सुटेल का हे गणित आयुष्याचे....
निर्णय घेते वेळी मी कुठेतरी चुकल्या सारखी वाटत आहे
पुस्तकातल्या गणीतागत आयुष्याचा फॉर्म्युला शोधत आहे
हो खरंच , समजत नाही मला या कोऱ्या जीवनातलं काही
प्रत्येक गोष्टीसाठी का ,सगळ्यांनाच पडलेली असते घाई
अस्ताव्यस्त पडलेल्या शब्दांना एकत्रित करत आहे आता
उद्ध्वस्त पडलेल्या आयुष्याचे गणित मी मांडत आहे आता
हो खरंच ,अंधार नसता तर चंद्राला किंमतच नसती काही
नशिबाला दोष दिल्यानंतर आयुष्याचे गणित सुटणार नाही
प्रयत्न तर खूप केला सोडवण्याचा गणिताला आयुष्याच्या
आठवणी सोडून बाकी काहीच उरलं नाही वाट्याला माझ्या-
मनावर राज्य करणाऱ्या आठवणी
आज हुकुमत गाजवत होत्या...
मागचं सर्व आठवायला आज
भाग पाडत होत्या....
प्रेमळ आठवणी येऊन मन
प्रसन्न करून जात होत्या...
नको वाटणाऱ्या आठवणी येऊन
मन हेलावून जात होत्या...
सुरांची तार छेडावी तशी
एक आठवण येत होती...
सर्व काही विसरून फक्त
हसायला भाग पाडत होती...
-
कधी,कोणाची,कशी येईल,काही सांगता येत नाही,
ती चांगलीही असू शकते किंवा वाईटही असू शकते,
कधीही कोणाची आठवण आली की ,
आपण आपल्या विचार मंथनात रमून जातो,
जाणता अजाणता पुन्हा पुन्हा तेच ते आठवत राहातो,
मग कदाचित काही वेळेस आपल्याला त्याचा त्रास देखील होतो,
ठरवूनही ती आठवण विसरता येत नाही,
आठवणी नेहमीच विशेष असतात,
काही वेळेस आपण हसलेले दिवस आठवून
आपल्या डोळ्यात पाणी येते,
तर काही वेळेस आपण रडलेले दिवस आठवून आपल्याला हसू येते,
तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आत्ताच मनापासून भेटा,
त्यांना नेहमी निरोप देताना आनंदाने निरोप द्या,
कदाचित उद्या तुम्ही किंवा ती व्यक्ती नसेल पण
तुमच्या चांगल्या आठवणी तुमच्या बरोबर नेहमीच असतील,
आणि लक्षात ठेवा,आठवण आभास देते,स्पर्श नाही.....-
"तडजोड
करीत आहे मी, तुझ्या
विचारांची माझ्या जीवनाशी!
गोठून
चालल्या आता आठवणी
आपल्या,माझ्या या अधीर मनाशी!
वाईट नाही मी
इतकी पण जितकं तु
सांगतोय माझ्याबद्दल या जगाशी!
सुखा-दुखात
सोडणार नाही संगत
तुझी ठेविल तुला माझ्या पदराशी!"-
मन......
हे कधी नदीसारखे संथ वाहते
तर कधी सागरासम बेभान होते....
कधी आठवणींच्या मेघात लपते
तर कधी सूर्यासारखे तेजोमय होते....!!!-
If you make your experience of
THIS MOMENT Blissful,
Your entire life would seem to be Eternal.-
मी लिहिलेल्या कविता
तू आता तरी वाचणार का?
आठवणींच्या पावसात सखे
थोडे तरी नाचणार का?-
जरा निवांत बसावं म्हणलं तर
लगेचच आठवणी मनी फेर धरतात...
आणि निवांत मिळालेले ४ क्षण
आठवणींमध्येच गुरफटले जातात...-