मिटले डोळे सुटले क्षण,
तुझ्याचसाठी तुटले पण.
नदी काठच्या बाकावर,
आता पुन्हा फुटले तण.-
पण कधीतरी..
मी सांगत नाही तुला की,
तू व्यक्त व्हावे शब्दातून..
पण म्हणणे इतकेच आहे की,
कधीतरी उमटावे ते हृदयातून..!!-
पण कुठवर..??
परक्यावर प्रेम दाखवणारे
आपल्या माणसाशी अंतर राखतात..
लोक बहिऱ्याजवळ जातात
अन् मुक्याची तक्रार करतात..!!
आंधळ्यासोबत डोळस
आंधळी कोशिंबीर खेळतात..
दूर पळणाऱ्याच्या मागे
एकजात धावत सुटतात..!!
मागणाऱ्यामुळे अस्तित्व ज्याचे
त्याच्याकडेच मागणे मागतात..
गुणवंताचे निर्माल्य करून
लोक चेहऱ्याला पूजत बसतात..!!
पण कुठवर चालणार हे सर्व?
लोक कधीतरी कंटाळून जाणार..
मग आपल्याच हस्ते घडविल्या मूर्तीचे
ते विसर्जन करून घरी परतणार..!!-
तुझ्यासाठी घराचा उंबरठा ओलांडून आले
आले त्या घराचे मापही तुझ्या सहच ओलांडले
चौकटीत राहूनच घर आजवर जपत आले
इच्छा,आकांक्षा,महत्वाकांक्षा मनातच!
जो जो ध्यास तो तो हव्यास तिथेच थांबवत गेले
अबोल भावना मनातच रुजवत गेले
तुझ्यासाठी केवळ अस्तित्व मिटत गेले
पण तु ते कधी कबुलच न केले
माझ्या स्वप्नांच काय...
ते तर हरवत गेले...
-
पण..
तशी शब्दांची गरज नसते..
प्रेम व्यक्त करायला..
पण मनास वाटत राहते
तुला हवे ते कळायला..!!-
पण कधीतरी...?
म्हणत नाही नेहमीच
पण कधीतरी म्हटल्याप्रमाणे वाग..
हा तर केवळ अनुराग
तू समजू नको मी आळवतोय राग..!!-
काही गोष्टी अगदी मनापासून सोडुन
द्यायच्या असतात, पण जमतच नाही कारण
त्याच गोष्टींमध्ये मन जास्त गुंतलेल असतं.-सुयश;-
पण.....
लिहायच खुप आहे
पण सुरुवात कशी कराव समजतं नाही आहे..
मनात भरपूर आहे
पण ते बोलाव कस समजतं नाही आहे..
सांगायाच भरपुर आहे
पण सांगु कस समजतं नाही आहे ..
करायच भरपूर आहे
पण कराव कस समजतं नाही आहे..
काय कराव या पण च ते पण काही समजतं नाही आहे.-
एका छोट्याश्या मंदिरात
होत्या दोन जोड्या
शंकर पार्वतीचे रूपच म्हणा|
मंदिरात काही दिवा नाही पेटला
पण सुंदर दोन पणत्या भेटल्या..
पेटलेल्या दोन पणत्या पाहून
मंदिरात झाला आनंदाचा माहोल
पणत्यांचा प्रकाश लागला पडायला
मंदिरात उजेड लागला व्हायला|
लक्ष्मी होती चालली निघून
पण पणत्यांना प्रकाश देऊन
मग दोन पणत्यांनी ठरवलं
आपण दिवा होणार|
घेऊन देवांचा आशीर्वाद
त्यांचेही आयुष्य उजळवणार
मंदिरात प्रकाश करून
सारा काळोख मिटवणार
देवांना नेहमी आनंदात ठेवणार|
नाही वाटू देणार कधी दिवा नव्हता घरी
पंत्याच वापस घेऊन शेवटी लक्ष्मी आणणार दारी
असो देवांचा आशीर्वाद सदा आमच्यावरी!!!
-s.k lyrics & creations
-
खुपदा सगळी लोक आपल्यासारखीच वाटतात,
पण फक्त त्यांच्या बोलण्यावरून..
-