✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
गणपती बाप्पा मोरया
तुज नमो....
प्रिय बाप्पा,
तुला निरोप नाही रे द्यावासा वाटत पण तरी तुला आनंदाने तुझ्या घरी निरोप द्यावा तर लागणारच 😊
तसं आपण नेहमीच बोलतो मी जेव्हा एकांतात असते तुझ्याशी माझ हितगुज चालूच असतं.. तुला माझ्या सगळ्या स्वभावाची माहीती आहे... तुझ्याकडून कित्येकदा जाणवलं ही आहे बदल क्रांती बदल आता तरी बदल 😅
पण मी मठ्ठ काय समजत नाही मला.. तुला हो म्हणते आणि नंतर पुन्हा माझे पहिले पाढे पंचावन्न.. 😂
तुला तर माझं खुप हसू येत असेल माहिती आहे मला!!
बाकी जास्त नाही बोलत पण एक सांगते जरी आज मुर्तीरुपी तु निरोप घेत आहेस तरी त्या अदृश्य रुपात कायम सोबत रहा!!
मला पप्पा कायम सांगतात कि तुला देवाचा आशिर्वाद आहे तो कायम संकटांचा सामना करताना असु दे ही विनंती!!
या कोरोनारूपी शक्तीचे समुळ उच्चाटण होऊ दे आणि पुन्हा हि पृथ्वी पहिल्यासारखी फुलू दे!!
बाकी आपण बोलत राहूच😊
- तुझीच क्रांती-
नन्हे कदमों से आगमन तुम्हारा आंगन में होता है बप्पा,
खुशियां तुम अनगिनत साथ लाते हो,
विघ्न और दुःख सारे हर के हमारे,
आंखो को नम किए लौट जाते हो,
प्यारा सा मुख तुम्हारा मन को नई उम्मीदों से भर देता है,
अगले वर्ष इससे भी अधिक जल्दी लौट आना बप्पा,
भूल ना जाना बप्पा,
घर की चौखट भी तुम्हारी प्रतीक्षा बड़ी उम्मीद लगाए करता है ।♥️✨-
दुःख हरून साऱ्यांचे निघाले बाप्पा कैलाशी, निरोप देताना एकच मागणे आहे तुझ्या चरणाशी, सदैव राहा या पामराच्या पाठीशी।।🙏🏻🙏🏻🙏🏻
-
सण हा गणपतीचा उत्सव साऱ्या लोकांचा
अकरा दिवस एकत्र येण्याचा...
नव नवीन आरती नव नवीन संकल्प
पुऱ्या करणाऱ्या गणेश भक्तांचा...
प्रत्येक येणारा भक्त तेव्हा एकच भाषा बोलतो...
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशी हाक आम्ही तुला देतो...
जेव्हा परतीचा प्रवास सुरू होतो तेव्हा मात्र प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकतो...
ढोल ताशांच्या गजरात तल्लीन होऊन प्रत्येक भक्त आनंदाने तुला निरोप देतो...
कारण आम्हला भेटायला तु प्रत्येक वर्षी त्याच आनंदाने तुझी आम्ही आतुरतेने वाट पाहतो...
-
तुझ्या विसर्जनाने झाले सर्व
सुनसान
तरी या हृदयात तुच आहे
विराजमान....-
रीकामी झाली मखर
रीकामे झाले घर
पुढच्या वर्षी परत येण्या
निघाला माझा लंबोदर-
दहा दिवस झाले की,
तुझी जागा रिकामी होते,
तुला निरोप देताना बाप्पा,
ते आभाळही भरून येते...
तू असताना घर,
अगदी आनंदाने भरून जाते,
पण तुझ्या विसर्जनाचे पाणी,
मात्र डोळ्यांत साठते...-
कळत नाहीये!
गणपती बाप्पा कधी आले आणि कधी गेले?
सण झालाच नाही? की साजरा करता आला नाही?
आरती म्हणतानाची विसंगती कुठे गेली?
टाळ, घंटानाद आणि टाळ्यांचे सुरताल झालेच नाही?
स्पर्धांची मज्जा नाही आणि पारितोषिकही नाही?
खेळणी, भोंगे नाही? ना खाऊ गल्ली नाही?
मोठ मोठ्या आरास नाही, रंगीबेरंगी चमचमाट नाही?
कानात बाळी नाही, नाकात नथ नाही?
टिपरू नाही, फेटा नाही, ट्रॅक्टर वरचा पोट्टाही नाही?
गाण्यांची यादी नाही, DJ ची सोय नाही?
चेंगरून टाकणारी दुतर्फा गर्दी नाही?
चेंगरलेल्या देहाने बाप्पाला पाहण्याचे सुख नाही?
रांगोळी, गुलाल बुक्क्यावरून पायदळ नाही?
खांद्यावर पोराला घेऊन बापोस्तव नाही?
लक्ष्मी रोडवर गर्दी नाही, अलका चौकातले दर्दी नाही?
सार्वजनिक गणेशोत्सव आणि विसर्जनाची मिरवणूक झालीच नाही याची खंत वाटावी?
की यंदाचे गणेश विसर्जन कायद्याचे आणि सुरक्षेचे भान ठेवून सगळ्यांनी घरीच साजरा केला याचे कौतुक करावे??
रस्त्यावर गोंगाट नाहीये, ना आवाजाचे डेसिबल नाहीये?
सगळे सुखरूप आणि सुरक्षित आहेत,
तरीही मनातला गोंगाट शांत का होत नाही??
खरचं! काहीच कळत नाहीये.....-
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌺 🙏🏻🙏🏻🙏🏻कविता :- श्री गणेश 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺
साल भर मे एक बार आप आते है,
लाड-दुलार करवाते, हक जताते है,
जल्लोष है आज, खुशीया झूम उठी,
हस रही सादगी जो थी कबसे रुठी,
सजाये भक्ती के पावन पल मन मे,
बहारे गा रही फसाना,मस्त पवन मे,
कला,ज्ञान के देवता परम पूज्य गणेश,
हर विघ्न का निवारण हैं, श्री विघ्नेश,
बरसा पाणी आप के स्वागत के लिये,
उजालो के हम सबने लगाये है दिये,
आँखो को आपका दर्शन जो हो गया,
बस लग रहा है तबसे ये जीवन नया,
मोदक, लड्डू के भोग बनाये, दुर्वा भी चढाये,
आओ सब मिलके आरती करे, उत्साह बधाये,
भावनाये बसी है हमारी,सेवा करणे दो तुम्हारी,
सलोनी सी सुरत , गणेश मुरत पे जिंदगी वारी,
आपका आशिष बना रहे, हम यही कामना करते,
हर पिडा से आप प्रभू हमारा दुःख दर्द हो हरते,
उत्सव ऐसा,माहोल ऐसा,जैसे चाँद से सुंदर धरती,
दिल में आप बसे, इस कविता से मैं गाऊ आपकी आरती |
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
-