आजुबाजुला कितीही गदारोळ असला कालवा असला तरी त्यात
मी एक शांतता शोधत असतो आणि ती भेटते मला त्याचं समाधान आहेच,
परंतु;
माझ्याच एकांतातली गर्दी मला खायला उठते! माझ्याच एकांतातल्या
गर्दीत मीच हरवून जाण्याची भिती आतुन खात राहते मला सतत! थोडंसं
विचित्र आहे पण सत्य चित्र हेच आहे आणि असंच आहे.-सुयश;-
You can find me on
insta & fb @kahis_manatl
WhatsApp - 7028... read more
माणसांचं सुख 'मी' पणाच्या हवेत नाही, तर
'आपल्या माणसांच्या' कवेत असतं.-सुयश;-
काही गोष्टी अगदी मनापासून सोडुन
द्यायच्या असतात, पण जमतच नाही कारण
त्याच गोष्टींमध्ये मन जास्त गुंतलेल असतं.-सुयश;-
काही माणसांशी आपण मन मोकळं
करण्यासाठी बोलतो पण, का ? कोणास
ठावुक ? मन, मोकळं होण्याऐवजी
जास्त जड होतं जातं.-सुयश;-
रस्त्यावर चिखल झाला कि गाडी धड पळवता
हि येत नाही आणि नीट वळवता हि येत
नाही, मनाचं हि बऱ्याच अंशी तसंच असतं.
मनात एकदा चिखल झाला कि ठराविक
विषय, सोडता हि येत नाही आणि कुठे बोलता
हि येत नाही.-सुयश;-
समजावतो रोजच
मी स्वताला
हे असं रात्री बेरात्री
जागणं बरं नव्हे,
दिवस लगेच सरतो
रात्र काही पुरत नाही
दोस्ती रात्रीशी इतरांसारखं
आमच्यात वैर नव्हे.-सुयश;-
काही जवळची माणसं लांब चाललीत
असं वाटेल तेव्हा समजुन घ्यावं कि,
आयुष्य महत्त्वाच्या टप्प्यात आणि
परिवर्तनाच्या वाटेवर येवुन ठेपलय.-सुयश;-
मी तुला विसरायच्या आधी
तु तरी स्वताहुन
अध्ये मध्ये बोलत जा
माझ्याशी थोडंफार ,
कारण हेच, ओळख असलेल्या
अनोळखी व्यक्तींना कधीच न
बोलण्याची माझी सवय
वाईट आहे गं फार.-सुयश;-
एकाच जागेवर अडलं कि जास्तच
अवघडतं जातं त्यामुळे जेवढं
फिरत राहिल तेवढं निर्मळ राहतं,
मग ते पाणी असो वा माणुस.-सुयश;-