आज फिर एक मोहब्बत मुकम्मल सी नजर आई है...
काले धर्म की रात ने उजले मजहब के चाँद का कुबूल किया जो इजहार-ए-इश्क़,
इन दोनों के प्यार की गहराई ही चाँदनी रात कहलाई है...।-
लाजून चूरर झाली.....
रातराणी
सजली नव्याने,
डुलुनी दरवळी सुगंध
जवळ तुझ्या येण्याने।।
शीतल मंद वारा
काटा आनी गारवा,
सूत आकाशी चांदण्यांचे
हेरतो भान एकाकी काजवा।।
जागरण कोजागिरीचे
चंद्रमा नैवैद्य दुधाचा,
आठवी माय हिरकणी
कसा पाजला तिने लेकरास पान्हा।।-
उजेडाची सोबत अंधाराला..
साखर असते दुधाच्या सोबतीला..
नात्यात आपल्या या!
चंद्र कोजागिरीचा असावा साक्षीला..
©समीक्षा भुसारी ✍-
अश्विन पौर्णिमेच्या चंद्राची
शोभा भलतीच न्यारी,
पाहून त्याच्या रुबाबाला
थिजली तारका नगरी सारी.
कलेकलेन वाढत चंद्र
आज पूर्णत्वाला गेला,
उगवला कांचनवर्ण लेऊनी
अन रुपेरी रूपात चमकला.
सौंदर्य त्याचे पाहून साऱ्या
तारका पडल्या त्याच्या प्रेमात,
चंद्राचं मन जिंकण्या जणू
स्पर्धाच लागली साऱ्यात.
चंद्र आपला धुंद होता
वर्षाव अमृताचा करण्यास,
कोजगिरीची रात्र आतुर
चंद्राचं प्रतिबिंब पाहण्यास.
अशी सजली सगळी
रात्र शरदाच्या चंद्राची,
मधाळ दुधाची नशा जणू
भिनली साऱ्या नभाशी.
©स्वप्नमयी.-
एक ख्वाहिश हैं,
साथ बैठें हो हम भी कभी,
किसी उपन्यास के किरदारों की तरह,
शरद पूर्णिमा की रात हो,
भेड़ाघाट धुआंधार से गिरती
नर्मदा जी को देखते रहें,
और इस मनोहर दृश्य में
भूल जाएं हर चिंता,
वहां नहीं होगी
भविष्य की बात कोई,
जीना चाहती हूं मैं
उस पल को,
उसी पल में
हमेशा के लिए
संजोकर रखना हैं जिसे।-
मां लक्ष्मी का आशीर्वाद हमेशा आपके साथ रहें
शरद पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं 🙏🙏-
आटवलेल्या केशरदुधात
चंद्राची प्रतिमा l
माझा चंद्र माझ्यासमोर
मी त्याजकडे पहात उभा ll
© Sanket-
कोजागिरीचा चंद्र आजही
माझ्यावरती रुसतो l
दुधात पाहिल्यावर त्याच्याजागी
मला तुझाच चेहरा दिसतो ll
© Sanket-
कोजागिरीची रात्र अन्
भारलेला चांदवा l
तुझ्या माझ्या प्रेमाला
बासुंदीचा गोडवा ll
© Sanket-
कोजागिरीच्या रात्रीला
येवू नकोस छतावर l
तुला पाहून कुणी व्रत सोडल्यास
दोष यायचा तुझ्यावर ll
© Sanket-