गुंतलो मी मातृशब्दी, बघ म्हणूनी शांत आहे...
षंढ झाला आज हा तर, ही जनांची भ्रांत आहे...
वार सारे आज झाले, शब्दतीरांचे मनावर,
बघ जरा पाऊलखूणा, गगन पादाक्रांत आहे...
सोडले मी काम सारे, शांत ठेवूनी स्वताला
राख केली एक वेळी, हेच खरं दाधांत आहे...
तू नको नादास लागू, तू नको बरबाद होऊ,
जग जरा आयुष्य तुझे, चित्त हे नीवांत आहे...
©️✒️सारंग-
😉wish me on 11 aug...🎂🎂🎂🎂😎
YouTube channel
"My Poetic Though... read more
धाव घेई विठूराया, अरे पंढरीच्या नाथा,
किती सोसावा हा क्लेश, पदी टेकवितो माथा...
माझ्या सावळ्या विठ्ठला, अरे उघड रे दार,
दर्शनाच्या पाण्याविना, मनी कोरडं शिवार...
तुझ्या वारीचा हा नेम, किती अजून चुकवू,
तुला बघायाची आस, नको भयाण दाखवू...
एकदा रे विठुराया, ये तु मंदिराबाहेर,
दर्शनाची लागेल रे, तुझ्या समोर कतार...
सावळ्या रे विठुराया, या वर्षी मी येत नाही,
तोपर्यंत भक्तांसाठी, स्वच्छ कर दिशा दाही...
माझे एकच मागणे, तुच लोचनी दिसावे,
ध्वजा वैष्णवांची नभी, अन् मनी तु रहावे....-
उरात आजवर उठले, कैक वादळे येथे...
जीवन करुनी उध्वस्त, शमतात वादळे येथे...
ती जळतेच आहे, गर्भात अन् बाहेरही,
तिच्यातल्या स्त्रित्वाला, छळतात वादळे येथे...
©️✒️सारंग-
हमने जो दिखाये ना थे जख्म ए दिल किसीको...
आज वो भी पढे जा रहे हैं महफिल ए सुखन में...
©️✒️सारंग-
जणू शुष्क मातीत त्या फुलावा अंकुर,
जणू विराणी मध्ये ऐकू यावा तो सूर,
असे होती भास कधी या मनाला,
नवे वळण यावे जणू आयुष्याला...
©️✒️सारंग-
मेरे पापा की कहानी*
सोचा, देखता हुं पहनकर वो चप्पल पुरानी...
करता हुं बयान मैं, मेरे पापा की कहानी, मेरी जुबानी...
मैं उनकी जिंदगी मे आने से पहले ही, वो पुरी तयारी मे थे,
कपडे, झुला, ओर सारे खिलौने, सब अलमारी में थे,
स्वागत किया उन्होंने मेरा, सजाकर मेरी हर छोटी निशानी,
करता हुं बयान मैं, मेरे पापा की कहानी, मेरी जुबानी...
धीरे धीरे हो रहा था बड़ा मैं, गिरते पड़ते चोट खाते,
सिख दे रहे थे पापा मेरे, हर रोज़ वो मुझे संभालते,
जिंदगी में गिरकर उठना, चलना, दौड़ना, बात थी उन्हे सिखानी,
करता हुं बयान मैं, मेरे पापा की कहानी, मेरी जुबानी...
कुछ बाते बोलकर, कुछ ना बोले, कुछ डाटकर सिखाते,
जब चोट मुझे लगती थी, वो भी मन ही मन थे तड़पते,
मैं था समझता, पर उन्हे नही आता था, दिल की हर बात बतानी,
करता हुं बयान मैं, मेरे पापा की कहानी, मेरी जुबानी...
छूटा हाथ, लंबा रास्ता, अनजाने से लोग है सभी,
साथ चाहिए था पापा तुम्हारा, हर कदम, हर वक्त, हर घड़ी,
अब किससे करू जिद्द मैं, किसके सामने करू मनमानी,
अधूरी ही रह गयी मेरे पापा की कहानी जो थी सुनानी मेरी जुबानी...
©️✒️ सारंग-
उस सुखे पत्ते सी हो गयी है जिंदगी,
जब हरा भरा था पेड पे, तो सब निहारते थे,
और अब जब सुख गया तो सब पैर रख आगे बढते जा रहे...
©️✒️ सारंग-
|| प्रभू श्रीराम ||
गुण चारित्र्याची खाण, ज्याचा सर्वांनाच लळा,
अवधकुमार माझा, प्रभू श्रीराम सावळा...
तीन भावांचा अग्रज, चंद्रासाठी धरी हट्ट,
नीलवर्णी सुकुमार, प्रभू श्रीराम तो सत्य...
केली अहिल्या सजीव, सवे ताडिका मारीली,
मोडी पिनाक सहज, अन सीता मिळविली...
मान ठेवोनी पित्याचा, करी अरण्य गमन,
भेट भरत घेवून, करी दुःखाचे शमन...
सीता हरिली रावणे, ठेवी लंकेत डांबून,
मारुती तो झेपावला, आला सीतेस शोधून...
युद्ध जाहले ते थोर, केले दशानना ठार,
तिन्ही लोकी दुमदुमे, श्रीरामाचा जयकार...
©️✒️ सारंग-
मीच देतो साद आता, एकदा ये...
सोड ना तू हा अबोला, एकदा ये...
कर पुन्हा मग तो बहाणा काल केला,
मी पुन्हा फसणार अलगद, एकदा ये...
मान्य आहे चूक ती माझीच होती,
चूक ती खोडावया तू, एकदा ये...
©️✒️सारंग
-
आज चित्रातून झाले, माझ्या बाप्पाचे दर्शन,
मी घरापासून दूर, त्याचे घरी आगमन...
माझ्या बाप्पाचे ते रूप, माझ्या डोळ्यात मावेना,
पाहता रूप बाप्पाचे, पाणी नयनी थांबेना...
तरी बाप्पा आहे माझा, उभा सदा पाठीराखा,
तोच नाती गोती सारी, तोच माय बाप सखा...
असता पाठी तो उभा, चिंता जगाची ती नाही,
सुखदुःख जीवनाचे, तोच सारं माझं पाही...
©️✒️सारंग-