तुम्ही कितीही खरेपणाने वागा ,तरी खरेपणाची बाजू कमी लोक घेत असतात, खोटं जे आहे ते कधीही लपत नाही, एक दिवस हे नक्की कळतं आणि त्या लोकांना कळते की आपण खोटं स्वीकारत आले. स्वतः वर विश्वास ठेवून आपला खरेपणा सोडू नये.
-
खोटे पणांचा घरपण नसते.... भटकंती असते
खोटे मनात जगत असते, खरं पण बघत असते
खरेपण श्वास घेत असताना, खोटेपणा उडून जाते
खरेपण अटळ असतो, खोटे पणांचा कोणी नसतो
....Sripad ಕಾವ್ಯಶ್ರೀ
-
खरं बोलल्यामुळे
जर कोणाच्या भावना दुखावत असतील
तर त्या व्यक्तीला मानसशास्त्रज्ञाची जास्त गरज आहे.-
त्याला त्याच्या चुकांवर, खोटारडेपणा वर माज होता..
जळून राख झालं... माझं खरेपण जे निर्दोष होतं...-
मी नेहमी इतरांच्या आनंदात माझा आनंद बघितला...
पण जेव्हा माझ्या आनंदाची वेळ आली तेव्हा सगळ्यांनी आपला खरा चेहरा दाखवला...-
खरेपणा
अर्थ कसा स्वार्थाचा माणसांनी तो लावावा
खोट्या अभिमानाचा काय पुरावा असावा...
अभिमान खोटा कि खरा फरक कसा तो जाणावा
खऱ्या अभिमानाचा चेहरा कशावरून ओळखावा...
नको त्या खोट्या मोठेपणाचा करूस तू कांगावा
असेल खरा तर नको कुणास करू तू सांगावा...
खरेपणाची सर न येई खोट्यास कधीही
मेलो तरी अजरामर राहे खऱ्याची दुनियाही...
-
जगण्याला देवून थोडे वास्तव भान
करुया खरेपणाशी थोडी ओळख...
स्वप्नांची गुलामी तरी किती करावी
होऊ कधी वास्तवाचे ही मालक...-
मी मनातून खरी आहे,
खोटं वागणं मला जमत नाही...
जे नजरेतून साफ उतरलेत,
त्यांच्यात मन आता रमत नाही...-
ज्यांच्या वागण्यात खोटेपणा असतो ती माणसं स्वत:च्या आयुष्यात मोठेपण आणि खरेपण सिद्ध करण्यास असमर्थ राहतात...!
#आज़ाद_परिंदा #मुक्तपक्षी #फिरस्ती
©Ajay Bhujbal
-