लोकांमध्ये एकमेकांविषयी तक्रारी आहेत आणि असले पाहिजेत, कारण प्रत्येकजण एकसारखा विचार करत नाही. पण नेहमी तक्रारी करत बसु असू नये. त्याने नात्यात दुरावे निर्माण होतात.
-
त्याग केला प्रेमासाठी
वेळ दिला काळजीपोटी
निस्वार्थ सेवा
एकोप्याच्या स्वप्नासाठी
पणाला लावून जीवन
सामोरे केला जग
तरी ताठ होता मान
दिवस बदलली पण
वाटलं नव्हत मुळीच
नजरेआड भलतच काही
गुपित गणित मापक वही
आशाला अंत नाही
भीती नाही खंत नाही
अति,इतिला गती पाही
पूर्ण आहुती पूर्व पूण्याची
नाही प्रश्न स्वकर्मावर
सत्य शाश्वत राहील निरंतर-
मला खरच तुझ्याशिवाय लिहिता येत नाही
आपले विचार शब्दात मांडता येत नाहीत
हाताने लिहिताना शब्दांचे मोजमाप कळते
प्रेम,तक्रार,इ विषयी लिहितांना आपोआपच हात वळते
तुझी आणि माझी जोडी फारच जुनी
मी सदैव असेल तुझी ऋणी
-
जेव्हा मला आपल्या लोकांची साथ हवी होती
तेव्हा ते सोबतीला नव्हते ;पण ही आहे की त्यांचा विश्वास इतका कमजोर होता की तो माझ्या छोट्याशा चुकीने मोडला गेला.......-
आयुष्याच्या ह्या क्षणी ,
तू जवळ असावे....
मनातील किल्मीष सारे,
गळून पडावे...
तुझ्या बेभान मिठीत ,
मी सारे जग विसरावे...
आणि ह्या क्षणी जग
सारे इथच थांबावे.....।
-
प्रत्येक संदेश आनंदाचा असावा
यामध्ये कुणाच्याही भावनांना
ठेच पोहचणारा नसावा
मतभेद असो कितीही पणं
कुणाच्याही मनात द्वेष नसावा
भिर भिर कुणीही मागे येत नाही
कुणाच्या पणं एका क्षणात सर्व
जबाबदाऱ्या पार पडत नसतात
सर्वांनाच क्षणो क्षणी त्रास भोगावाच लागतो
यात काही मानसिकतेत फारसा फरक पडत नाही-
माणसांबद्दलचे अंदाज चुकणे
आणि
सरासर माणुसच चुकणे,
याबद्दल कोणाकडे तक्रार करावी???-
सामान्य माणुस आपण
तक्रारी तर असणारच...
गरजांसमोर चैनीला
बाजुला तर सारणारच...
कोजागिरीच्या दुधासवे
भावांची चर्चा रंगणारच,,,
पण दुधाच्या चवीला
केसर जागी वेलची असणारच...
कारच्या जमान्यात दूचाकी
बायको तक्रार करणारच...
पेट्रोल दरवाढीच्या बहाण्याने
शेवटी बायको पटणारच...
रोजच्या लहानसहान तक्रारींनी
माणुस कदरून जाणारच...
पण सवयीच्या या तक्रारींची
सवय नाही मोडणारच...
-
लहान सहान तक्रार
नेहमीचीच कुरबुर
वाढत्या या वयाचा
वाढत राहतो सूर
दिवसा दिवसाने
चढत जातो पारा
झोप लागत नाही
जरी वाजून गेल्या बारा
तासन तास काटा
हलवत नाही जागा
पाहून स्वतःलाच
स्वतःचा येतो त्रागा
मिनिट मिनिट वेळ
निघता निघत नाही
वाढत्या या वयाच
हाल कुणी बघत नाही
काळ पण येतो जातो
परिक्षा पाहतो दूरून
लहान सहान तक्रार अन्
डोळ्यात येते अंधारून....
-
एखाद्याची तक्रार करता ही आली पाहिजे
आणि स्वतः ची तक्रार स्वीकारता ही आली पाहिजे
ज्याला तक्रारीचे तंत्र आले
त्याला कधीही मानसिक
शारीरिक त्रास होत नाही आणि
आपले आयुष्य आनंदात
सुखात सामिल करता येते-