तू भेटल्यावर वाटतं,
पानांची सळसळ,
वादळी वाऱ्याची वर्दळ,
ओल्या मातीच्या सुगंधाची,
ती मोहक दरवळ..!
सारं काही असं असावं सखे..
चातका चं काय नी माझं काय?
अवकाळीचा माहोल नी तुझ्या प्रितीची बाधा..!
बस इतकंच .. आणखी काय ?
-
आभाळाकडे नजर एकटक
आस एकच..पहिला पाऊस
सुकले डोळे, भेगाळली भुई
नको ना रे इतकी ओढ लावूस....
© संजय स गुरव-
पहिला पाऊस, तुझी साथ..
सुर-ताल सरींचा नाद
तो मातीचा सुगंध, तो धुंद वर्षाव
प्रत्येक थेंबात प्रेमाचा भास.
पहिला पाऊस, तुझी साथ..
चिंब ओल्या गारव्याचा सहवास
ओल्या केसांना कुरवाळणारा
तुझा प्रेमाचा हात.-
पहिल्या पावसात त्या भिजलेल्या,
डोळ्यांची आठवण आली...
त्याची वाट बघता बघता,
पावसाची सर निघून गेली...
गालाला स्पर्श करतं,
आज पुन्हा ती लाट आली...
पहिल्या पावसात भिजलेल्या,
त्या डोळ्यांची आठवण झाली...-
आज आभाळ खूपच भरलेलं
जसं की त्याने मनात खूप काही साठवलेलं,
मग ते गरजलं, गडगडलं
जसं ढगांशी कडाडून भांडलं,
मग न रहावून शेवटी त्याने आक्रोश केला
अश्रूंना मार्ग मोकळा करून दिला,
जमिनीला, शरीराला ओलचिंब करुन टाकलं
त्याच्या मनातलं सगळं पावसाच्या थेंबानीच बोललं,
पाणी वाहून गेलं तरी ओलावा मात्र टिकून होता
मातीच्या सुगंधाने सारा परिसर दरवळतं होता,
अचानक मात्र तो ढगांच्याआड दिसेनासा झाला
थंडगार वार्याची झुळूक; आठवण म्हणून ठेवून गेला..!
-
रखरखत्या उन्हाने सुकून नीरजिव झालेल्या जमिनीवर गारवा देतो तो पहिला पाऊस...
वयाचे भान ठेवता प्रत्येकाला आठविणत रमवतो तो पहिला पाऊस...
-
।।श्री।।
पहिला पाऊस
पहिली आठवण
पहिल्या स्पर्शाची
पहिली साठवण!
पहिला पाऊस
पहिलं भिजणं
आतूरल्या बीजाचं
पहिलं अंकुरणं!
पहिला पाऊस
पहिला मृद्गंध
तृषार्त मृदेशी
पावसाचाअनुबंध!
पहिला पाऊस
पहिलंच प्रेम
धरतीला भिजवणारा
ढगांचा अचूक नेम!!
कृष्णार्पण❤️
-
मी ना कायमच आनंदी असते,
असं वाटतं......
बारा महिने पावसानं यावं,
अन् मी चिंब भिजावं...-
पहिल्या पावसाच्या मातीचा वास
असतो सगळ्यांसाठीच खूप खास
पावसाळ्यात तो ढगांचा कडकडाट
वेगळा असतो गरजणाऱ्या विजांचा थाट...
याच पावसाची शेतकरी पावसाची मनापासून वाट
खुश होतो जेव्हा येते पहिल्या पावसाची लाट
पावसाचे जेव्हा पडतात थेंब
सगळे होतात मस्त चिंब चिंब....
पावसाळा येताच होतो भर उन्हापासून दुरावा
पहिला पाऊस पडताच होतो मनात थंड गारवा
पावसाच्या अगोदर चे ढग थोडे मळलेले दिसतात
पण पावसा नंतर हेच सर्वात स्वच्छ वाटतात...
पाऊस असतो सगळ्यांसाठी सामान्य
पण पावसाळा हा ऋतू आहे खूप लावण्य
पावसामुळे येते आपल्या हाती अन्नधान्य
पाणी आपले जीवन आहे
आता हे सगळ्यांना मान्य!!!-
तो मला खूप आवडतो,
पण त्याला अंगणातूनचं माघारी जावं लागतं...
कधीचं माझ्या जवळ येतचं नाही,
मलाच बाहेर जावून पावसासोबत भिजावं लागतं...-