Shruti Kulkarni   (Shruti)
25 Followers · 2 Following

Joined 18 May 2018


Joined 18 May 2018
14 MAY 2021 AT 17:56

अक्षयतृतीया एक साडेतीन मुहूर्ताचा सण...अक्षय्य म्हणजे अखंड. ..सांधू न शकणारे. ..अक्षय्य पात्र अक्षय्य क्षण. ..अक्षय्य आयुष्य. ..असे या शब्दाचे संबोधन. ..या दिवसापासून सुमुहूर्ताचा मुहूर्त होतो...या दिवसापासून आंब्याचा मुहूर्त होतो. ..या दिवसापासून म्हणे वेद व्यासांनी श्री गणेशाच्या मदतीने महाभारत ग्रंथ लिहीण्याची सुरूवात केली. ..अक्षय्य म्हणजे कधीही ना संपणारे...अविरत. .अखंड. ..
आपल्या उत्तम अविरत प्रयत्नांना अखंड यश लाभो या प्रार्थनेसह. .अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

-


12 MAY 2021 AT 20:32

काल आज आणि उद्या
काळ अव्याहत वाहणारे जल जणू. ...गतःकाळ सोनेरी किंवा अतीव दुःखाचा परंतु गतःकाळ स्मृतीपटलावर सदैव रेंगाळणारा. ..वेळेची वाळू मुठीतून झरझर झरणारी. .पकडीत कधीच न राहणारी...आज ही असाच वेगवान. ..येणारा दिवस एक एक करत मावळत्या सूर्याबरोबर अंधारात विलीन होत चाललेला आणि उगवत्या सूर्याच्या प्रतिक्षेतला उद्या सदैव आशेने प्रकाशमान सा...या साऱ्यात वाहत चाललेले आयुष्य. .दिवसागणीक अनुभवाने प्रगल्भ होत जाणारे..फक्त एकच...गतःकाळातील स्मृतीशलाकांच्या आशिर्वचेसोबत आज चालत राहणारी वाटचाल उद्यात फलद्रूप व्हावी, सर्वांनाच सुखासीनतेचा कवडसा द्यावी हीच प्रार्थना. .हे ईश्वरा सार्‍यांना सुखी ठेव.🙏

-


11 MAY 2021 AT 22:31

कर्म
जगताना वावरताना सार्‍या क्रियांमध्ये जाणिवेचा एक अंश म्हणजे कर्म...अनेक घटनांचा दिवस साक्षीदार असतो. परंतु मानवाच्या मनाच्या दुहेरी अवस्थांमध्ये आपण काय करतो याची सुप्त जाणिव कुठेतरी असते. ज्या क्रियांनी मन विचलित होईल , रास्त वा अयोग्यतेची ग्वाही देईल..तोच खरा न्याय..भले कोणालाही जुमानत नसाल; मनाला डावलू शकत नाही. .देव दैत्य या संकल्पना मान्यतेच्या. .पण कोणी पाहिल्यात? देव एवढा स्वस्त नाही. .परंतु कर्मच माणसातल्या देव किंवा दैत्याला जागं करते...ज्या हातांनी करावे त्यांनीच परतफेड करावी हा नियम आहे. ..उन्मत्त होणाऱ्यांना..गर्व माज बाळगून मनाच्या संकेताला डावलून अयोग्य वागणार्‍यांना कधीच चांगली फळे मिळणार नाहीत याउलट निरपेक्ष भाव ठेवून सत्यतेच्या मार्गावर चालणाऱ्यांना कर्म सुफलता देईल हे सत्य. .,आपणच आपली न्यायदेवता. .अंतर्मनाला विचारा खरा न्याय तेच देईल..भगवान श्रीकृष्णानी कर्माचाच पुरस्कार केलाय..कारण कर्म सत्य आहे. ..

