Ranjana Bhagavan Patil   (तेजस्विनी)
999 Followers · 1.7k Following

मनातल्या भावनांना शब्दात उतरवणं हा माझा छंद(शब्दांकन)
Joined 17 December 2018


मनातल्या भावनांना शब्दात उतरवणं हा माझा छंद(शब्दांकन)
Joined 17 December 2018

रात्र अशी सजली
चांदण्यांनी बहरली
रातराणीच्या सुगंधाने
मंत्रमुग्ध होऊन गेली
उन्हाची तीव्रता कमी झाली
रात्रीने आरामाची ग्वाही दिली
शुभ रात्री 🌃

-


YESTERDAY AT 8:24

सुगंधाने समृद्धीने श्वास भरून
पहाट येते गीत गात गात
सकाळचा संकेत दाखवते
आकाशातील तांबुसलेपण
शुभ सकाळ

-


27 APR AT 23:48

कल्पनेच्या कुंचल्यातून अनेक बहारदार छटा
उमटतात
वास्तवाच्या कुंचल्यातून अनेक काटेरी कंगोरे
स्पष्टपणे पुढे येतात

-


27 APR AT 23:29

एक धागा.......मनातला
गुंतुन वेड लावतो
तुटला जात नाही
ओढताना करकचून
मनाला काचतो
धागा धागा जुळत जाता
मन धावते धाग्यांभोवती
हाताने सोडवण्याचा अट्टाहास
मनाला स्वस्थ बसू देत नाही
जीवघेणा संघर्ष हृदयात
चालत राहतो सर्वकाळ
झुळझुळ वार्यासोबत डोलताना
हळूहळू धागा उलगडून जाताना
क्षणभरासाठी खाली पण येतं मनात

-


27 APR AT 16:58

निळाईने नटलेली सुंदरता
सागराच्या तालबद्ध लहरींचे
अगदी विलोभनीय दर्शन घडते
प्रकृतीने निर्मिलेली हा खेळ
अतुलनीय आनंदाचा मेळ
उष्ण दमट हवेतील गोडवा
मोहक दृश्याचा खजाना
मन अगदी धुंद वेडे होते
आनंदाचा खजाना मनोमनी
आठवणींच्या रूपात साठवून घ्यावा
मनापासुन प्रकृतीचेआभार मानावेसे वाटतात

-


27 APR AT 16:13

जो त्रिगुणांची
मुर्ती जाहला
ओमकारी नटला
गजानन ........
स्तविला मी नमीला
गजानन .........
स्तविला मी नमीला
🙏

-


27 APR AT 16:10

विचारांच्या अथांग सागरात
मनासारखे डुंबून घ्यावे
विचारांचे लावून अत्तर
सर्वत्र फिरुन घ्यावे
जेथे जाईल तेथे तेथे
शब्दाचा झंकार फुटावा
शब्द प्रवाहात वारंवार
झोकुन द्यावे स्वःताला
विचारांच्या प्रवाहाच्या प्रवासात
स्वताच स्वःताला झोकुन देता यावे
विचारांनि वास्तवाचे भान असावे
वास्तवाने शब्दाचे दालन खुलावे
शब्दवेडया लोकांच्या भावनांना
शब्दाव्दारे मोकळे होता यावे
शब्द फुलांचा परिमळ सर्वत्र
फुलांप्रमाणे वाटत जाता यावे
निरंतर एक श्रृंखला बणुन
विचारांचे दालन खोलावे
#रंजनापाटील

-


25 APR AT 10:16

फांदी तुटते आवाज होतो
आपलं वेगळेपण फांदीला जाणवतं
आपण मुळापासून दूर झालो आहोत
आता परत झाडासोबत जुळणार नाही
याची जाणीव मनात ठेवून वाटचाल चालू राहते
दुनियेत असच कित्येक लोकांच होत असत
त्यांची वाटचाल तुटलेल्या फांदीप्रमाणे होत जाते

-


25 APR AT 9:53

बेगडी दुनियेच्या ठायी
मोहमाया निरंतर राही
मानवतेचा दिखावा वरवरती
लवलेशही अंतकरणी नाही
व्रत मानवतेचे धरून जनात
स्वार्थ फक्त भरलेला मनात
भोळ्या भाबड्या जिवांना मधूर वाणीने फसवतात
चार लोकांपुढे मात्र मोठं मोठ्या वल्गनाच
वास्तवात सगळी फसवणूक
अशा बेगडी दुनियेवर विश्वास ठेवू नये

-


24 APR AT 7:32

प्रकाशाच्या वाटेवर आशेचे किरण
आशेचे किरण घेतात भविष्याचा वेध
भविष्यात घडते मनासारखं जीवन
जीवन घडवताना मिळतो आनंद
आनंदाचे तराणे देतात सुखाचेक्षण
तेचे क्षण देतात दुखाची दाहकता
सोसण्याची शक्ती
शक्ती हीच प्रत्येक माणसाच्या जीवनाची गुरुकिल्ली
गुरुकिल्ली ठरते जीवनरूपी कुलुपाची चावी
तीच आणते प्रत्येककाच्या जीवनाला कलाटणी
जीवनात निराश न होता आशेचे किरण मनात
जपून राहताना आशा सफल होते

-


Fetching Ranjana Bhagavan Patil Quotes