साडेसाती
आयुष्यात प्रत्येकाच्या वाईट दिवस येतील रे
हो सगळे त्यालाच तर तुझी साडेसाती म्हणतील रे
जिवाभावाचे मैतर पण पाठ दाखवतील रे
तोंडावर गोड आणि मागे षडयंत्र चालतील रे
मग यालाच तर तुझी साडेसाती म्हणतील रे
तुझी चांगली काम पण वाईट दिसतील रे
घरदार नातेवाईक सारे तर्हे तर्हेने बोलतील रे
शेवटी यालाच तर तुझी साडेसाती म्हणतील रे
अस्वस्थ होईल शरीर आजारपण ओढवेल रे
मृत्यूदार दार ठोटावून आयुष्य शल्य होईल रे
तर यालाच तर तुझी साडेसाती म्हणतील रे
मोठा भविष्याचा डोंगर कोसळताना दिसेल रे
आई बाबा एक वेळी अपेक्षाच सोडतील रे
आणि यालाच तर तुझी साडेसाती म्हणतील रे
सगळ्या बाजूने संकट धावत पळत येतील रे
प्रेम पण तुझे काळजाचे शेवटी सोडून जाईल रे
सगळे यालाच तर तुझी साडेसाती म्हणतील रे
काळ आहे संकटाचा तो संपून जाईल रे
खेळ चार दिवसांचा लोक रंग दाखवतील रे
लांब गेलेली ती लोक यालाच साडेसाती म्हणतील रे-
सारे तुझ्याच साठी..
बोलू तरी कुणाला...
सारे.....
मागे अजून मागे..
ओढू तरी कुणाला...
सारे.....
जवळी असून इतक्या..
मिटवू कसे अंतराला...
सारे.....
मग शांतता पत्करली..
हरवून बसलो स्वतःला...
सारे.....
ठरवून मी तो दुरावा..
फरक नाही पडला तुला...
सारे.....
साऱ्यांत साऱ्ह पाह तू..
दिसणार मीच तुजला...
सारे.....
शेवटी..
अन प्रीत ही फुलावी.
जगजीत सुंदर व्हावी..
ही आस आहे मनाला...
सारे.....— % &-
"ती"
Shuu🌈
तुझ्या नजरेत काहीतरी जादू आहे
तुला पाहताच मी तुझा गुलामच बनतो आहे
तुला हसताना पाहून जणू मला जग जिंकल्यासारखं वाटते
तुला सांगतो तुझ्या हृदयाची धडधड स्वप्नातही ऐकू येते
पण तुला तर फक्त माझं डोकं आणि चायनीज भेळ खावीशी वाटते
तुझ्यामुळे पहिलं कधी न पाहिलेल्या त्या स्नॅपच्याट ची सवय लागलीये
झोपतानाही तू सकाळ कॉल करशील या आशेवर झोप काढलीये
पण तू सहज उठून बाय बोलत विरार फास्ट च्या दिशेने धावलीये
अख्या कॉलेजच्या नजरेने शिव्या खात तासन्तास तुझ्यासोबत काढले होते
तुझ्या वेगवेगळ्या विचारांमध्ये पार्ले स्टेशन ला २ तास घालवले होते
पण तुझं तर लक्ष फक्त त्या कॉल वर आणि मॅसेज वरच होते
तुझी सारखी काळजी करण्यातच माहीत नाही खूप आनंद वाटतो मला
तुला हसवल्यावर एखादी कॉम्पिटिशन जिंकल्यासारखं वाटतं मला
पण तुला तर मला नुसते चिमटे काढण्यातच आनंद वाटला
तुझ्या त्या एका स्माईल साठी नको नको ते विनोद करायला मला काही वाटले नाही
माहीत नाही कसा पण तुझ्या सोबत तासन्तास कसा जातो समजलेच नाही
पण तू तर मला दुर्लक्षितच इतकं करतेस प्रत्येक कॉम्प्लेमेंटला उत्तर दिलेस 'काहीही'-
आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या घडामोडी या वर्षात घडल्या
काही चांगल्या तर काही वाईट
वाईट गोष्टी मागे सोडत चांगल्या गोष्टीच्या साहाय्याने आयुष्याचं सोनं करायचंय
