AJAY PAZARE   (..Unconquerable Ajay✍️📋)
104 Followers · 668 Following

Joined 18 January 2022


Joined 18 January 2022
YESTERDAY AT 22:46

रोहित

थोडे खट्याळ थोडे वेडे
असे तुझे वागणे आवडे
छान भाऊ तू, मुलगा छान
आहे आम्हा तुझा अभिमान

लहान अजूनही आणि राहणार
तुला पाहिले तुला पाहणार
मुलं मोठी होतात, मोठी माणसे होत नाही
जमते कुणाला एवढे साधे वागणे काही

सेवा करुनी तू दाखविले कर्तव्य
झाला अश्याने तू माणूस दिव्य
नशीब म्हणावे तू आहेस सोबतीला
आणि म्हणूनच मिटविले भितीला

कुठेतरी तो देव पाहत असेल तुझे पुण्य
जीवन तुझे व्हावे सुख समृद्धीने धन्य
एक नाही हजारदा तुझे औक्षण मी घेतो
आशिर्वाद तुला भर-भरून सदा देतो

-


23 APR AT 18:22

कविता :- सुकन्या

गोड गोजिरी परी आली घरी
बरसती हर्षाने सुखाच्या सरी
किती छान तीच आहे हसू
तिच्या स्वागता हृदय घेऊन बसू

स्वप्न साकार झाले, देवी रूप जन्मा आले
मातृत्व महान त्या आईपणाने न्हाले
नाती सजली नव्याने, तिची सोनपाऊले
आनंदी राहा अशीच तू, लाडाची तान्हूले

किलबिल तुझ्या आवाजाची शोभून दिसे
हसरे मुख तुझे करती साऱ्या वेडेपिसे
कवेत ये आज तुझ्यासंगे आमचाही जन्म
जिवापार जपणार तुला अवघ्या आजन्म

गोड पापी तुझी मधापेक्षा गोड आहे
नजर तुला वळून - वळून पाहत राहे
सदा तुझे आयुष्य असावे फुलूनी
तू उमलत राहावी कळीतून खुलूनी

सौख्य लाभो तुजला, आशिष आमचे तुला
घराला घरपण आले नि झुलतो झुला
सुकन्या अशी तिची करावी पूजा जगी
बंध हे नात्यांचे ह्रदयातून ह्रदया बिलगी

-


23 APR AT 15:17

कविता :- माझी ताई
आईचीही आई, माझी ताई
सागराची गहराई, माझी ताई
बाळाची अंगाई, माझी ताई
जन्माची पुण्याई, माझी ताई
सुमनाचा गंध, माझी ताई
हृदयाचा स्पंद, माझी ताई
नात्यांचा बंध, माझी ताई
आवडीचा छंद, माझी ताई
वात्सल्याची छाया, माझी ताई
ममतेची माया, माझी ताई
चंदनाची काया, माझी ताई
स्वर्ग जिच्या पाया, माझी ताई
सुखाची आरास,माझी ताई
श्र्वासाचा श्वास, माझी ताई
साऱ्यातून खास, माझी ताई
शिदोरीचा घास, माझी ताई
सूर्याचं किरण, माझी ताई
दाराच तोरणं, माझी ताई
हास्याच कारण, माझी ताई
दुःखातल स्मरण, माझी ताई
आजीचा प्राण, माझी ताई,
बाबांची शान, माझी ताई,
आईची बाहुली लहान, माझी ताई,
भावंडांचा मान, माझी ताई,
देवाचा आशीर्वाद, माझी ताई,
प्रीतीचा संवाद, माझी ताई,
भक्तीचा नाद, माझी ताई
कर्तव्याची दाद, माझी ताई
शूर मर्दानी, माझी ताई
आई भवानी, माझी ताई
आठवांची निशाणी, माझी ताई
राजाची राणी, माझी ताई
कवितेच पान, माझी ताई
सामर्थ्याची खान, माझी ताई
थोरांसारखी महान, माझी ताई
समृद्धीचे वरदान, माझी ताई









-


22 APR AT 20:47

The boat is made of paper but water is deep



The boat is made of paper but water is deep,
There is a flood of breaths,story of life,
The shore became angry and the waves caused trouble,
Sand houses were destroyed, every trace was erased.

It is wrong to break promises,
The condition of heart is worst than worst,
The world is big have its own court Justice
, would have been defeated, what kind of doom is this?

I saw the moon and stars moving Kept shining on the waves,
I sat on the shore ,What signals are being formed and are being erased?
He is speaking, then why does it seem like a silent scene?

There is a sound, a storm is coming,
whom I understood, the support is not here today,
The winds are strong, the thunder is here,
But before that the tears have flowed from my eyes.

Dreams were true but got trapped in responsibilities,
We also knew this, but laughed happily,
Seeing them feels like committing a crime,
Tell me how many times have you lived in one life?

