आपण ज्या गावाला जाणार असतो तिथे आपल्यासाठी आनंदाचे राखुन ठेवलेले क्षण हाक मारत असतात,
आणि
तिथंच दुसरीकडे आपण जे सोडुन जातोय तिथे आपल्या शिवाय साजरे होणारे सण पाठी येण्यास खुणावत असतात.-
या बरसणाऱ्या "पावसात " तुझं नी माझं पहिलं
प्रेम खुलावं....
तू "प्रवाह " तर मी "कागदाची नाव " बनून
एकसाथ वहावं....
तू "नभ" तर मी "वीज" बनून आपलं
मिलन व्हावं....
तुझ्या नी माझ्या भेटीचं हे "ऋण" या बरसणाऱ्या पावसाशी कस फेडावं.....
या बरसणाऱ्या "पावसात " तुझं नी माझं पहिलं
प्रेम खुलावं....-
या बरसणाऱ्या "पावसात " तुझं नी माझं पहिलं
प्रेम खुलावं....
तू "प्रवाह " तर मी "कागदाची नाव " बनून
एकसाथ वहावं....
तू "नभ" तर मी "वीज" बनून आपलं
मिलन व्हावं....
तुझ्या नी माझ्या भेटीचं हे "ऋण" या बरसणाऱ्या पावसाशी
कस फेडावं.....
या बरसणाऱ्या "पावसात " तुझं नी माझं पहिलं
प्रेम खुलावं....-
Ajib sa suffer shuru huwa tha hmara
Na mnjil thi na koi rasta ....😻
Aur nahi koi manjil dhudne ki zidd bs chal pde the apni hi dhun mai.....🥳
Aj ek chotasa rasta mil gyaa tha....✌
Lekin.........
Badnsibi itne thi ki wo sath ka suffer chhuta sa gya tha.....🤗-
Sirf Reshim si gatha thi,
Jra sa khol lete...
Agar Dil mai shikayt thi ,
Jaban se bol dete...-
तू दिसतोस तरी कुठे?
तू दिसतोस तरी कुठे?
तुला पाहिलं वगैरे नाही मीही
पाहवंस ही कधी वाटलंही नाही...
तू जाणवतोस एरव्ही बारामाही;
ऋतुतुन, स्नेहातून, प्रेम, बंधन,
आपुलकीतुन....
कधी वाटलंच,तर तुला शोधता येईल,
तू सरळ आहेस सहज भेटशील...
हल्ली तर तुझीच चर्चा सगळीकडे
कधी रुजनारी कधी नाही
पण मी लक्ष देत नाही....
तू दिसतोस तरी कुठे?
जाणला जातोस तू बाप्पा...
कोणी तुझा पायधुळीचा
मस्तकी लावला टिळा की
तुझी आभाळमाया दाटून येते,
आणि प्रेमाचा वर्षाव करतोस...
दोन फूलं चढवली की,
तू अंतर्बाह्य भरून येतोस...
पण तरी मात्र तू दिसतोस कुठे....?
-
****तुझी-माझी मैत्री ****
तुझी -माझी मैत्री म्हणजे गंध बकुळीचा
सुकेल तसा आणखी वाढतच जाणार ॥
तुझी -माझी मैत्री म्हणजे काया चंदनाची
झिजेल तशी आणखी सुवासिकच होणार||
तुझा -माझा मैत्रीचा स्वाद म्हणजे अमृता सारखा
थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरणार॥
तुझा -माझा मैत्रीच नातं म्हणजे दुधात मिसळलेल्या साखरेसारख
कितीही प्रयत्न केले तरी वेगळ होणं अशक्यच॥
पण सख्या एक च सांगायचे आहे रे .....
मैत्रीचा विश्वास हा मैत्रीचं असते
थोडा तडा गेला तर खाली मात्र फ़क्त राख उरते
खाली फक्त राख उरते.....-
*आठवणी...🤔*
आठवणी असतातच अशा
मनाला हेलकावे देतात,
आंबट-गोड आठवणींत झुरायला लावतात,
बेधुंद करायला लावतात,
आठवणी असतातच अशा।।१।।
आठवणी येतात,
आठवणी जातात,
आठवणी हसवतात,
आठवणी रडवतात,
आठवणी असतातच अशा।।२।।
काही मनात घर करून राहतात,
काही मनातून निघून जातात,
काही मनाला बिलगलेल्या असतात,
तर काही मनातल्या मनातच गुंतलेल्या असतात,
आठवणी असतातच अशा।।३।।
काही चेहऱ्यावर एक निर्मळ हास्य आणतात,
भूतकाळाला प्रेमळ स्पर्श करतात,
अन थोडसं डोळ्यात पाणी देखील आणतात,
आठवणी असतातच अशा।।४।।
या आठवणींना जपून ठेवायचं असतं..
आपल्या मनात अन हृदयाच्या कप्प्यात...-