नको करू तु प्रचार,
नात्यातला आहे तुझ्या म्हणुन तु त्याचा.
जाणुन घे आहे का तो सक्षम,
उचलायला भार जनतेचा.
नको गाऊ तु गुणगान करून प्रचार,
मित्र आहे तुझा म्हणुन त्याच,
जाणुन घे आहे का तो दयायला,
सर्वस्व देशासाठी स्वतःच.
नको करु तु प्रचार,
जातीचा आहे तुझ्या म्हणुन,
नको देऊ तु साथ त्याला,
जाणुन घे आहेत का त्याचे विचार,
माणुसकीला धरुन जवळ आणणारे समाजाला.
नको करु तु प्रचार,
पुरुष आहे म्हणुन उमेदारीची,
जाणुन घे आहे का तो खरच ज्ञानी,
निभवायला जबाबदारी भारतमातेची.
-