QUOTES ON #प्राक्तन

#प्राक्तन quotes

Trending | Latest

कोण कर्ता कोण करविता कुणा ठावे
डाव प्राक्तन पटावरला खेळत रहावे !

-


16 JUN 2022 AT 22:21

रात स्वप्नांची अश्रु मोत्यांत भिजून गेली
गुलाबी स्वप्नं सारी धुक्यात विरून गेली

कुणी ओळखली का कधी नियतीची खेळी
कधी केव्हा कशी होऊन गेली राखरांगोळी

भीती न राहिली काळ्याकभिन्न अंधाराची
सवय झाली सरावाने भयावह काळोखाची

आता का करावी जीवापाड तमा कुणाची
सजा मिळाली अशी न केलेल्या गुन्ह्याची

अवहेलना का नशिबी कशी थट्टा प्राक्तनाची
दुर्दैवी दशाच की भोगावी शिक्षा स्त्री जन्माची
- © Rupali




-



रोज एक रेखाटन होते
सुख दु:खाचे
गडद कधी हलक्या
पुसट रेषा आणि
रंग छटांचे
उठावदार होईल
कोणता रंग
हे तर
प्राक्तन ठरवेल
कँनव्हासचे

-



प्राक्तन गुलाबाचं सुकून जाणे,
स्मरणात काट्यांचं टोचून जाणे!

-



धाव अशी हि नदीची
ओढ धरेची कि सागराची?
पावसातून चक्र उगम
ही कथा तिच्या प्राक्तनाची!

-


12 NOV 2020 AT 6:59

दवबिंदू ची टपटप,धुक्याची झालर
खग विहंगांचा किलबिलाट,
प्राक्तन आली पांघरूण
नवं तेजाचा लखलखाट....

-



🍁
घेऊन अंगी शुष्क रेषा
जाता पान धरा भेटीला,
विरह वेदना त्या क्षणी
छळे एकाकी फांदिला !

ऋतू चक्र हे प्राक्तनाचे
कसे कळावे कुणाला ?
स्थित्यंतर मर्त्य जीवाचे
जातेच अंततः लयाला !

-


30 NOV 2022 AT 19:25

नवीन स्वप्न अन् नवीन आशा,
मनाला नेहमीच पल्लवीत करून जातात..
खुलवीत जातात ते दाही दिशा,
जणू प्राक्तनास सोनेरी किनार देऊन जातात..
जया

-


22 JUN 2023 AT 21:21

प्राक्तनातल्या चकव्यावर
तसा माझा‌ रोष नाही
वाट चुकल्या पावलांचाही
त्यात काही दोष नाही

-



कागदी घडीवर जन्म होय जेव्हा फुलांचा
अपनत्व ना उरते, गंधित पाकळ्यां प्रतीचे
येणार का कुणी, कुशीत घेणार का कुणी?
अनुत्तरीत प्रश्न केवळ उरे प्राक्तन फुलांचे

-