न पाहता न भेटता
तुला बघण तुझ्याशी बोलण
हे खुळ आता नेहमीचच झालय
जाणते अजाणतेपणी
तुला गमावण माझ अस कुढण
ही सल आता नेहमीचीच झालीय
तुझ्या आठवणींनी
मन व्याकुळ जीव कासावीस होण
ही हुरहुर आता नेहमीचीच झालीय
दुराव्याच्या विषादातही
मिलनाची आस तुझीच ओढ लागण
ही प्रतीक्षा आता नेहमीचीच झालीय
©श्रीरूप-
मी तर नेहमीच तुझा होतो,
पण आज अश्रूंनी पुसट केलं...
आठवणीत तुझ्या जगताना,
आयुष्य माझं उद्ध्वस्त केलं...-
बाहेरच्या गोष्टींमुळे नाही,
नेहमी आतल्या गोष्टी
आणि आपल्या व्यक्तींमुळेच
त्रास होतो.-सुयश;-
नेहमी लक्षात ठेवा, लोकं
आपण 'काय केलं?', 'काय करतो?'
ह्यावर लक्ष देतात.
पण 'का केल?', 'का करतो?'
ह्यावर नाही!-सुयश;-
डोळ्यात नेहमी तराळतात,
तुझ्या आठवणींचे ओझे...
आता हृदय ही फिरकी घेतो,
भास देऊन प्रेमाचे...-
भेटण्याची ओढ तूला... नेहमी...
तू दिसावी शामसमयी... नेहमी...
चंद्र पाहूनी तुला बघ लाजला,
कौमुदीसम भासते तू... नेहमी...
©️✒️सारंग-
ती नेहमी मला ब्लॉक करायची
जेव्हा तिला माझी आठवण यायची
ती मला अनब्लॉक करायची
मी मेसेज करत नाही म्हणून
रागवायची रुसायची
बोलून झालं की पुन्हा ब्लॉक करायची...
खरं तर ती घाबरायची
मी मॅसेज केला तर कोणी बघण्याची
तिला भीती असायची
म्हणून ती नेहमी मला ब्लॉक करायची....-
जरी स्वतःच्या भाभड्या आत्मविश्वासात रमण्यात जर तुला आनंद वाटत असेल,
तरी माझी एकच इच्छा आहे,
तू नेहमी सुखी रहा.-