स्वतःच्या स्वार्थासाठी आजकाल
माणुसकी विकली जात आहे,
आता माणुसूकी पेक्षा जास्त तर
पैशांचीच किंमत आहे .....
एखाद्याने मदत केली तर
त्याचे आभार मानायचे सोडून,
हा भरकटलेला माणूस
दगडामध्ये देव शोधत आहे .......
आयुष्याच्या वळणावर रोज
नवनवीन माणसांचा अनुभव येत आहे
कुणी माणुसकीत स्वतःला पाहणारा तर,
कुणी माणूस आहे हेच विसरलेला दिसत आहे.....
आजकाल माणूसच माणसाचा
खेळ मांडताना दिसत आहे ,
माणुसकीच्या ह्या युद्धात माणूस
स्वतःशीच भांडताना दिसत आहे........
दिवसेनदिवस वाढणारे गुन्हे पाहता,हेच
समजत की माणूस माणुसकी विसरत आहे
पहिले संकटाच्या वेळी धावत येणारा माणूस
आजकाल अंधळ्याच सोंग घेत आहे............
✍️ सुमीत्रा इबितदार ✍️
-
कधी कधी असे प्रश्न पडतात आपल्याला
की,ज्याच उत्तर शोधूनही मिळत नाही.
कधी कधी आयुष्य येवढ उदास वाटत
की, त्यातून हसून बाहेर पडन जमत नाही.
कधी कधी विचलित झालेल्या ह्या मनाला
कामात व्यस्त असूनही स्थिरता भेटत नाही.
कधी कधी स्वतःचाच येवढा राग येतो
की,आपल आपल्याशीच पटत नाही.
कधी कधी डोळ्यातून असेही आश्रू ओघळतात
की,त्याचे कारण देण हे आपल्याला जमत नाही.
कधी कधी असेही प्रश्न पडतात आपल्याला
की,ज्याच उत्तर शोधूनही मिळत नाही.
-
शून्य होणं खूप भाग्याची गोष्ट आहे
आताच कशाला मान टाकतोस...
शून्यच मोठ्यांची किंमत वाढवतो
हे कशाला विसरतोस...-
एक संगम,
तुझ्या माझ्या मनाचा आज होऊन जाऊदे,
मी तुला आणि तू मला जरा जवळुन पाहूदे...
एकाच छत्रीतून चालणं,
ते थेंबांमधून भिजणं आता रोजचंच होउदे,
तू पाऊस आणि मला अवखळ वारा बनुनी वाहूदे...
ते शब्दांत हरवणं,
तुझ्या डोळ्यांत मला पाहणं आता नेहमीच घडू दे,
तुझ्या माझ्या मैत्रीला एक नव्या प्रेमळ नात्याचा साज चढू दे...-
स्वयंसिद्ध हो...!
ध्येयप्राप्तीसाठी धडपड करणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे !
-
वेळ निघून गेली कि विचार करतो, पण आपण ती वेळ येण्याआधी त्या गोष्टीचा विचार करत नाही. इथेच आपण चुकतो.
"वेळ आणि संधी एकदाच येते"-
साथ तुझी मागितली नाही
म्हणून माझं प्रेम.. प्रेम नाही..!!!
आयुष्यभर नजरेत साठवलं
हा काही माझा गुन्हा नाही......
क्षणोक्षण सोबत होती
म्हणून जवळ येणं जमलंच नाही,
स्वप्नांतल्या घरी माझ्या
तू येणं काही टाळलं नाही....
आठवण तुला आली नाही
म्हणून मी काही विसरलो नाही,
पाऊस बनून थेंबांमधून
तुझी भेट घेणं सोडलं नाही....-
😢भाव पूर्ण श्रद्धांजली 😢
अनाकलनीय गूढ तुझे रहष्य सारेच सत्य कथा
दिसत नाहीस देवा तरी कर्म म्हणून देतोस व्यथा
तुझ्या अस्त्वित्वापुढे खरच पाला पाचोळा रे आम्ही
कोणाला प्रचंड समाधान नी कोणाच्या पदरी विवशता
कितीएक म्हातारे खिळले रे अंथरुणाला वाट बघत
दांभ्यातील कणीस खुडतोस नी दोष मात्र मज माथा
का आवडतो डाव असा रंगलेला उधळायला रे तुला
किती जगणं शिल्लक अजून यमाने तर लिहिली गाथा
नशीब म्हणून बिचारे लोक पामर शुल्लक तू ठरविले
क्षणात गात्र गात्र गोठवून तू मारल्यास नशिबाला लाथा
काल तर लीप वर्ष होते आठवणी पण अशा पेरव्यास
वर्ष श्राद्ध ही लेकाचे करताना काळ ही जाईल संथा
01.03.2020.😔✍️सौ.कल्पना रमेश हलगे वानरे-