कितीशा गोष्टींची पुन्हा
नव्याने उजळणी झाली...
कितीशा चेहऱ्यांवरचे मुखवटे
गळून पडले होते.....-
उन्हे अंदाजा भी नहीं
की कोई उनके लिए बरबाद हो गया..
खैर अब जाने भी दो,
वो अपनी "जिंदगी" मे मशगुल रहे होंगे...-
सुख वाटताना कुणी
शिल्लक दुरचाही ठेवला नाही...
तरीही दुःख हलकं करायला
मला कुणी माझा मिळाला नाही...-
सोबतीच्या आणा-भाका
सोबतीपर्यंतच ठेवल्या तिने..
चार दिवस दूर गेला तो
अन साऱ्या, शपथा मोडल्या तिने...-
माझं ताट रिकामं असलं तरी
तिचं ताट भरलेलं असुदे...
मी तर नुसत्या सुगंधामध्येही खूश राहीन
पण तिला फुलांचे बगीचे मिळूदे...-
पाखरांचा थवा उडता उडता
मध्येच गिरकी घ्यायचा...
आयुष्य म्हटलं की थोडासा
गलका हा व्हायचा....!-
पायाला ठेच लागली
की थोडंस थांबावं....
जखमेलाही तिच्यासाठी
काही क्षण रडू द्यावं....-
शेवटी तू दूर झालीसच... ठीक आहे..
माझ्या परीने जेव्हढं करता आलं... तेव्हढं मी केलं..
जेव्हढं मागे मागे यायला हवं... तेव्हढं आलो
जेव्हढी समजूत घालायची... तेव्हढी घातली
जेव्हढा रोष पत्करायचा.. सगळा पत्करला
जे जे करता येईल ते सगळं केलं
तुला नाही कळलं.. ठीक आहे...
पण एक गोष्ट लक्षात ठेव...
काही गोष्टी मनाला लागल्या न
की नन्तर कितीही मनवलं तरी मन मानत नाही...-
सर्वांनाच,
प्रेयसीमध्ये मैत्रीण सापडत नाही....
ज्यांना ती सापडलीय
त्यांनी ती सांभाळावी... अगदी मनापासून!!
कारण सर्वांच्याच वाट्याला
हे सुख येत नाही...-