बघुनी नकळत तुला समोरी,
गहिवरले हे मन माझे ll
जसे चांदण्यांच्या प्रतिबिंबाने ,
बहरले हे रूप तुझे ll-
गुंफते सतत आई नयनी अश्रूंची माळ.
जेव्हा वाढवते नऊ महीने पोटात बाळ.
स्त्री जन्म मिळेल मर्दा जेव्हा तुला कधी,
कळेल किती वेदनांचा असतो तो काळ.-
थकले मन माझे जरी,
विचारांची बडबड चालूच राहिली.
सुटले क्षण माझे जरी,
आठवांची गडबड चालूच राहिली.-
मन असतं तरी कसं ?
याला सगळं कळतं
पण तरीही उगाचंच
कशात तरी अडकून पडतं
-अश्विनी मोहिते
-
डोळे माझे स्तब्ध झाले,
तिला पाहताच क्षणी.
शब्द माझे बोलके झाले,
तिनं हसताच क्षणी 😊-
कित्येक कादंबर्या वाचल्यात मी,
पण तुझ्या अबोल ओठांच्या साक्षीने
तुझ्या डोळ्यातले भाव वाचण्याची
मजा दुसर्या कशातच नाही...-
आठवणींचा झरा एकदा
मेंदूच्या कप्प्यात बसविला
शांत राहायचं सोडून
वेडयासारखा तो वाहायला लागला-
आई तूझ्या मायेची सावली जणू घाली दूःखावर पाखर
जवळ घेवून मारलेली मिठी जणू आंददाई साखर
डोक्यावर फिरवलेला तूझा हात
जन्मोजन्मी लाभावी तूझी मला साथ
कारण तूच चेहऱ्यावर खूलणाऱ्या नव्या हर्षाच
जगात नाही दूसर नात जस माय अन लेकराच
तूझ्या आशिर्वादानच मिळते जीवनाला नवी वाट
मनात जागवतेस निराश मी होता नवी आशेची पहाट
माझ प्रेम तूझ्यावरी आहे किती सांगणारे शब्दच नाही कूठे
मूखी तूझ्या प्रेमान मला तूजवरी कविता करतांना शब्दच न फूटे
कळस मंदीरी असावा पवित्र तसे तूझे जीवनाचे सूत्र
तूळस वंदावनी जसे देई श्वासाला नवी जीवनी
तूच माझी जीवनदाईनी ममतेच्या मूख्य वाहीनी
अस्तित्व तूझ्या पासून झाले सूरू
तूच माझी पहिली गूरू
चालायला तूच शिकविलेस तूरूतरू
जीवनाचे हे अवघड अनोळखी सत्र
नाही ईतरत्र जसे आधाराचे तूझे छत्र
ए आई तू वसतेस ठाईठाई
ठेंगणे तूजसमोर आकाशही बाई
तूजवरी करतांना कविता अपूरी पडावी शाई-
पाहता स्वतःला तुझ्यात
समरसतेचे रूप निरखले...
तुझ्या त्या विलक्षण हस्यात
नकळतच माझे हास्यस्वर मिसळले...
माझ्यात तुझे प्रतिबिंब पाहता
चंद्राची उपमाही अधुरीच खरी...
भावनांचा कल्लोळ दाटतो मनी
केवळ तुझ्यापरि...-
तुझ्या आठवणी म्हणजे
तुझ्या सोबत जगलेला प्रत्येक क्षण आहे
मनातल्या साऱ्या भावनांना
अलगद तुझ्यासवे जपणे आहे...-