QUOTES ON #पूर

#पूर quotes

Trending | Latest
9 AUG 2019 AT 11:59

पावसाला आल जणू उधाण
जलप्रलयान घातलं थैमान..
गावे शहरे उध्वस्त करुनी
माणसे जनावरे झाली गतप्राण..

पै पै जोडून उभारलेले संसार
क्षणार्धात गेले वाहून..
जिवंतपणीच सगळ्यांना तू रे
गेलास नरक दाखून....

कोल्हापूर सांगली साताराच
कसा रे तुला दिसला
विदर्भ मराठवाड्यावरच मग
तू का असा रुसला...

थांबव आता तरी देवा तू
हा प्रलयाचा हाहाकार
काय मिळणार सांग तुला
करुनी असा अंधकार...

✍️ सारिका आवटे 🚩

-


9 AUG 2019 AT 9:27

निर्दयी झाला का रे देवा तू सांग मला,
सगळ्यांना मारून काय भेटणार आहे रे तुला.. !!

जिथं तुझं ठाण आहे तिथेच हाहाकार माजवला,
गुरे, ढोरे, माणसाना जिवंतपणी "नर्क" दाखवला.. !!

जिकडे नाही तिकडे डोळ्यात पाणी आणतो रे तू,
आणि आमच्याकडे जिवंतपणी मारतो रे तू.. !!

खरंच सांग रे देवा इतका कसा रे निर्दयी तू,
कोल्हापूर,सांगली,सातारा तिथेच का बरसला तू.. !!

जिवंतपणे मृत्यू दाखवून तुला काय भेटणार आहे
होती तुझ्यावर श्रद्धा तेच आता मिटणार आहे.. !!

-


9 AUG 2019 AT 18:00



पूर ...

-


9 AUG 2019 AT 14:39

उन्हाळा असो की पावसाळा
त्रास होतो नेहमी सामान्य माणसाला
श्रीमंती बसली आहे काचेच्या बंगल्यात ती..

कुठे जातात अशा वेळेला ते राजकारणी
मतदान मागायला काढतात जनहित यात्रा
हिरो असो की मग उद्योगपती सर्व बघतात आपआपलं..

शेवटी दोष तरी द्यायचा कोणाला
इथे आपलेच आहेत ज्यांनी केला सृष्टीचा विनाश
फाटले आभाळ अन,कोसळले अश्रु हे खेडेपाडी..

देव तरी कोणी पाहिला
त्याची करावी वाटते फक्त संकटकाळी आराधना
तो तरी किती मदत करेल
राक्षस आपण आहोत म्हणून तर शिक्षा भोगत आहोत..

-


10 AUG 2019 AT 10:32

पूर ओसरल्यावर सारेच
चित्र भयान दिसले,
मानवा सोबतच निसर्गाचे
ही हाल न पाहावले...
मानव स्वार्थासाठी मर्यादा सोडून
निसर्गाला ओरबाडून घेतो,
निसर्गाने मर्यादा सोडली की
सर्वाचेच जगने बेहाल करतो...

-


9 AUG 2019 AT 15:29

पावसा तु आधी प्रेयसीसारखा वागायचास
तु येणार म्हणुन वाट पहायला लावायचास
आता तु बायकोसारख करायला लागलास
नको नको म्हणता नुसता प्रलय आणि पुर

-



करून सारी निसर्गाची शांती भंग
आम्ही आमच्याच सोहळ्यात दंग!

-


24 JUL 2021 AT 20:04

🌹मदतीचा हात🌹
घराला हात त्यांना दिला पाहिजे
मदतीचा हातभार आपणच लावला पाहिजे
दारुण अवस्था त्यांची झाली
पुराने त्यांची दैना केली .
होत्याचे सारे नव्हत्ये झाले
रात्रीच्या रात्रीत छप्पर गेले
जीव त्यांचे गेले ; सारे गेले
आप्त - नातलगांना मुकावे लागले
आपणच त्यांना सावरायला हवे
परिस्थिती बरोबर ..
मनस्थितीलाही त्यांच्या आवरायला हवे .

आपली मदत निसर्गाच्या ह्या प्रकोपात
आपला जीव गमावलेल्या
सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल .

-


9 AUG 2019 AT 12:14


पुर, जलप्रलय काही रोजचाच नोहे
देऊ चला मित्रानों सुदाम्याचे पोहे
वाहते आहे अखंड घराघरातून पाणी
कोसळते आहे वरून देवाची मेहेरबानी??
पाहून चिंध्या संसाराच्या, वाहतोय डोळ्यातून
कसे वेगळे करणार सांगा अश्रू महापुरातून??
करू मदत आपणही थोडी जसे जमेल तसे
विस्कटलेला संसार आपल्या बांधवांचाच असे...

-



काडी काडी वेचून उभारलेला संसार
क्षणात विस्कटून पडला
भक्कम असलेला आधार घराचा
तोही एका धक्यात या जलप्रलयात मोडला

विद्रुप स्वप्न जसं ,तसं
क्षणात सारं होत्याच न्हवत झालं
मी जोडलेलं खूप काही
माझं ते या जलप्रलयात वाहून गेलं

माजलेल्या लोकांनाही निसर्गाने
खरे रूप दाखवले
किंमत नसलेल्यांना
अन्नाचे खरे मूल्य या जलप्रलयात शिकवले

जात पात नगण्य किती असते ती
गरजेला पुढे सरसावतो माणुसधर्म
एकमेकांना साथ देण्यासाठी
शिकवला या जलप्रलयाने खरा सत्कर्म

विध्वंस करत तो
खूप गोष्टी वाहून नेत गेला
मला रिकामं करता करताही माझी
लढण्याची जिद्द मात्र हा जलप्रलय ना नेऊ शकला....




-