महाराष्ट्राचा इतिहास सांगतो सह्याद्री माझा...
-
वारसा आमचा संघर्षाचा, तळपत्या तलवारीच्या पातीचा
कणखर पोलादी अभिमानाने, फडकतो ध्वज स्वराजाचा
महाराष्ट्राच्या मातीत या, जन्मल्या गाथा शौर्यवीर छत्रपती अन् मावळ्यांच्या
किती गावी गाणी पराक्रमाची, सह्याद्रीच्या कुशीत घडलेल्या इतिहासाच्या
रयतेसाठी प्राणपणाने झुंजला, असा एक राजा होता
कीर्ती त्याची चराचरात, आवाज आजही घुमतो प्रत्येक शिळांत
मातीत या जन्मले युगपुरुष, दुमदुमला आसमंत सारा
किती झेलतो वादळवारे, खंबीर राहून साक्ष देतो इतिहासाची या
निसर्गाची लेवून नवलाई, डोंगर रांगातून किल्ल्यांसवे सजतो हा
साक्ष देत अलौकिक इतिहासाची, स्मृती जागवत साऱ्या खाणा-खुणा
सह्याद्री गर्जतो माझा, दरीखोऱ्यातून हर हर महादेवा
घुमतो नाद आजही भूमीतून, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजा
-काव्यामृत
-
आयुष्यात एक प्रवास आवर्जून असा करावा
सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक विसावा जरूर घ्यावा
टेकवूनी माथा सह्याद्रीच्या रागांत नतमस्तक व्हावे
लाभलेल्या या जन्माचे याच जन्मी सार्थक करावे
फिरुनी या गडकिल्ल्यांत आज मोकळा श्वास घ्यावा
मिळालेला प्रत्येक क्षण स्वराज्याच्या नावी करावा
पहावी झुंज सह्याद्रीची या वाहत्या वाऱ्याशी
पाय रोवून जमिनीमध्ये त्याची स्पर्धा आसमानाशी
पराक्रम या सह्याद्रीचे आहेतच विलक्षण
भ्रमताना सह्याद्री कमी पडतो एक-एक क्षण
पहावा सह्याद्री अन् अनुभवावा सह्याद्री
आपल्या श्वासांमध्ये साठवावा सह्याद्री
सह्याद्रीच्या इतिहासाचा कधी न विसर पडावा
मानाचा मुजरा आज सह्याद्रीसाठी कमी असावा
पाहून उंची सह्याद्रीची विचारांची उंची वाढवावी
स्वराज्याचे सुराज्य व्हावे हीच इच्छा मनी बाळगावी.-
दऱ्याखोऱ्यातून उंच पहाडातून
पसरलेला हा सह्याद्री गर्जतो माझा...
शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देण्या
हा सह्याद्री गर्जतो माझा....
सांडले किती रक्त इथे मावळ्यांचे
त्यांच्या बलिदानाची कहाणी सांगण्या
हा सह्याद्री गर्जतो माझा...
किती शूरवीर होऊन गेले त्यांच्या
संघर्ष आणि पराक्रमाची कहानी सांगण्या
हा सह्याद्री गर्जतो माझा...
उंच उंच निळ्या आकाशाखाली ताठपने
उभा राहून सह्याद्रीच्या कुशीत घडलेल्या
इतिहासाच्या प्रत्येक क्षणाची साक्ष देण्या
हा सह्याद्री गर्जतो माझा...-
अभेद्य छाती पाषाणाची कंठमाळ त्या लेण्यांची
शिवदुर्गांनी झाला मंडित गौरवगाथा ही त्याची,
अगम्य भासे ग्रीष्मामध्ये मेघ बरसता थाट नवा
शिवसखा सह्याद्री असा हा युगापासोनी इथे उभा..
लाव्हा जपतो उरामधूनी हिरवाईचा साज वरी
सदैव राही अटल योध्यासम लाख संकटे आली जरी,
संत रजकणे झाला पावन शिवशंभू पराक्रमे सजला
जय भारत जय महाराष्ट्र माझा सह्याद्री सदा गर्जला...
-
वो बात ना भी करे
तो बाते हो जाती है
खबर नही उसे की
उसकी खामोशीको
भी जुबाँ होती है-
दाही दिशेतून प्रत्येक कणातून
सह्याद्री गर्जतो माझा हा दुर्ग
महाराष्ट्राची शक्ती शान बनुनी
दऱ्या खोऱ्यातून पसरविला मार्ग
नभा गणातून तेजोमय होऊनी
भास्करासारखा तळपतो राजसा
शिवबाराजाच्या शूर पराक्रमाच्या
गाथा गाऊनी घेतो श्वासाचा उसासा
गड किल्यांच्या रत्नमाळेतील
मौल्यवान हिरा आहे आगळा
कणखर पण रौद्ररूप दाखवणारा
गौरवशाली मुकुटमणी निराळा
हरहर महादेवचा नाद गुंजता
कडी,कपारा शहारतो अंतरी
किती गुणगान गाऊ अलौकिकतेचे
दैदीप्यमान स्वरूप नतमस्तक करणारी-