-


10 MAY 2021 AT 2:44

अस्तित्व
आत्मा तरल परंतु अस्तित्व देहरूपी. .जन्माने किंवा कर्माने ज्या ठिकाणी जन्म हेच जीवाचे अस्तित्व. रंग रूप सत्ता पद यापेक्षा अस्तित्व ही संकल्पना निराळी आहे. रंग रूप हा अनुवंशिकतेचा तर सत्ता पद पैसा प्रतिष्ठा हा कर्माचा भाग आहे. फक्त असणं नव्हे तर निर्माण करणं बनणं हे अस्तित्वाचे ध्येय. .कितीतरी असतात परंतु सामान्यातून असामान्याकडे जाणाऱ्या विभूती अस्तित्व बनून राहतात. जगताना आसपासचे भान असणं, स्वार्थी वलयातून बाहेर येणं, दया क्षमा शांती करुणा सर्व प्राणीमात्रांच्या ठायी ठेवून माणूसपण जपणं..काहीतरी उद्दिष्ट प्राप्ती ठेवून ध्येय साधणं...अनेकांत वैशिष्ट्यपूर्ण जगणं...सुकर्माची नांदी ठेवून धन्यतापूर्ण होणं...हेच अस्तित्वाचं गमक...
नुसतं येणं आणि जाणं नोहे
काहीतरी असणं.......हेच अस्तित्व. ......

-


2 NOV 2020 AT 13:07

दिवाळीची शुभेच्छापत्रे..आजकाल सगळं कसं ऑनलाईन..एक क्लिक मारायचा अवकाश की सगळं समोर..पण दिपावलीच्या या शुभपर्वावर आठवतात ती शुभेच्छापत्रे..स्वतः ती तयार करून पाठवायचा आनंद काही औरच..सुंदर सुंदर शुभेच्छापत्रे तयार करून आप्तेष्टांना पाठवावीत..दिव्यांच्या या आनंदोत्सवाचा आनंद आणखी वाढेल...

-


31 OCT 2020 AT 14:24

साध्य, संदर्भ, संभ्रम, संमिश्र सार्‍यांचा कोलाहल विचारात माजतो आणि लिहीतालिहीता काहीवेळा शब्द लोप पावतात....परिस्थिती, वातावरण हे ही लिहीणं विचारांची गती थांबवतात. लिहीणं ओघात प्रवाहात प्रत्येक वेळी येतच असं नाही. ..काही वेळा वेळ अव्याहत वाहतो पण विचार शून्यच राहतात आणि मग एखाद्या शस्त्रहिन योद्ध्यासारखी स्थिती होते. .ही चार्जिग बॅटरी नाही ना!.....ही निसर्गदत्त देणगी किंवा प्रगल्भ विचारांची योग्य मांडणी असावी
अस्खलित शब्दांची गुंफण, योग्य आशय व निवडलेला विषय असेल तर लिहीणं परिणामकारक होतच...

-


31 OCT 2020 AT 12:52

त्यांना ही जीव आहे॰॰॰॰
प्राणी म्हणजे फक्त हेटाळणी....त्यांचे केस लागतात...प्राणी घाण करतात. ..नसती जबाबदारी कोण घेणार? ....त्यांना रोज खायला कोण घालणार? शिसारी वाटते. ...म्हणून प्राणी हा घृणास्पद प्रकार आहे असे समजणार्‍या बहुतांशी लोकांना प्राण्यांना जीव आहे हेच ध्यानात नसते...
मनुष्यप्राण्याला वाचा आहे परंतु प्राण्यांना वाचा नाही म्हणून त्यांना कसही मारायचं आणि ते ओरडले की हसायचं ही विकृती नव्हे का?
प्राण्यांना वाचा नाही आणि बुद्धी ही तेवढी विकसित नाही परंतु अपार माया आहे भावभावना आहेत, वेदना आनंद आहे, भूक तहान आहे, आईपण,बालपण,तारुण्य, वृद्धत्व या जीवनचक्राचा तेही भाग आहेत...त्यांनाही उन्हाच्या झळा जाणवतात...पाऊस लागतो...थंडी वाजते पण ऐषआरामी स्वार्थी जीवन जगणाऱ्या माणसाला फक्त स्वतःच्या पोटाची भ्रांत असते...आपली मुले कुटुंब आणि पैसा या वलयांकित जगाबाहेर यांची नजर दुर्लक्षित असते....
आयुष्य म्हणजे फक्त स्वतःपुरते जगणं खाणं याहीपलीकडे काहीतरी आहे.....१४ लक्ष योनी फिरून मनुष्यदेह मिळतो तो सत्कर्मासाठी. ..
मुक्या जीवांवर दया करा....नाहक मारू तरी नका...त्यांनाही जीव आहे. ...

