विसरतात काही लोकं
तरीही आपण त्यांना मनात
कायम जपायचं..
त्यांना गरज असली की
नक्कीच आठवण काढतील,
तोपर्यंत आपण शांत बसायचं..
कधी कधी मैत्री अशीही असते,
गरजेपूर्ती.....-
स्वच्छंदी मन माझे...रमते कुठेही
सुखी हसू न् दु:खात रडते कुठेही
पोरांत पोर आणि थोरल्यांत थोर
होण्यास एक प्रयत्न करते कुठेही
गरीब असो वा श्रीमंत कोण कसा
तरी लळा सर्वांनाच लावते कुठेही
होऊन हळूवार फुलपाखरा समान
मनमुराद आनंदाने बागडते कुठेही
सहज सोपे व्हावे जीवन हे आपुले
शोधात स्वतःच्या रे भटकते कुठेही-
गडकिल्ले हिंडणाऱ्यांची
एक गम्मत असते न्यारी
कितीही दमछाक झाली तरी
चेहऱ्यावर स्माईल असते लय भारी-
राज्य करते मी माझ्याचं मनावर,
म्हणून मी स्वच्छंदी राहते...
छंद म्हणजे आवड माझी,
शब्दांतून मी तिला जोपासते...
मनांत शब्दांचा बाजार भरवून,
खरेददार मिचं असते...
पण अनमोल आहेत शब्द माझे,
मोल त्याचे मुळीचं नसते...
घेते मी शब्दांना झोळीत कल्पनेच्या,
एक एक काव्य उलघडतं जाते...
अर्थ देते शब्दांना कल्पनेचा,
उमलण्याआधी कळीला कागदावर फुलंवते...-
रोज स्पर्शूनी जाणाऱ्या हवेत
आज आपुलकीचा गारवा नव्हता
वाऱ्यासमवेत डुलणाऱ्या फुलात
आज टवटवीतपणा दिसत न्हवता
स्वछंदी उडणार फुलपाखरूही
आज कुठेतरी दडून बसलं होत
पाखरुसम भिरभिरणाऱ्या मनाला
आज साथ द्यायला कोणीच नव्हतं-
मला आवडतं स्वच्छंदी राहायला
मनाविरूद्ध कुणाचंही न ऐकायला
आवडतात मला छंद जोपासायला
आनंद येतो मग माझ्या जगण्याला
सुना-
वक्त भी काफी अजीब है ,
क्या बदला किसिने नसीब है ?
राह देखते खडे यहा ,
और वो और कही मश्गूल है l-
घेऊन स्वच्छंदी भरारी आकाशात गेले असते,
नसली असती कुठल्या देशाची सीमा,
ना फिरण्यासाठी लागला असता कुठला व्हिसा,
पसरूनी पंख आकाशात झेपावले असते..!!
उडताना नसली असती वाहतुकीची गर्दी,
ना कसला परवाना नाही अपघाताची भीती,
माणसाच्या या गोंगाटापासून दूर झाले असते,
जिथे विसावा माझा तिथेच थांबले असते..!!
नसती केली उद्याची चिंता,
नसता मनात नात्यांचा गुंता,
नाही कुठली उधारी नाही कसली कर्ज,
नसता झाला कुठलाच खर्च..!!
कधी उगवता सूर्य पाहिला असता,
तर कधी चंद्रप्रकाशात विहार केला असता,
जगाचा कानाकोपरा पहिला असता,
निसर्गाचे सुंदर ऋतू अनुभवले असते..!!
खरंच मला पंख असते तर,
असले असते हे विश्वची माझे घर..!!-