-
तुझ्यात काय जादू आहे माहीत नाही
तुला स्वप्नात पाहिलं तर डोळ्यांना बरं वाटतं
आणि प्रत्येक्षात पाहिलं तर हृदयाला बरं वाटतं
-
तो पाऊस☔
त्यादिवशी नेहमीसारखच घरातून बाहेर निघालो
मोबाईल मध्ये बघत फक्त चार पाऊलं चाललो
तितक्यात थेंब थेंब पडू लागला अचानक तो पाऊस
स्वतःलाच म्हणालो इटक्याशा पावसात थोडीच भिजशील नको घाबरुस
चालता चालता कधी भिजल डोकं कळलंच नाही
मनात म्हटंल सर्दी झाली तर उद्या तिला भेटायला जमणार नाही
तिचा चेहरा डोळ्यासमोर येताच मंडपात थांबलो
तो पडतच होता पडतच होता त्याच्याकडे बघत मी तिच्या आठवणीत गुंगलो
थोड्या वेळाने थेंब मंदावले तो थोडा शांत झाला
मी निघालो माझ्या वाटेने की तितक्यात माझ्या ती चा msg आला
तो थांबला नव्हता पूर्णपणे मला वाटलं इटक्याश्या पावसानं माझं काय होणारे
मी अर्ध्या रस्त्यात जाता जाता त्यानं प्रलंयचं केला मनात म्हंटल उगाच घरातून निघालो देवारे
एका झाडाचा आसरा घेऊन त्याच्या आडोशाला थांबलो
तेव्हा खरी झाडाची किंमत कळली तरी अर्धा मुर्धा भिजलो
खिशातला मोबाईल ही भिजत होता त्यात तिचा msg ही येत होता
आयुष्यात पहिल्यादा पावसाला अस हलक्यात घेऊन त्याचा भयंकर असा तांडव पाहिला होता
निमा भिजलोच होतो मग पूर्ण भिजत घराकडच निघालो
रस्त्याने चालत ढगांकडे बघत तोंड उगवून पावसाचे थेंब जिभेवर जणू अमृतासारखे पडत होते
त्या पावसात आयुष्यात पहिल्यांदा मनसोप्त असा भिजलो होतो
त्यादिवशी पूर्ण भिजलेल्या अवसतेत घरी गेलो
माझी आई मला खूप ओरडत होती
आणि ती दरवाज्या जवळची छत्री जणू माझ्यावर फिदी फिदी हसत होती-
महाराष्ट्राचा सैनिक
आपल्या महाराष्ट्रात परप्रांतीयांची घुसखोरी होतेय
पण त्यांना म्हणावं सावध व्हा महाराष्ट्र सैनिक पाहतोय
मराठी माणसाच्या अस्तित्वाचा बाळासाहेबांनी उचलला होता वसा
पण ते गेल्यावर महाराष्ट्र दिसून येत होता जशास तसा
हे बाहेरून आलेले परप्रांतीय राज्य करत होते आपल्यावर
यांच्या नजरेत मराठी माणसाची किंमत होती फक्त मूठभर
ह्यांना आळा घालण्यासाठी एक व्यक्ती उभे राहिले
त्यांच्यामध्ये सगळ्यांनी जणू बाळासाहेब ठाकरे पाहिले
आपल्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष केला स्थापन
या गोष्टीसाठी त्यांचे सदैव ऋणी राहू आपण
महाराष्ट्रातून मराठी माणसाला संपवण्याचे नियोजन होते काहींचे
पण माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जणू भाषणातून दातच घशात घातले त्यांचे
मुंबईत प्रत्येक दुकानाची नाव मराठी भाषेत केली
पासष्टहून अधिक टोलनाके बंद पाडली
मराठी तरुणांना रोजगार मिळवून दिला
नीट च्या परीक्षांचा प्रश्नही सोडवला
चित्रपट गृहांचा दरही कमी केला
रेल्वेच्या परीक्षा मराठीत केल्या
मराठयांच्या सणांचे अडथळे दूर केले
स्थानिकांच्या नोकऱ्यांसाठीही प्रयत्न केले
