QUOTES ON #माहेर

#माहेर quotes

Trending | Latest
24 JUL 2017 AT 22:21

वाहतोय श्रावणाचा वारा तो झुळझुळ....
संगे घेऊन माहेरचा सांगावा तो प्रेमळ...
त्या परसबागेतल्या जाईजुईचा सुगंधी परिमळ....
उंच उंच झोके झुलवणाऱ्या तरूवेलींची सळसळ...
ओढ्यात बागडणाऱ्या खट्याळ पाण्याची खळखळ...
आईच्या हातच्या स्वादिष्ट पुरणपोळीचा दरवळ...
जागवलेल्या मंगळागौरीच्या आठवणींचा निशाकाळ....
दादा वहिनीची माझ्या माया स्निग्ध निर्मळ...
अन् निरोपाच्या क्षणी मनाची होणारी तळमळ...
वाहतोय श्रावणाचा वारा तो झुळझुळ....

-


3 FEB 2021 AT 12:12

नववधू होतांना...


🆁🅴🅰🅳
🅸🅽
🅲🅰🅿🆃🅸🅾🅽

-



सर नाही कोणतीच माहेरच्या जागेला...
आई बाबांचं अस्तित्व पुरून उरतं जगाला...

-


13 JUL 2021 AT 15:30

सासूबाई हे दूसरे मातेचे रूप असावे
बाबांची मूर्ती ही सासऱ्यांत वसावे
नणद जेठाणी ही ताई अन दिर जेठ हा भाऊ व्हावे

आकाश व्हावे वेडेपिसे आईचे मन जसे मंदीरागत दिसे
माहेरी जसा छळ नसे मनी शीळ आनंदी भासे
असे काहिसे माहेरागत असावे सासरचे वासे

-


11 MAY 2021 AT 12:57

चौरीभौरी...

लेक सासरी पाठविली तरी आधाराचा हात हाती असावा
घरामधला एक कोपरा कायम तिच्या हक्काचा रिकामा ठेवावा

येता याव तिला हक्कानं माहेराला
भावान व्हाव वडीलानंतर बहिणीचा रखवाला

माहेरवाशीण असता होते जसे तिचे घर
सासरवाशीण असाता तिला तसेच असावे ते छप्पर

येता जीवनात तिला हताशा तोडली जावू नये तिची आशा
माणूस म्हणून जाणली जावी तिचीही मनशा

-


20 APR 2021 AT 14:08

बाबा...
नेहमीच मायेचा हात माझ्या डोक्यावर ठेवलात
पाठीमागे भक्कमपणे आधार म्हणून उभे राहीलात
जणू माझ मन नकळतच जिंकलत

संकट काहीही असो कधी न डगमगता तोल सावरायला शिकवलत
शब्दांची मर्यादा जपायला काही तरी लिहायला लायक बनवलत

पायावर उभ राहता याव यासाठी मोकळ मैदान समोर उभ केलत
माझी आवड जपायला कधीही न नाकारता स्वच्छ मनान प्रोत्साहन केलत
आईच्या मायेचा आधार होताच सोबत बळ देवून लाडान मोठ केलत
माझ्यापेक्षा मला ओळखलत

न बघताही जन्माला येण्याआधी पासून मला जपलत
शब्दात सामवणार नाही इतक भरभरून प्रेम दिलत
फूलपाखरासारख सांभाळलत

माझ्या लहान सहान यशातही आनंद मानून
माझ्या आनंदात आनंद मानलात
कधी हार मानून बसल्यावर नव्यान उभ केलत

-


10 APR 2021 AT 14:39

काकण...

मनमोकळ जगायला अफाट पंख पसरायला मोकळीक ते माहेर असत
दू:ख मनातल मनातच गिळाव लागत ते सासर असत

चार दिवस राहून पून्हा सासरी परतायच असत
अस असल तरी माहेर लेकीच्या मनातच वसत असत
शेवटी माहेर हे माहेरच असत

चार बोलणी सासरची ऐकावी लागली दोन भांडी भांड्याला लागली की
समजून घ्यायला समजूत काढायला माहेर आठवत
शेवटी माहेर हे माहेरच असत

आईच्या कूशीची ऊब सासरी कशी मिळणार
बाबांच्या साथीची सर सासरी कूणी कशी करणार

आई सारखा मायाळू सावली देणारा वटवृक्ष एकमेव असतो
बाबांसारखा मजबूत आधाराच छत्र दूसरा जगात नसतो

एकट एकाकी जगता जगता थकायला झाल की
चारचौघात वावरताना एकट पडल्यावर सासर आठवत
जीवन सरणावर जाता जाता दिसल की सासर आठवत

कूणी विचारायला नसल पाणी डोळ्यातल कूणाला नाही दिसल
अश्रू पूसायला माहेर आठवत
शेवटी माहेर हे माहेरच असत

-


23 MAY 2023 AT 21:16

आई तू गेलीस अन् माहेर सुटलं
माझ्या विसाव्याचं आता ठिकाण कुठलं?

-


10 MAY 2021 AT 15:38

मांडव बिदागिरीचा पाठवणीचा दारी पडे
आठवणींच्या साठवणीचा प्रवास तो सरता न सरे .....

लग्नसोहळा सूरात वाजता सनई चौघडा
भाव खूलती मनात घडाघडा...

भाव ते अबोल नकळत जाती सांगूनी
ओघळणाऱ्या चार अक्षूंतूनी...

अंतरपाटाचा क्षण मनीच्या मांडवातून ....
संगम हा आईबाबा अन मूलीच्या प्रितीतून...

तोकडे पडावे शब्द जवळचे सारेच शब्द
मांडव पडता तो करी सारच निशब्द...

आठवणींचे वेध ते पाठवणीचे
तूझ्यामाझ्या सोबतीतील सारेच क्षण ते साठवणीचे...

प्रतिक अनूरागाचे मूखड्यावरी ओघळता तो आसवाचा झरा
भाव तो आनंद मिळावा लेकीला आयूष्याचा खरा...

आनंद मिसळावा जीवनात तूझ्या नव्या भेटीगाठींचा..
जीव तो तू ह्रदयाचा तूकडा असे आईबाबांचा...

दव गाती तूझ्या प्रितीत राग मारवा
स्पर्श तूझा जणू उत्कर्ष मनीचा..

उत्कंठा ती जशी तूझ्या मनी असावा सदा गारवा
सूवास तूझ्या मनी दरवळावा मेहंदीचा

-


21 SEP 2024 AT 10:47

मायेची सावली अन् भक्ती मय माऊली
तेचीअसे मा़झे माहेर आणि आद्य दैवत

-