Happy birthday dear Tai
-
M.A. (Marathi Lit. History )
D.O.B.--१२ डिसेंबर
Teacher
छंद आह... read more
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय वंदूताई
तू लाभलीस किती माझं भाग्य फार..
तुझ्यामुळेच आली आपल्या मैत्रीस बहार..
दुःखी मनास सांभाळणारा तूच आधार..
तुझ्या प्रेरणेतून सजते माझी यशाची किनार..
कधी आनंदाची तर कधी हास्याची धार..
मायेच्या कुशीत मिळे जसं जगण्याचं सार..
तुझ्या एवढं प्रेम करणारी फक्त तुच आहेस. आणि कायम राहशील हा विश्वास.🤗
मला मिळालेला अनमोल खजाना💝.. तसेच तुझं लेखन कौशल्य अधिकाधिक वृद्धिंगत होऊन साहित्य जगात तुझा नावलौकिक होवो हीच सदिच्छा.
😊🥰😘❤️❤️-
रोजच भेटे मज आनंदी सकाळ
काव्यानंदची साद अन् शब्दांचं आभाळ
नित् नवा दिवस पुन्हा जगण्याची आस
कवितेच्या गावी नितळ ओळींची आरास
रवीकिरणांनी बघावे हलकेच डोकावून
श्रीहरीच्या भक्तीत द्यावे स्वतःला झोकून
पहाटेचा गार वारा वाहुनी स्पर्शितो अवखळ
पक्ष्यांचा किलबिलाट हिरव्या पानांची सळसळ
मुक्तछंद प्रेरणेची हसवी आनंदी सकाळ
ओंजळभर स्वप्न सुख तया मार्ग सुकाळ-
आठवणींचा मधुगंध
बहरत असतो रोजच
स्पंदनात सामावतो
तुझ्या प्रेमाचा ऐवज-
जगायला काय लागतं रे
हवाय धडधडता श्वास
जोवर आहे तोवर मानवा
जीवन आहे खासमखास
आयुष्याची गोळाबेरीज
करून जीव हा थकला
पैशामागे धावितो सदा
प्रत्येक क्षणास तू मुकला
वेडं होऊन जग ना
क्षणभंगुर जीवन हे
कर एकदा प्रेम तू
सप्तरंग मधूबन हे
कुणासाठी करतो सारं
व्यर्थचि गेलं रे जगणं
स्वतःसाठी घे ना श्वास
एवढंच माझं सांगणं-
एक झलक ही काफी हैं जिंदगी तुम्हारी
तस्वीर का क्या हैं आइना कर देता है वो पुरी-
प्रत्यक्ष अनुभवलेला एक अविस्मरणीय सोहळा 👏👏🙏🌹🌹🤗
संपूर्ण कॅप्शन मधे वाचावे 🙏
-
२०२४ मधली ही शेवटची रोजनिशी.
मी कधी लिहीली नाही पण आज काहीतरी लिहावंसं वाटलं नि रोजनिशीतलं शेवटचं पान उलगडलं. हे शेवटचं पान जरी असलं तरी उद्याचा म्हणजेच नवीन वर्षाचा शुभारंभ आहे. जे नवीन संकल्प मनात आहेत त्याला मूर्त स्वरूप द्यायचं आहे.
ध्येय मनात असलं की ते पूर्ण होतंच हे २०२४ ने मला शिकवलं. त्यासाठी मेहनत आणि संघर्ष करावाच लागतो. फक्त कसोटी लागते आपल्या मनाची.
२०२४ ने खूप काही दिलं. जे हृदयात साठवून ठेवलंय. २०२५ कडूनही नवी आशा मनी फुलतेय. ज्याच्या सुगंधाने आयुष्य दरवळेल.-
मायुसी को हमने पल में दूर क्या किया..
हमें तो खुशीयों का मुठ्ठीभर आंसमाॅ मिल गया..🤗-