* बाबासाहेब*
विचारांची आग ते आमच्यात पेटवून गेले,
शिक्षणाचे महत्व ते आम्हाला सांगुन गेले,
लढू आम्हीही त्यांच्याच निती तत्वाने
लढण्यास आमच्या ते बळ देऊन गेले,
✍✍:-सुमित मेश्राम
-
इतरांच्या लेखी भले असो शून्य कुवत आपली
आपल्याला ठाऊक असते काय क्षमता आपली
वृद्धिंगत करावं आपलं शारिरिक मानसिक बळ
सातत्याने पाठपुरावा करत मिळेल अपेक्षित फळ
स्वयंप्रेरणेने कार्यरत राहण्या व्हावं समर्थ
ध्येयवादी वाटचालीने होईल जीवन सार्थ
लोकांच्या टीका टिप्पणीस मानावी संधी
हिमतीनं प्रयत्नांती होईल लक्ष्य प्राप्ती
कोणी का जोखावी ऐपत कुवत आपली
जगण्यास सामर्थ्यवान मनशक्ती आपली
- © श्रीरुप
- Dr. Rupali-
अव्यक्त भावनेची साद सहजच कशी समजते तुला
आयुष्याच्या प्रवासात जगण्याचे बळ देत रहा मला-
या जगी न गुंतून रहाता
तू शोध नव्या पायवाटा
नको थांबू अर्ध्यावरती
जरी रुतला पायी काटा
घे झेप नभात पुन्हा तू
दे बळ तुझ्या पंखांना
उत्तुंग भरारी घेऊन
तू पूर्ण कर स्वप्नांना-
बऱ्याच जणांना
आतुन बारीक
होण्याची 'प्रबळ'
इच्छा असते;
परंतु बाहेरून
'बळ' मिळत नाही.-
तरी फिरे चारचौघात
काळ वेळ समजून
वागायचे न समाजात
परिस्थिती उद्भवली
असता बिकट जगात
संयम, शिस्त, धीर
देईल यश या कार्यात
घर, कुटुंब, समाज
गुंतला आहे परस्परात
चिंता एकदूसऱ्याची
देई खरे बळ लढण्यात-
निराशेच्या गर्तेतही आशेचा एक किरण
जगण्याच बळ देण्यास पुरेसा आहे
अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून मात्र
जिवंतपणीच मरण यातना भोगण आहे
©श्रीरूप
-
आशेच्या उजेडाची एक तिरीप
मी अजूनही ठेवलीये मनात जपून
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अंधाराला
तीच नेटाने सामोरं जाण्याचं बळ देते-