तसं मी सगळंच एकट्याने करूच शकले असते,
पण मला हवाय..
तु, तुझी साथ आणि तुझा थोडा वेळ...-
माझ्या अस्तित्वाला तुझ्या प्रेमाची घट्ट मिठी आहे,
म्हणुनच प्रेमाची सावली चिरंतन आहे...-
आयुष्यात माणसं आली..माणसं गेली..
असंख्य चढ उतार बघितले अजुनही बघतेय..
चुका झाल्या त्या मान्य करून आयुष्यात पुढे पडले..
अशा पुढच्या मागच्या आणि चढ उताराच्या प्रवासात..
कायम साथ दिली ती तु....-
सगळ्यात सोप्प काय असतं तर ते ...
एखाद्याबद्दल त्याच्या माघारी त्याच्या चारित्र्यावर बोलणं.-
तुम्ही कोणाला तरी फसवले हे जगाला माहिती नसले,
तरी तुमच्या मनाला नक्की माहिती असते.
काही दिवसांनी लोक बोलायच थांबतील आणि विसरलतील सुद्धा
पण तुमचे मन तुम्हाला शेवटपर्यंत खाणार त्याचे काय?
-
कुठुन येते एव्हढे बळ तुझ्यात खोटे बोलायचे.
सांग तरी मला एकदाचे.
एकाला दिलेले वचन पूर्ण न करता तेच दुसऱ्याला द्यायचे.-
कितीही गैरसमज, राग, वाद, भांडण झाली तर रागावतील,
पण सोडुन कधीच जात नाही ती माणसं आपली असतात.
आणि जी जातात ती कधीच मनातुन आपली झालेली नसतात,
आपण उगाच त्यांच्या खोट्या प्रेमाला आणि शब्दांना खरंच समजुन बसतो.-
जर चुक झाली तर झाली ,पण ती मान्य करायला
काळीज लागत,पळवाट किंवा कारण नाही.
आणि जी लोक हे मान्य करू शकत नाहीत,
त्याचा अर्थ ती त्यांच्याकडुन चुकन झालेली चुक नाही
तर जाणूनबुजून केलेला गुन्हा असतो,
आणि त्यांच्या आत्म्याला तो मान्य असतो.-