किती तरी लोकं म्हणाले हा कवी मेला की कायं
कित्येकांना काय सांगू मनी माझ्या आता भावना उरल्याच नायं..
प्रत्येका ची एक कहाणी असते,
माझी कहाणी ती अपुरीच राहिली
प्रेमा नंतर तिरस्कार ही भावना बाजूला ठेवून
हृदयाने सारी मर्यादा ओलांडली..
पश्चाताप खूप गोष्टींचा आहे
पण आनंद मात्र तिच्या सहवासाने जाणतो
प्रेम सिद्ध करण्याकरता लिहणं आता गरजेचं नाही
कारण हा कवी आपल्या भावना जगाला सांगण्यात
स्वताच्या प्रेमाची हार मानतो..
इतकं झाल्या नंतर कुठल्याच बाबतीत खात्री नव्हती
तरी ह्या कवी ने उमेदीची एक घट़ गाठ मनी बादली
लोकांच्या विचारांच्या र्गदीत तो विस्तरला नाही
त्याने त्याची अवस्था स्वता सावरली..
-
एक संध्याकाळ...
दोन शब्द प्रेमाचे, दोन शब्द रागाचे
बोलणारी व्यक्ती हवी आहे
पूर्ण दिवसभर तिची साथ नको तर
तिच्यासोबत एक सुंदर संध्याकाळ हवी आहे.
प्रेमाच्या आशियानात तुझ्या सहवासाने सकाळ व्हावी
तुझ्या डोळ्यातील दुनियेत हरवून जाऊ आणि माझ्या मना नुसार
सुर्याने मावळ्यांची वेळ विसरावी
आपली भेट ठरवून नको तर प्रत्येक संध्याकाळी
निसर्गाच्या संयोगाने जुळून यावी..
चाहूल तुझ्या रुपाची अंगावर शहारे आणत होती
पक्ष्यांची चिवचिवाट सखोळ होणाऱ्या रात्रीची
ओळख जुळवत होती
वाऱ्याच्या झुळकाने उडणाऱ्या तुझ्या केसांना माझ्या
स्पर्शाची ओळख कळत होती
तुझ्यासोबत एक संध्याकाळ घालवायची होती
पण तू असतानाही तुझ्या जुन्या प्रेमाची कमी भासत होती..
स्वार्थाच्या ह्या युगात आपलं प्रेम आपण जपलं
लाख चुका ह्या दुनियेने मला तुझ्या सांगितल्या
पण त्या काय मला मान्य नाही..
ओढ तुझ्या सौंदर्याची नाही तर तुझ्या सुंदर
मनाची आहे
लोकांची गर्दी नको तर आपल्याला एकांत मिळेल
अशी एक विस्मरणीय संध्याकाळ हवी आहे..-
कुणाची तरी संधी एखाद्याची साधना असू शकते..
कुणाची तरी मदद एखाद्याची गरज भागवू शकते
कुणाची तरी आठवण एखाद्याचा सहवास जागवते..
कुणाचा तरी स्पर्श एखाद्याची अपेक्षा वाढवतो
प्रेमाचा प्रवास हा वाईट असो किंवा चांगला..
प्रत्येक प्रवासी ती आठवण आपल्या मनात जतन
करतो..
-
मी माझ्या आयुष्यात जिंकून हरलो होतो..
"वेळे" नुसार न चालून स्वतात गुंतलो होतो..
किती तरी दिवस गेले पण आज तुझी आठवण
पुन्हा आली
आठवणी सह हुबेहूब तुझी काया माझ्या
मनी बहरली..
आज पुन्हा तुझे विचार घेऊन मी सफरी
वर आलो
तुझ्याशी जुळलेली प्रत्येक आठवण घेऊन
स्वताच्या "ध्येया " विरुद्ध मावळलो..
आज मी पुन्हा माझ्या मनाची समजूत काढू लागलो.
की आता माझा तिच्यावर काहीच हक्क नाही राहिला का.?
पण का तरीही अजून मी आशेच्या आकांक्षेत विरळू लागलो..
जे माझ्या सोबत होत आहे
हीच सर्वांची कहाणी असते का..?
का हिथे मीच आपला हृदय तिच्या सामोरे
हरवू लागलो..
आज पुन्हा मी तिला स्वतःपेक्षा आणि
तिच्या पेक्षा जास्त प्रेम करू लागलो..
-
चारित्र्याची शोध..
मानवाने आपल्या चारित्र्याची शोध
वेळ गेल्या आधी केली पाहिजे..
