धावपळ, गजबज,कोलाहलाने,
जीव होई किती आक्रांत..
भावतरंग ते उठती अनंत,
हवा आता शांत, निवांत, एकांत..
जया
-
आला सृष्टीस बहर रिमझिम पावसाने,
खुलली ही अवनी किती थेंबाथेंबाने..
ओसंडून हर्ष वाहे आज कणाकणाने,
राहो तुझी आम्हावरी अशीच आशीर्वचने..
जयश्री राऊत
✍️शब्दगंध🌿
-
रुक्ष तरुवरी फुटली पालवी आज,
बहरला सृष्टीवरी पुन्हा नवा साज..
कोवळ्या पर्णांतूनी बहरे रूप साजिरे,
सोबती दरवळती सुमने ती गोड गोजिरे..
जया-
आज सारी कशी दुमदुमली पंढरी,
हर्ष-आनंदे गाऊनी नाचे वारकरी..
गेला सारा शिण पाहुनी मुर्ती साजिरी,
संगे रखुमाई किती दिसे गोड गोजिरी..
समचरण विठू तुझे अन कर कटेवरी,
पाहू किती डोळे भरुनी माझा तो श्रीहरी..
Jaya Raut
-
विठू माझा सावळा
शोभे तुलसीहार गळा..
लावी भक्तीचा लळा
माझा श्रीहरी सावळा..
Jaya-
काही नाही मागणे माझे,
सुखी सारे ठेव देवा...
नाम राहो मुखी तुझे,
अन् घडो तुझी सेवा...
सकलांस जे जे हवे,
ते ते मिळो देवा..
राहो हाती कर्म नवे,
नको उगी तो हेवा..
जया-
साक्षीने तुझीया जाग येई चराचराला,
उदयाने तुझीया अर्थ येई जीवनाला..
प्रकाशमय दशदिशा जागवाया चैतन्याला,
नमन असे माझे त्या उगवत्या सूर्याला...
झेपावती पाउले ध्येयपुर्ती गाठण्याला,
रविकिरणानी न्हाउनी तिलांजलि तमोमयाला..
साकारण्या यशा जन्म उभा अर्घ्याला,
नमन असे माझे त्या उगवत्या सूर्याला...
जया-
ती संसारजननी,अद्वितीय कामिनी,
दुःख संहारिणी,सुख विलास निवासिनी...
त्याग,करुणामयी मूर्ति, सर्व सौख्यदायिनी,
अनंतरूपे व्यापुनी चराचरी चैतन्यवाहिनी...
नमन तुज़ पायी भक्तीज्योत पेटली मनी,
राहो आशिष शिरी हिच आस जगत् जननी...
JayashreeRaut-