....
-
महाराष्ट्राच्या भूमीवर
जणु हे नंदनवन
मुक्त हाताने करतो इथे
निसर्ग उधळण
एकजुटीने करू चला तयाचे जतन
आपलं कोकण... कोकण... आपलं कोकण......
विविध कलांनी नटलेली इथली संस्कृती
घाम गाळूनी कसुया चला अपुली ही माती
विसरूनी मतभेद जाती
घेऊनी हात हाती
करू भूमीचे रक्षण ...
आपलं कोकण... कोकण... आपलं कोकण....-
एक गाव आहे माझं,
वेगळं आहे आमचं नात..
सारखं जाण होत नाही,
गेल्या शिवाय राहिलं जात नाही..
अस एक गाव आहे माझं,
जिथे आहे लाल मातीचा सुवास,
जिथे लागते आंब्याची रास,
कमी नाही रान मेवा तिथे,
आलो जरी घरी पुन्हा,
मन मात्र तिथेच जास्त रमते..-
आमच्याकडे आला तो आला पण इकडेच येऊन राहिला..!!निघायचं नावच नाही घेत राव..!!
🙄🙄😋😂😂-
' माझा कोकण '
माझा कोकण आसा सगळ्यांपेक्षा आगळा,
माझ्या कोकणाचा ह्या जगात स्थानच आसा वेगळा!
कोकणातली माणसा म्हणजे जीवाक जीव लावणारी,
अडल्या येळेक मदत करुक मध्यारात्रीसुद्धा धावणारी!
आंबो,काजू,नारळ,कोकम,फणस ह्या सर्वांनी माझ्या कोकणातली बाग नटता,
एकदा भायरचा माणूस कोकणात इला की तेका हयच रवानसारख्या वाटता!
कोकणातल्या लोकांची मना कशी आसत ता ह्यो कोकणातलो समुद्र सांगता,
आम्हां कोकणवासीयांच्या मनांचो मोठेपणा मोठ्या ऐटीत पटवन देता!
कोकणातले गडकिल्ले सांगतत कोकणाचो इतिहास,
कोकणातल्या पदार्थांची चव सांगता तेंचो घमघमित वास!
माझ्या कोकणाक सगळे 'पृथ्वीवरचो स्वर्ग' म्हणतत,
अडी अडचणीक जिकडे देवसुद्धा पटकन पावतत!
निसर्गसंपन्न माझो कोकण तेची वेगळीच आसा शान,
मी कोकणात रवतंय हेचो माका आसा अभिमान!
देवा पुढच्या जन्मिसुद्धा माका कोकणातच जन्माक घाल ह्योच आशीर्वाद मगतंय,
माझी पहिली 'मालवणी' कविता माझ्या 'कोकणाक' अर्पण करतंय!-
घर बसल्या मिळे सुख,
असे सुख माझ्या कोकणात..
नको जाया कुठं दूरवर..
माझे स्वर्ग माझ्या दारात..-
हा असा अथांग सागर,
नयनी पहावे अंबर..
निसर्गाच्या कुशीत लपलेले,
माझे कोकणातील घर..
ओढ माझी त्याच वाटेवर..
जिथे बालपण हसती झोक्यावर..
नको मला रुबाबाचे शहर,
माझे मन वसती गावातच खरं...-
डाळ भाताच्या तोंडाक तिखट लोणच्याची फोड,
डाळ भाताच्या तोंडाक तिखट लोणच्याची फोड,
माझी मालवणी भाषा आसा थोडी आंबट थोडी गोड,
माझी मालवणी भाषा आसा थोडी आंबट थोडी गोड!-
इतर ठिकाणी लग्नात...
'डोली सजा के रखना.. मेहंदि लगाके रखना..!'
आणि कोकणात...
'गीता उभी मंडपात.. नितीन दुरुन होता पहात..!!'
😍😍😍😘
कोकणची मजाच न्यारी..😍😍😘-