-


18 APR AT 21:37

ऐसा था कभी
अपने थे सभी
सपने ,लम्हे
खुशियों का जहां
रास्ते में मिली
फिर तारिकिया
पलकों को नमी
नजरों को धुंआ
एक आस बंधी
दिल को है यकीन
एक रोज तो होगी सहर यहां

-


18 APR AT 9:27

आसमा आ गया है,
मेरे बाहों में फिर देखो।

खिलेगा फिर सुहाना कल,
हसेगा खुशियों का आंचल।

जो खो गया उसका गम तो है,
मिलेंगे फिर नये कुछ पल।

मुस्कुराने लगेगी फिरसे,
कसौटी जिंदगी की।

-


13 APR AT 22:29

कविता :- भीमाची पुण्याई

थोरवी अगाध असा महामानव,
केले तू आमचे जीवन पावन
साहेब फक्त एक आम्ही जाणतो,
दैवत अन् मायबाप तुलाच मानतो.
अन्यायाविरुद्ध लढला असा शुर,
न्याय दिला सर्वांना,केला अंधार दूर ,
काट्याच्या जगण्याला केलं सुमन,
देशसेवेत अर्पिले अवघे तनमन.

विदेशी शिकून परतला बॅरिस्टर होऊन,
संविधान भारताला गेला देऊन,
त्यावरी सर्व देश चालतो खरा,
आदराने तुझे नाम येते स्वरा.
तुझ्या विचारात सूर्याचं तेज आहे,
त्यातून जगण्याचं बळ मिळतं राहे,
आई रमाईने झेलले अपार कष्ट,
तुझ्या यशाची ती गुरुकिल्ली स्पष्ट.

भगवान गौतम बुद्ध आम्हा कळाले,
तुझ्यामुळे जीवाला जीवनदान मिळाले,
न्याय दिला, हक्क दिला, दिले सर्व,
बाबा तुझ्या लेकरांना तुझा फार गर्व.
कोटाबुटात माझा साहेब दिसतो सुरेख,
जन्म ही कमी, लिहिले जर आजन्म लेख,
तुझे आशिर्वाद सदैव पाठी असू दे,
आम्हा सर्वांना प्रगतीची वाट दिसू दे.

भीमजयंती म्हणजे पर्व महान,
देशोदेशी होई भीमाचे गुणगान,
क्रांतीसूर्याला कोटी-कोटी प्रणाम माझे,
पूज्य स्वरूप रूप तुझे अंतरी विराजे.










-


13 APR AT 21:22

Poem :- There is sorrow for what was lost

Sometimes hard to hide the sorrow from anyone,
Everyone seems to be minding their own business,
If I tell you then people will say I am crazy,
This one heart gets injured again and again.

Own problems are beyond understanding,
Its a never ending stories,
even if so, what to expect,
Head bowed in shame.

While leaving you took breath,
Like innocent childhood being snatched away,
Now the body is just a lifeless corpse,
I hope you will come to me.

I have lost a lot, don't want to lost you,
Nature wrote, this too had to happen,
there is sorrow for what was lost,
Going through troubles, this is also torture.



-


11 APR AT 0:00

व्यक्ती जातात,आठवणी ठेऊन

मी ओतले सख्या तुझ्यात जिव प्राण,
तु असला की नसायचे स्वतःचे भान,
तुझ्या संगतीत मला मिळायचे सुख,
कळतच नव्हते कशाला म्हणतात दुःख.
रडणे थांबले नाही तू निघुनी गेला कुठे,
अंतरीचे हे मर्म प्रेमाचे, कसे बघ तूटे,
लागले घाव माझ्या मनाला अनेक,
येती जाती जेही तेही देती वेदना अनेक.

वाट पाहत आहे तुझी तू कधीतरी येशील,
बिलगेल तुला मी, अन तू मिठीत घेशील,
उरले फक्त स्वप्न, तेही अर्धे अधुरे सारे,
हा काळजाचा ठोका, ठोकर मला मारे.
भिजले कसे माझे लोचन, तू पुसण्या ये,
सगळे सोडून गेले, माझ्यापाशी बसण्या ये,
जिवंत शरीर मी, माझी आत्मा हरली,
कशी श्वासांनी ही आयुष्याची ओंजळ भरली.

लपविले वारंवार मुखाने, सांगितले वेगळे,
फायदा साधणारे आले जेही सगळे,
हे एकटेपणाचे सावट, उडविते निंदा कशी,
पाण्याविना मासोळी माझी गत अशी.
जे झाले ते अनभिज्ञ होते, नव्हते ठाऊक,
क्षणक्षणाला म्हणतो मना नको होऊ भाऊक,
का होते असे व्यक्ती जातात, आठवणी ठेऊन,
तू जिथे आहेस मलाही तिथे चल ना घेऊन.




-


10 APR AT 18:36

The sky has arrived look again in my arms,
A beautiful tomorrow will bloom again,
The circle of happiness will laugh,
There is sorrow for what was lost,
We will meet again for some new moments,
From that time Life will start smiling again.

-


Fetching AJAY PAZARE Quotes