हा आहे मी एकतर्फी प्रेमी..
पण माझ्या एकतर्फी या प्रेमावर ,
फक्त माझाच हक्क राहील..
ती नाही पाहणार मला कदाचित,
पण मी मात्र तिलाच पाहत राहील..
नको मला आयुष्यभर साथ,
पण तिचा "भास" मात्र ,
आयुष्यभर माझ्या सोबत राहील..
मला एकतर्फी प्रेम करायला ती नकोच,
फक्त तिच्या आठवणी पुरेश्या आहेत..
नसेल करत कदाचित ती प्रेम माझ्यावर,
पण तिच्या सुखात माझं सुख आहे..
तिला ही सांगून द्या आयुष्यभर ,
माझं तिच्यावर खूप प्रेम राहणार आहे..
✍️शब्दवैभव
-
वासनांनी भरल्या नजरा देहावर झेलते,
हापापल्या राक्षसांमध्ये मी माझं प्रेम शोधते.
रोज किळसवाणा वाटणारा देह मोगऱ्याफुलांनी सजवते,
सजल्या देहाला अर्पण करत मी माझं प्रेम शोधते.
काही तासांवर विकलेल्या देहाची मी रोज किंमत मोजते,
एकतर्फी प्रेमी मी, मी माझं प्रेम शोधते.
अपवित्र देहाची ओढ असणाऱ्या राक्षसांची तहान मी भागवते,
एकतर्फी प्रेम करून मी पुन्हा पुन्हा स्वतःला हरवते.
पदराआड दडलेल्या दुःखाला पावडर लालीने सजवते,
त्याच दुःखाला समोर मांडून लोकांची मने मी रिझवते.
अश्रूंचा बहर उधळून, मी रोज स्वतःला सजवते,
मीही एक प्रेमी, रोज रोज एकतर्फी प्रेमाने झुरते..
थकलेल्या श्वासातील उसासे,रोज घेतात मनाचे कानोसे.
कानोस्यातूनच मग फुलते एकतर्फी प्रेमाचे गीत नव्याने.
तुमच्या पवित्र आया-बहिणींची इज्जत टिकावी
हीच अपेक्षा रोज असते...
कलंकित देहासोबत अपवित्रतेच्या सांजेला
एकतर्फी प्रेमाचं स्वप्न मी सजवते,
स्वप्न मी सजवते. (आपल्यातील एक वेश्या)-
एकतर्फी प्रेमी..मी तिच्या अंतरीचा
चाहूल ना कधी तिला लागली
तिला पाहण्या उभे विश्व रमते
रूप भासे तिचे जणू सायली
एकतर्फी प्रेमी...मी तिच्या अंगणीचा
तिच्या लाजण्याची गीते गायली
तिला पाहुनी स्तब्द अवघे चराचर
तिला लाख स्वप्ने अशी वाहिली..
एकतर्फी प्रेमी.. मी तिच्या जीवनीचा
तिची साथ मजला जणू सावली
तिला भेटूनी जन्म उभा सार्थ झाला
अशी गोष्ट अर्धी पुन्हा राहिली......
-
प्रेम तिचंही होतं
प्रेम माझंही होतं
पण व्यक्त न केलेल्या
प्रेमाला एकतर्फी
प्रेम कसे म्हणावे ?
-
तिला दूरून पहातो
तिला झुरून पहातो
एकतर्फीच का असेना
तिच्यावर प्रेम करुन पहातो...
सुरेंद्र बाविस्कर...✍✍✍
-
एकतर्फी प्रेमी मी
तीच्या प्रेमाचा भुकेला...
मरतो तिच्यावर जरी तिने
एकदाही न मला पाहीला...
तिच्या मैत्रीणींच्या घोळक्यात
जेव्हा तिचे हास्यतुषार फुलतात...
तेव्हा तिच्या त्या हास्यतुषारांनी
मात्र माझं काळीज भिजवतात...
का आहे तिच्यासाठी इतका मी
वेडा माझे मलाच काही कळेना...
आणि तिला पाहिल्याशिवाय
काही हा जीव माझा राहीना...
आहे तिच्या मध्ये एक अनामिक
ओढ जी मला तिच्या कडे खेचते...
माहिती आहे ती होणार नाही माझी राणी
पण माझे हे एकतर्फी प्रेम कुठे गप्प बसते...
मला माहित आहे माझी जात आहे ती भिन्न...
समाज अमान्य करेल म्हणून वाटते मला खिन्न...
म्हणूनच एकतर्फी प्रेमी मी जगेन असाच
शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तिच्यासाठी...
भले प्रेम नसु दे तिच्या मनात
कणभरही माझ्यासाठी...
-
एकतर्फी प्रेमी मी
शब्द आणि लेखनीचा...
कुणा उमगेल ना कधीही
मंत्र माझ्या या कवितेंचा...-
थोडासा अवघड आहे सखी समजायला
तु प्रेम करायला लागली कि
सोप होईल तुला, मला समजायला-
एकतर्फी प्रेमी मी
प्रेम तिच्यावर करून पाहतो...
भले नसेलही तिला माहित
पण एकदा तिच्यावर मरून पाहतो...-