Sayali Shinde   (sayquo)
170 Followers · 123 Following

read more
Joined 6 September 2017


read more
Joined 6 September 2017
15 APR 2023 AT 23:58

ही वाट एकची समोर,
मन माझे करी अस्थिर.
अनेक विचार अवती भवती,
त्या झाडा, वेलींवर..

तिथे एक फुलपाखरू,
नाचे अनेक फुलांवर..
बाळगत आनंदाचा सागर,
त्यास झाले अनावर...

चाफा बकुळीची ही साथ,
जणू स्वर्गाहूनी सुंदर..
मनी काही भलतेच,
नाही समाधान, फक्त काहूर..

आयुष्य असे थोर,
ही जाणीवच फोल,
कुणा नाही ठाव रहस्य,
तो भाव किती खोल...

-


30 MAR 2023 AT 13:23

दोन अक्षरांचे ध्यान
अवघी मूर्ती ती महान.
एक वचनी एक पत्नी
एक राम एकची राम..

-


7 JAN 2023 AT 16:02

I rather find short stories interesting than that of an emperor or a great leader. Their stories are all of other people and kingdoms where they hardly hardly have time to speak about themselves. Whereas I would always prefer a story of a shopkeeper or a traveler or may be a tourist guide, as he will have more interactions with different types of people and still find happiness in little things. Life is about little things that keep you happy. Big things make you popular and boring as everyone will speak of it.

-


23 OCT 2022 AT 15:26

प्यार के बदले में,
बस इज्जत मांगना दोस्तो।
प्यार मिल भी जाता है,
इज्जत के लिए,
जिंदगी गुजर जाती हैं।।

-


22 OCT 2022 AT 13:20

शब्द बरसावे
अलगद कागदावर..
कोणी म्हणे लेखन,
कोणी काव्य बहार...
कला कुणाचे ध्येय,
कुणी हद्दपार...
एक साम्य मात्र,
हर एक कलेत..
कुणी नाव देई ध्यान
कुणी समाधान...

-


22 OCT 2022 AT 13:13

आई म्हणजे काय?
हे नक्की कोण सांगू शकते..
प्रेम म्हणावे तर क्षणिक दोरी..
आणि आठवण म्हणावे
तर आयुष्यभराची शिदोरी..

-


31 AUG 2022 AT 15:48

देवा तुझ्या पायी
माझे मस्तक नमवितो..
मखरात बसवून तुझे
स्वागत करितो...

तुझ्यासाठी मोदक,
पंच पक्वान्न मांडीतो,
एवढ्या मखरात दुनिया
सारी सामावून पाहतो...

-


29 AUG 2022 AT 0:40

गर्दीत हरवलेला मी,
एक सामान्य मनुष्य आहे
माझ्या सुखाची कल्पनाही
तितकीच सामान्य आहे..

दुःख सांगायला मी तयार,
ऐकण्यास जग उभे आहे
सुखाची कल्पना एकच,
तरी दुःख असामान्य आहे..

ऋण फेडायचे कसे?
या भुमितलावर जन्मल्याचे..
मी माणूस चार चौघांसारखा,
मन माझे असामान्य आहे...

-


28 AUG 2022 AT 15:10

दोन घटिका चिंतेच्या मी,
खांद्यावर ओझे ठेऊन आहे,
स्मित हास्य चेहऱ्यावर आणि
दुःख पापण्यात झेलतो आहे..

-


28 AUG 2022 AT 15:07

माहित नसले भविष्य,
तरी संघर्ष रोजचाच आहे
तारेवरच्या कसरतीला,
आधार भरवशाचा आहे..

-


Fetching Sayali Shinde Quotes