-


30 OCT 2020 AT 3:55

लढाई. ...मग ती ऐतिहासिक, देवादिकांची,राजेरजवाड्यांची,शस्त्रांची,अध्यात्मवादी, कालियुगिक, शाब्दिक,तात्विक अथवा अन्य काही. ..अंतिम विजय सत्याचा. ..सत्य लख्ख प्रकाशाचे....निर्विवाद. ...विजयाचा निनाद कैक वर्षे अंतरे घणाणत राहतो ...क्षण भरून पावतो आणि मनही....
विजय. ..सत्याचा, अन्यायाविरुद्धच्या प्रतिकाराचा, विरोधाभासाला झुगारून ध्येयवाद साधण्याचा. ..विजयाचा रंग अन् अनुभूती वेगळीच. ..विजय जल्लोष. ..आकाश व्याप्त...अफाट. .अथांग. ..कारण विजय सत्याचा फक्त सत्याचा

-


7 SEP 2020 AT 17:56

स्वतःला शोधताना :
स्वतःला शोधताना खोल खोल जावे
वरवरच्या वल्गनांचे ओझे मुळीच नसावे
कुणी काही म्हणालं तसे नसतो आपण
आपल्यालाच माहिती असतं कसे असतो आपण.
एखाद्या व्यक्तीत्वाचे अनेक कंगोरे असतात
वरवरच्या वल्गनांना म्हणून योग्य मते नसतात
व्यक्तीमत्वातला 'मी ' घडताना दुहेरी स्तर लपलेले
वरवरच्या मुखवट्यांना नसतात अंतरंगाचे रंग लागलेले
'मी' वरून जसा तसा आतून नसतो
'मी' दर्शवितो पण 'मी ' खूप वेगळा असतो
म्हणूनच स्वत्व शोधताना व्यावहारिकतेला किंमत नसावी
अंतर्मन म्हणजेच 'मी' ची खरी ओळख असावी
अनेक मते अनेकांची 'मी' कुठे तसा आहे
स्तुती निंदा वल्गना उपेक्षा याहून 'मी' खूप वेगळा आहे

-


5 SEP 2020 AT 6:07

शिक्षक. ...एक अनुभवसंपन्न समृद्ध ज्ञान. ...ज्ञानदानाचा वसा घेतलेली एक विभूती जिच्या ज्ञानदानाला रितेपण नाही.
चिमुकल्या रोपांना साकारत आकारत जगाशी स्पर्धा करण्याची उमेद देऊन सक्षम करणारे हात या महत्तमतेचेच....
आईवडील जन्मदाते ...आईचे कुटूंबाचे संस्कार घेऊन पाऊले जेव्हा ज्ञानमंदिरात येतात तेंव्हा या मातीच्या गोळ्याला शिक्षणाचे ज्ञानाचे तेज बहाल करणारी व्यक्ती शिक्षकच असते.
आईची ममता आणि वडिलांची कठोर शिस्त या दुहेरी भूमिकेने प्रसंगी समजावून आणि प्रसंगी शासन करून चुकीच्या मार्गावरून जीवनाची यशस्वीता प्राप्त करून देणारा दीपस्तंभ म्हणजे. .शिक्षक.
शिक्षक काय कुणीही होतं हो! नाही. ..शिक्षक कुणीही होऊ शकत नाही. ..ज्यांच्याकडे ज्ञानसाधना अनुभवसंपन्नता, गांभीर्य, उदारता, निरपेक्षता, वाक्चातुर्य ,शब्दसंपदा, सहनशीलता, शिस्तप्रिय आचरण,जाणिवतेचे समाजमन, धैर्य, सक्षमता, निस्सीम कर्तव्य असते ..केवळ तीच व्यक्ती आदरपूर्वक सन्मानाला प्राप्त होते. ...आणि तीच अभिव्यक्ती असते....शिक्षक
आयुष्य घडविणाऱ्या या देवत्वाला त्रिवार वंदन! !!!!!

-


Fetching Shruti Kulkarni Quotes