Devendra Joshi   (देवेंद्र जोशी)
463 Followers · 872 Following

Poet
Joined 20 September 2019


Poet
Joined 20 September 2019
3 APR 2021 AT 17:54

मला असे वाटते
आहे तुझ्या प्रेमात
उगाच हसत नसते
कुणी बघून आरशात

-


3 APR 2021 AT 17:41

मी कशास वेचू
फुले अंगणात
तू आहेस सखे
माझा पारिजात

-


2 APR 2021 AT 21:46

तू नाहीस माझ्या नशिबात तरी
असतेस प्रत्येक ओळीत माझ्या
भुकेला असा शतजन्मीचा जरी
तुझे प्रेम आहे शिदोरीत माझ्या



-


31 MAR 2021 AT 18:33

चिंब झाले मी
दंग झाले मी
तुझ्या प्रेम रंगी
धुंद न्हाली मी

-


31 MAR 2021 AT 18:30

सांग मनात आहे तरी काय?
मोराशिवाय मोरणी
चंद्राविना चांदणी
नदी विना पाणी
सुराशिवाय गाणी
सख्या शिवाय साजणी
राहील कशी काय....?

-


31 MAR 2021 AT 18:22

यादी माझी स्वप्नांची
सरता सरता सरेंना
इच्छा माझ्या मनीची
मरता मरता मरेना !

-


31 MAR 2021 AT 18:16

आला फाल्गुन मास
पेटवा होळी रे होळी
भरवा सजना घास
पुरण पोळी रे पोळी

-


31 MAR 2021 AT 17:34

तू अर्ध्यावरती डाव सोडून गेलास
तरी मी समजावील रे माझ्या मना
हातात हात घेत मजसवे चाललास
त्या वाटेवरती शोधील पाऊलखुणा

-


27 MAR 2021 AT 10:17

आठवण तुझी
गंध मोगऱ्याचा
जीव कासावीस
येथे श्वासाचा

--देवेंद्र जोशी

-


27 MAR 2021 AT 10:13

लाकडास जशी
करवत कापते
आठवण तुझी
काळजास चिरते

-


Fetching Devendra Joshi Quotes