तू कळण्यात वेड दवडू नकोस;
मी कळलो नाही अजून मजला.
माझ्या अशा शब्दरचनेला पाहून
तुझ वाटेल अजून ही रिकामा
आहे याचा वरचा मजला.
🤣😂😃
-
मजला कळेना....
ओढ ही अनामिक तुझ्या दिलाची मजला कळेना.
तुझ्या वागण्याचा अर्थ लावू कसा मजला कळेना.
कधी मजला जवळी ओढी कधी दूर ढकली.
कधी चंद्राचे शीतल चांदणे कधी आग बरसी.
तुझे वागणे प्रेमाचे की फितुरीचे मजला कळेना.
कधी जलासारखी निर्मळ कधी ओकते गरळ.
का पायतळी तुडवितेस सखे भावना ह्या तरल.
तुझे वागणे खरे कोणते मजला कळेना.
सांगून गेला ओशो स्त्री आहे मुळी प्रेम करायला.
तिच्या मनाचा थांग खरेच का कळला कुणाला ?
तुझ्या गूढ मनाचा तळ मजला गवसेना.
-
प्रसिद्धीचा मित्रा मला सोस नाही
पिछाडीस आहे,अफसोस नाही
गर्दीत नाही, जरूर एकटा मी
समजता जसा मी मगरूर नाही.
नवी वाट चालून थकतो जरी मी
दृतगती माझी, मी पायवाट नाही
तेजस तारा मी, मुका चंद्र नाही
स्वयम प्रकाशे तळपत मी राही
असाध्य असे मज काहीच नाही
हृदयात वसतो प्रियजणांच्या
मला महालाची गरजच नाही...
-
"औदासिन्य" अंतरी का?
गणित मजला कळले नाही....!
उगाच स्वतःशी पुटपुटलो पण,
तुजला कधी छळले नाही....✍️
-