आठवणींतले काही क्षण
अगदी डोळ्यासमोरून वाहून जातात
पण आता पहिल्यासारखे
ते जगायचे राहून जातात-
Insta id- ajaygaware1977
मी एकटाच हसायला लागतो
तुझ्या भासावरती फसल्यावर
कळत नाही काय कारण सांगू
असं चेहर्यावर हसू दिसल्यावर-
सध्या एवढंच चालू आहे
आयुष्याकडे मागे वळून पहायचं
आणि पुढे बघत चालताना
आलेला दिवस जगायचं-
तिच्या दारासमोरुन जाताना
तो नेमके डोळे मिटून घेतो
पण खरतर बंद पापण्याआड
आठवणीतल्या तिला भेटून घेतो-
लोकांना समोर दिसतो मी
शांत बसून डोळे मिटलेला
पण मला मी वडाचं झाड दिसतो
आठवणींच्या पारंब्या फुटलेला-
माहित आहे मला
माझ्या प्राक्तनाचं लिखीत
वेदनेशीच मैत्री माझी अन्
माझं हसणं ही शापित-
तारुण्यांचा बहर अलवारपणे
आपल्या नकळत सरतो
अन् जगण्याचा अनुभव
चेहर्यावरल्या सुरकुत्यात उरतो-
क्षितीज समोर दिसत असताना
कुठवर चालायचं हे माहित नसतं
आणि अवचित आलेल्या वळणावर
मग नेमकं मन फसतं-
आठवणींच्या एका झुळकेची
नंतर अगदी वावटळ होते
त्यात भरकटलेल्या मनाला सावरायला
माझी नेहमीसारखीच धावपळ होते-
कातरवेळी तुझ्या आठवणींना
रोज नवा मोहोर येतो
आणि डोळ्यांतल्या पाण्याला
मग भरतीचा जोर येतो-