बस जरासी उलझने हैं,
सुलझाने एक हसी और,
जिंदगी भर के लम्हे लेकर आना ...-
तू भेटल्यावर वाटतं,
पानांची सळसळ,
वादळी वाऱ्याची वर्दळ,
ओल्या मातीच्या सुगंधाची,
ती मोहक दरवळ..!
सारं काही असं असावं सखे..
चातका चं काय नी माझं काय?
अवकाळीचा माहोल नी तुझ्या प्रितीची बाधा..!
बस इतकंच .. आणखी काय ?
-
रोज पाहतो चंद्र डोळ्यात तुझिया,
सांग वेगळी ती कोणती कोजागिरी?
तू हसता असे निखळ निर्मोही सखे,
लखलख चांदण्यांची रोजची रात्र खरी..!
निशिगंधा दरवळते नव्याने पुन्हा पुन्हा,
सुगंधांची एखादीच मिठी बस तुझ्या उरी !-
अव्यक्त जरी, तरी या मनी व्यक्त तू,
दूर अंतरे सखे, परी अगदी नजीक तू..
-
इतुके अंतर कसे आले आपल्यात सखे?
का घेरते अवचित असे तुला नी मला,
दूर दूर वेशीवरचे हे अनाहत असे धुके..-
तू अजूनही आहेस.. ! जशी भेट, ओळख, नातं, सहवास आयुष्यात सुख घेऊन आले ना अगदी तशीच. आपल्यातलं अंतर आधी अपरिचित होतं.. आणि आता ते अकल्पित अन अकलनिय आहे असं वाटणं गैर आहे का गं??
काही नाती काही बंध नकार अन स्वीकाराच्या पलीकडच्या विश्वातले असतात. कधीतरी.. पुन्हा एकदा तुझा मोगरा माझ्या प्राजक्ताच्या जवळ ठेऊन बघ..अशी सुगंधी सोबत आपण अनुभवली आहे.. आठवतं आहे ना? अश्याच ऊन सावल्यांच्या आठवणींचा अदृश्य भार मनाच्या खोल डोहाशी ठेवत जगायचं.. एखाद्या एकांताच्या आठवणीला हळू हळू त्याला वर येऊ द्यायचं.. बस..!
सुख अनुभवलं की सुद्धा सुख आणि आठवलं तरी सुखच ना !!
बघ जमतंय का?
-
दरवळ दरवळ चोहीकडे,
सांग कोणत्या अभ्रफुलांनी,
तुला अवचित असे गाठले...!
-
गंध तुझा भरुनी घ्यावा इतुके नजीक यावे,
मिठी असावी अशी की जणू शिंपले मिटावे-