भिजवेल काळे ढेकळे
आणि सुगंध आणि मातीला
तू दे असा एक थेंब सुखाचा...!

-


9 JUN 2022 AT 19:44

पहिल्या पावसाच्या सरीने
भिजवून मला अंगभर ;

जागवून तिच्या आठवणी
जळत ठेवले रात्रभर...!

-


6 JUN 2022 AT 8:40

फिक्या आहेत साऱ्या अत्तरच्या राशी ;
भिडताच पाऊस थेंब मातीशी...!

-


Fetching Suraj Jagtap Quotes