भाऊ-बहीण
कधी हसणारं तर कधी हसवणारं ,
कधी दुःखात सुखाचा पाऊस पाडणारं....
कधी जीवनास फुलून गुंफणार ,
कधी एकमेकांसाठी सुखाचा त्याग देणारं...
कधी चुकल्यास स्पष्टपणे समजुत घालणारं ,
तर कधी रागवून भांडण करणारं.....
कधीही एकमेकांचे दुःख सांभाळून नेणारं ,
कधी सुखात कायम सोबत असणारं....
एकमेकांना न ओळखून आपलंस वाटणारं ,
हे नातं भावा बहीणच हसतमुख असणारं....
प्रणाली चौधरी
-
"WiFi connection ला माझं नाव हवंय, तिकडे पण तुझंच का???"
असं विचारणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला
"तुला रस्त्यावरून उचलून आणलाय,म्हणून माझंच नाव असतं कुठे पण"
असं उत्तर देणाऱ्या त्याच्या गोड बहिणीकडून रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.-
साथ नाही माय बापाची
जाणीव होताच कर्तव्याची...
आस नाही बालपणाची
डोळी माया लहान भावाची...
अन्न ही गरज पोटाची
दशा होते अनवाणी पायाची...
नको भाषा ही उपकाराची
भीक नाही, ही भुक आमची...-
निरागस,खोडकर
जरास मजेशीरचं
घट्ट विणलेले
हे नाते असते..
खोड्या थोड्या
थोडी गंमत
रुसवा फुगवी
चालूच असते..
अतूट विश्वासाचे
अगदी मनमोकळे
बहीण भावांचे हे
सुंदर बंध असते..
~✍$hrutika..♥
-
माझ्या प्रत्येक आनंदाश्रु मध्ये
मोठा वाटा जीचा असतो
माझा प्रत्येक अश्रू आधी
जिच्या डोळ्यात दिसतो ...
माझी काळजीच नाही तर
माझे अस्तित्व जिच्यामुळे आहे
जिच्या साथी शिवाय
मी शून्य आहे...
तिला बघताच क्षणी
दर्शन आईबाबाच्ं होतं
माझ्या सुखाची मागणी
सतत देवाकडे करणारी..
जी मला या सृष्टीवर
सर्वात आधी प्रिय असणारी
माझी लाडकी "ताई"
मी आज च नाहितर
शेवटच्या श्वासापर्यंत
तुझ्या पाठीशी उभा राहील..-
बालपणीच्या आठवनींनी हसु आणनार
हेच ते ऋणानुबंध ।
रुसव्या फुगव्याची गोडी सांगणार
हेच ते ऋणानुबंध ।
बहीन नसलेल्या श्रिमंतीला गरबीची रास
हेच ते ऋणानुबंध ।
आईच्या मायेनंतर असलेली एकच माया
हेच ते ऋणानुबंध ।
डबडबलेल्या आसवांमधील एक हसु
हेच ते ऋणानुबंध ।
लाडी लबाडीतील प्रेमाची एक गाठ
हेच ते ऋणानुबंध ।
रागातही असलेली प्रेमाची हाक
हेच ते ऋणानुबंध ।
शब्दातुन तुटेल पण ह्दयातुन नाही
हेच ते ऋणानुबंध ।
सुख-दुःखात असलेली साथ
हेच ते ऋणानुबंध ।
राखी-नारळीपोर्णिमेला असलेली वाट
हेच ते ऋणानुबंध ।
भाऊ-बहीनीची अतुट गाठ
हेच ते ऋणानुबंध ।-
घर असो की कुठे बाहेर असो
तो नेहमी माझी ढाल बनतो
हजार समस्या असतील त्याच्या
जीवनात लपवून ठेवतो,
परंतु एक जरी दु:ख येउ दे
आयुष्यात माझ्या तो तुटून पडतो ,
कोणी वाकड्या नजरेने बघू दे माझ्याकडे
त्याची तो मस्ती झेलतो .
Read in caption...! 👇🏻— % &-
भाऊ, मायेचा सागर आणि मस्तीचा भांडार असतो,
तो सोबत असला की खुप आधार वाटतो,
भाऊ मोठा असो किंवा छोटा आपल्या खोड्या काढतो,
आणि आपण रुसुन बसली तोच मानवतो,
स्वत: चुका करून आपल्यावर ढकलतो(😁)
आणि आपली चुक झाली की मात्र स्वत: कडे घेतो(🤗)
दादावर कुठलेही संकट आले की सल्ला मसलत करतो,
आणि आपल्यावर संकट आले की स्वत: सामोरे जातो,
मोठा भाऊ असेल आपले सगळे लाड करतो,
आपली खुप काळजी घेतो,
दूधात जशी साखर तसा आणि आयुष्यात भाऊ असावा,
त्याच्या रूपाने प्रत्येकाला हक्काचा मित्र भेटावा... !!!-
असंख्य ऋतूची तु चाहूल"
कधी वसंतात येते बहरून
ग्रीष्मात तू तपते.
नात भावा बहिणीच
तू अगदी निस्वार्थपणाने जपते.
कधी चंद्रासरखी येते फुलून"
ताऱ्यासारखी
कधी तू लुकलुते.
शब्दरूपी भेट देऊन"
हीच कामना करतो
की कधी ही दुःख तुझ्या
जीवनात न येऊ दे.-
एक सगळ्यात भारी नाते असते,
ते रक्ताच असो मानलेल
सर्वांना असत हे लाभलेल,
मारामारी, दंगा - मस्ती याला
तर नसते इथे मर्यादा
पण याच नात्यामधे बंधन
असते सर्वात ज्यादा
कायम असतो उभा हा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी
तसच जीवा भावाने
राहतो हा सगळ्यांशी
असतो हा सगळ्यांचा
पहिला सखा
म्हणूनच तर प्रत्येक बहिण म्हणते
भाऊ माझा पाठीराखा .... !!!!!
-