QUOTES ON #जोडीदार

#जोडीदार quotes

Trending | Latest
27 AUG 2020 AT 16:40

प्रत्येक मुलीला जोडीदार असा हवा असतो👇👇👇......

तो दिसायला चांगला नसला तरीही चालेल
पण तो तिला समजून घेणारा असावा...

तिने काही ही न सांगताच
तिच्या मनातले ओळखणारा
फक्त तिच्या रूपावरच नाही तर
तिच्या स्वभावावर जिवापाड प्रेम करणारा असावा....

तिच्या आई-वडिलांना आपले
आई-वडील समजून त्यांचा रिस्पेक्ट करणारा
कधी कधी जमलं तर
छान छान सरप्राईज देणारा असावा.....🤣

तिला तिच्या प्रत्येक दुःखातून बाहेर काढणारा
तिच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा
तिच्या आनंदात आपला
आनंद मानणारा असावा...

-


28 APR 2021 AT 22:25

भावनेला शब्दांची दिली
जोड तर कविता बनते ।
जीवनाला योग्य जोडीदार भेटला
की, आयुष्य सुंदर भासते ।।

-



जोडीदार कसा असावा...

अबोल आपल्या भावना
क्षणांत समजू शकेल
शब्दरूप त्यांना करून
आपल्याशी बोलेल

पडतानाही अलगदपणे आपल्याला
न बोलताच सावरले
चुकलं आपलं काही तर रागावूनही
थोडं समजून घेत माफ करेल

प्रत्येक म्हणणं मान्य केलं नाहीतर
ऐकून मात्र घेईल
थोडं कधीतरी प्राधान्य
आपल्या मताना पण देईल

जोडीदार असा असावा
जो प्रत्येक क्षणी पाठीशी राहील
आयुष्याच्या कठीण प्रसंगात
शेवटपर्यंत आपली साथ देईल
शेवटपर्यत आपली साथ देईल...


-


10 SEP 2019 AT 9:37

काहीसा असाच.... माझा जोडीदार असावा...🥰
(Pls read the caption)

-



राहू दे साथ तुझी
अशीच जन्मोजन्मीची...
या अथांग सागराप्रमाणे
उन्नतीच आपुल्या प्रेमाची...
तू राहा सोबती असाच
तूच शोभा माझ्या जीवनाची...
तुझ्या सारखा मिळाला जोडीदार
मी सदैवच ऋणी राहीन त्या देवाची...

-


18 MAR 2023 AT 11:59

नातं, नातं काही वेगळंच असतं नाही का
जोडीदाराशी असणार नात जीवनभराचं
नात हे गोडाची घागरच जणू
न पाहिलेले न हाताळलेले
उरी बाळगून स्वप्नांचा बंगला
आजमावतो आहे माझी दुनिया
कसं सांगू कळत नाही
मनी असंख्य प्रश्न वेडे
जोडीदाराला न कळावे अशे

तरीच
मनातील गुंता सोडवायचा कसा
बोलून प्रेम कळतं नसत
वेदना मात्र सारखच आठवतात
आठवण होते खरी तुझी
बोलताना होतात वाद फार
न भूतो न भविष्य त्याला
कळत नाही मला मांडू व्यथा कशी

विश्वास बसला हृदयी
आठवण येते क्षणाक्षणाला
दुसऱ्या साठी नाही पण
तुझ्याच साठी झुरते मनाला
येणारे येत जातील, जाणारे जातील
जोडीदार हा तू माझा राजा

वेळ आहे स्वप्नं पुरतीची
आशा आहे आयुष्यभराची
जग तुला हवं तस
स्वप्नांना मिळू दे आकाश तुझ्या
आशा मनी जपशील तिला
जोडीदार म्हणून आणशील घरा....

-


20 SEP 2021 AT 18:31

तू राहशील सोबत तेंव्हा
तुझ्या मिठीत आयुष्य राहिलं
तू हसत रहावं म्हणून
माझं जगणंही
फक्तं तुझ्याचकरता राहिलं.

-


26 AUG 2021 AT 20:27

अजूनही स्थळं नाकारली जातात
होणारा जोडीदार देखणा नाही म्हणून
किती जण आधी पडताळून पाहतात
स्वभाव किती जुळतात ते पाहून

-



जोडीदार तर मला हवा हजारात नाही तर लाखात एक...
आणि का नाही मिळणार इतके तर मी केलेय मर्यादे बरोबर संस्कारांना जतन...

-


11 OCT 2019 AT 10:49

निभाने कि चाहत दोनों तरफ से हो तो ,
कोई भी रिश्ता कभी खत्म नहीं होता..।

-