चारित्रच असतो जो माणसाला घडवतो
योग्य रितीने जिंदगी जगण्याची गरज भागवतो
मी माझ्या चारित्र्याने उमेदीचा स्तंभ उभारतो
आयुष्यातील अडचणीची काया वळणावर आणतो
जीवंतपणी मी माझ्या चारित्र्याशी केलेला बदल
माझ्या मृत्यदेहाच्या लाकडांवर जाळ जाळतो ..
चारित्र्याची बदल गरजे नुसार करू नका
कोणी एका पेक्षा जास्त देत असेल
तर निर्लज्जपणे आपल्या चारित्र्याला विकू नका
ज्या दिवशी माणसाने आपला चारित्र संपवला
त्या दिवशी त्याने त्याची ओळख संपवली
आयुष्य जगत असून ही त्याने त्याच्या
आयुष्यातील भूमिका नाकारली..
आयुष्यात चारित्र हा शिक्षक बनून असतो
चारित्र्याने दिलेलं ज्ञान चारित्रच हिसकावून घेतो..
-
Nakamiyaabi mein bhi utni he mehnat hoti hain..
Jitni ki kamiyaabi ke peeche hoti hain
Bas upar wale ne joh jiske manzar
Me likha hain..
Wahi uski kismat hoti hain-
स्मरण शक्ती तूच माझी
धरण समान मनातील अडलेल्या प्रेमाची व्याख्या तू..
जीवनातील जीव काडून देतो तूला
आयुष्यात मी काही मिळवलं तर त्याची ख्याती तू
मरण आले तरी ते तुझ्या मिठीत यावे
शरण गेले तरी ते तुझ्या स्मृतीत रहावे..
पुनर्जन्म घेऊन आलो तर प्रखर कामना हीच मनी
की ,देवाने मला कायमस्वरूपी तूझे करावे..-
पहिलं प्रेम..
पहिलं प्रेम हे कधीच विसरता
येत नाही..
पहिल्या नजरेनं जुळलेलं हे नातं सहजासहजी
तूटत नाही
ही, भावना च काही निराळी असते
ती प्रत्येकाला जाणवत नाही..
पण; त्यांना जाणवते ती त्यांच्या
मनातून कधीच मिटत नाही
पहिल्या पावसात जैसा ओलसर
मातीचा सुगंध दरवळतो..
तैसाच पहिल्या प्रेमाच्या आशेनं कोणच्याही
मनी एका नवीन भावनेचा प्रकाश उजाळतो
पहिलं प्रेम हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं
पहिलं प्रेम दोन क्षणांचा तात्पुरता आनंद देऊन
आयुष्यभर रडवतं
पहिलं प्रेम च असतं जे माणसाला
वेढं बनवतं..
पहिलं प्रेम हे नेहमी स्वछ आणि निखळ असतं
कारण; पहिलं प्रेम हे आकर्षण नव्हे, तर दोन
आत्मांचं मिळण असतं
पहिलं प्रेम हे खूप काही शिकवतं
पहिल्या भेटीची आठवण कायमस्वरूपी मनी सजवतं..
पहिलं प्रेम हेचं " पहिलं आणि शेवटचं " असतं
कारण; नवीन नजरेनं हे सारं जग दाखवतं
-
कलाकार नेमका काय असतो...?
एक कलाकार च खऱ्या कलेला
पारखू शकतो..
जिंदगीतील वाटचालीला कलात्मक आचरणात
आणू शकतो
लिहीलेले लेख, लिहीलेल्या कविता
यांचे तो मोज मापन करीत नाही..
एक कलाकार च असतो जो त्याच्या कामगिरीला
पैशांच्या मोबदल्यात विकत नाही
एक कलाकार आपल्या लिखणात लिहतो की
प्रेमाला वयाची मर्यादा नसते..
पण तो हे सुद्धा समजवतो की चिमुकल्यांना
सन्मानाची तहान असते
एका कलाकाराची विचारदृष्टी किती व्यापक असते
शिदोरी त्याच्या अनुभवाची त्याच्या व्यकतीमतवेत भासते..
आपल्यातील प्रत्येकात एक कलाकार दडलेला
असतो
फक्त वेळ गेल्या आधी त्याला शोधण्याची
गरज असते
मी माझ्यातील कलाकाराला शोधलं आहे
कलम आणि कागद ह्या हत्यारांच्या सहाय्याने
मी सारे विश्व जिंकले आहे..-