खरच राजसाहेबांनी खूप नवनिर्माण घडवले
तसेच अनेको कामे बोलून नव्हे तर करून दाखवली
परप्रांतीयांना चांगलीच अद्दल घडवली
आणि भाषणातून दिल्लीची तख्त हलवली
सत्ता नसतानाही मराठीची अस्मिता जपण्यासाठी लढा देतोय
एक संधी तर देवून बघा आमचा राजा किती बदल घडवतोय-
"ती"
आठवणीत राहतील ते काही क्षण
जेव्हा गुंतले होते तुझ्यात माझे मन
त्या पहाटेच्या भेटीतच तू लाजली होतीस
गालावर खळी पडेपर्यंत हसली होतीस
गाडीत बसताच आपण शेजारी बसलेलो
तुला बघताच मी गालातल्यागालात हसलेलो
मग डोळ्यांनी सहज तिच्याकडे पाहिले
तिच्या नजरेशी जणू मिळून मिसळून गेले
नकळत नजरेमुळे प्रेमाचे अंकुर फुलू लागले
हातात हात घेऊन नजरेतूनच बोलू लागले
अलगत तिने माझ्याकडे बघून डावा डोळा फडकवला
पण मला मात्र उत्तरात तिला डोळा मारताच नाही आला
ती हसून म्हणाली, थांब!! मी शिकवते तुला
हो तिनेच... डोळा मारायला शिकवले मला
कान एकत्रित आले earphones च्या साहायाने
त्यातूनही ऐकू येत होते फक्त प्रेमाचेच गाणे
तिला झोप लागताच तिचे डोके माझ्या खांद्यावर होते
त्या गाडीतून जाताना जणू स्वर्गात आहे असे भासत होते
खरच आठवणीत राहिले आहेत ते काही क्षण
तेव्हा डोळ्यांनी जुळली होती आपली मन-
मित्र आहे माझा एक
लिहितो स्वतःचा लेख
त्याला आवडत होती मुलगी
जिला बघून मनात वाजली हलगी
ती होती वरून धवनची दिवानी
त्याला बघून म्हणाली ए.. 'मवाली'
तो होता तसा खूप हुशार
पण तिला आवडत होता तुषार
तो होता तिच्या मागे खूप वेडा
तिच्याही अंगात कमी नव्हता किडा
त्याने एक दिवस prapose केला तिला
हे सगळं तिने सांगितले तिच्या भावाला
तिच्या भावाचे त्याने खाल्ले फटके
तेव्हा त्याला कळलं खूप बसतात चटके
मी पण त्याला काहीच म्हणालो नाही
कारण
अनुभवल्याशिवाय कळत नाही,चावल्याशिवाय गिळत नाही.-
''ती''
पाहता तिच्याकडे गार गार वारा सुटतो
तेव्हा हृदयाला ऊब वाटावी म्हणून मी तिच्याकडे वळतो
तिच्याकडे वळताना माझा अभ्यास मला दिसतो
पण ती दिसतेच इतकी सुंदर,मी सगळं विसरतो
सगळं विसरून फक्त तिचाच विचार मी करतो
पाहता तिच्याकडे...
तिच्याशी बोलण्याची आतुरतेने वाट पाहत होतो
जवळ जाऊन तिच्याशी दोन शब्द बोललो होतो
बोलताना अस वाटत होतं कधी मी हिला जवळ घेतो
पाहता तिच्याकडे...
हळूहळू तिच्या प्रेमाच्या नदीत पोहत होतो
बाहेर यायचा विचारही करत नव्हतो
बाहेर येताच मी थंडीने कुडकुडत होतो
पाहता तिच्याकडे...
मी जणू तिला शेकोटीच समजत होतो
पूर्णपणे तिच्या सहाय्यावर जगत होतो
ती पुढे जाताच तिच्या मागे जात होतो
पाहता तिच्याकडे...
शेवटी ती अग्नी बनून पसरत चालली होती
आणि मी त्यात पूर्णपणे अडकलेलो होतो
मी आगेत समावणारच होतो की इतक्यात कळलं मी स्वप्नात होतो
पाहता तिच्याकडे...
प्रथमच प्रेमाच्या माध्यमातून निसर्गाच्या साहाय्याने
स्वप्नातून लेखणीत उतरलेली कविता....-