या बरसणाऱ्या "पावसात " तुझं नी माझं पहिलं
प्रेम खुलावं....
तू "प्रवाह " तर मी "कागदाची नाव " बनून
एकसाथ वहावं....
तू "नभ" तर मी "वीज" बनून आपलं
मिलन व्हावं....
तुझ्या नी माझ्या भेटीचं हे "ऋण" या बरसणाऱ्या पावसाशी कस फेडावं.....
या बरसणाऱ्या "पावसात " तुझं नी माझं पहिलं
प्रेम खुलावं....-
आई आठवणींनी तुझ्या मन माझे सुन्न झाले
तुझ्या प्रेमाची सर मला नेहमी आठवे..
मायेचा घास तू नेहमी भरवायची
आवडीच्या गोष्टी मज ऐकवायची..
दूर असले तरी जवळ असे माझ्या तू
चुकेल तिथे मला सावरलेस तू
तुझी आठवण येताच मी निःशब्द होते
मी कुठे चुकले ते मलाच समजते..
भास,आभास होती सारखे मला
प्रेम तुझे आठवते प्रत्येक क्षणाला...
-शुभदा राजे.-
पहिलं प्रेम
कधी कसे झाले कळलेच नाही
पहिलं प्रेम
नकळत नजरा भिडल्या आणि
मनाच्या आधीच डोळ्यांना उमगलं
खरेच हेच का ते प्रेम?-
लपूनछपून तुला बघण्याची
मजाच वेगळी होती,
एकटक बघत, हरवून जाण्याची
जणू सवयच जडली होती...-
पहिलं प्रेम म्हणजे
स्वतःला हरवत जाणं ,
जसं साखरेच दुधात
हळुवार विरघळत रहाणं
-
इतकं सोपं नसतं...
कुणाच्या प्रेमात पडणं.,
हुरहूर प्रत्येक क्षणाला
अन प्रत्येक क्षणी अवघडंण-
"ती"
पहिल्या नजरेत बघता तिला
ती खूप आवडली मला...
म्हंटल ओळख करावी तिच्याशी
धडपड करावी लागेल जराशी...
ती सुंदर एवढी दिसायची
वर्गातली अर्धी मुलं तिच्यावर मारायची...
शेवटच्या बाकावरून तिला बघायचो
ती वळून बघते का याची वाट पाहायचो...
ती दिसताच माझी चाल वाघासारखी व्हायची
ती पुढे गेल्यावर सगळी मुलं मला चिडवायची...
तेव्हाची मज्जाच काहीतरी वेगळी होती
कशी ही असो पण ती माझं पहिलं प्रेम होती...-
पहिलं प्रेम..
पहिलं प्रेम हे कधीच विसरता
येत नाही..
पहिल्या नजरेनं जुळलेलं हे नातं सहजासहजी
तूटत नाही
ही, भावना च काही निराळी असते
ती प्रत्येकाला जाणवत नाही..
पण; त्यांना जाणवते ती त्यांच्या
मनातून कधीच मिटत नाही
पहिल्या पावसात जैसा ओलसर
मातीचा सुगंध दरवळतो..
तैसाच पहिल्या प्रेमाच्या आशेनं कोणच्याही
मनी एका नवीन भावनेचा प्रकाश उजाळतो
पहिलं प्रेम हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं
पहिलं प्रेम दोन क्षणांचा तात्पुरता आनंद देऊन
आयुष्यभर रडवतं
पहिलं प्रेम च असतं जे माणसाला
वेढं बनवतं..
पहिलं प्रेम हे नेहमी स्वछ आणि निखळ असतं
कारण; पहिलं प्रेम हे आकर्षण नव्हे, तर दोन
आत्मांचं मिळण असतं
पहिलं प्रेम हे खूप काही शिकवतं
पहिल्या भेटीची आठवण कायमस्वरूपी मनी सजवतं..
पहिलं प्रेम हेचं " पहिलं आणि शेवटचं " असतं
कारण; नवीन नजरेनं हे सारं जग दाखवतं
-
या बरसणाऱ्या "पावसात " तुझं नी माझं पहिलं
प्रेम खुलावं....
तू "प्रवाह " तर मी "कागदाची नाव " बनून
एकसाथ वहावं....
तू "नभ" तर मी "वीज" बनून आपलं
मिलन व्हावं....
तुझ्या नी माझ्या भेटीचं हे "ऋण" या बरसणाऱ्या पावसाशी
कस फेडावं.....
या बरसणाऱ्या "पावसात " तुझं नी माझं पहिलं
प्रेम खुलावं....-
मॉर्निंग वॉक
पुन्हा ती आणि मी
आज ती मागे ही नाही मी पुढे ही नाही
पळता-पळता...आम्ही दोघं एकमेकांच्या सरळ रेषेत
ती अगदी माझ्यासमोर समोर अचानक थांबली
माझ्या डोळ्यात ती शांत पाहत नम्रपणे लाजली
मी तिच्या नाजुक डोळ्यात
माझं पहिलं स्वप्न शोधत हरवलो
आज ती घड्याळ्यात मी मोबाईल मध्ये
जाणूनबुजून बघत नव्हतो
तिच्या तोंडातुन शब्द न येता
तिच्या नाजुक डोळ्यातुन मला होकार होता
तिला वाटल हा तर माझा तोच असावा
मला वाटलं ती हिच असावी
मला वाटलचं हा भास नसावा
मला वाटल ती तीच असावी
ते स्वप्न नसावं
ते पहिलं प्रेम असावं
ते पहिलं प्रेम असावं
#ती #मॉर्निंग वॉक #पहिलं प्रेम
-