शहर म्हणावे कि हे धाम..?
नगरीत या संचारले श्रीराम..
अवतरले थोर ऋषी मुनी
कुंभस्नानाची महापर्वणी..
वाहते पवित्र गोदावरी
संगोपी सर्वांशी लेकरांपरी..
शहर माझे पावन नगरी
ओळख याची द्राक्षपंढरी..-
माझे शहर नाशिक
सुंदर आणि स्वच्छ नाशिक
श्रीरामाच्या पद स्पर्शाने पावन झाले
स्वातंत्र्य विर सावरकर जन्मा आले
कुंभमेळयात साधु संतानंची परवणी
छत्रपतींच्या रामसेजची कहाणी
गोदावरी नदी ,पांडवलेणी, बुध्द लेणी
नोट प्रेस,विमान कारखाना,भात गिरणी
औद्योगिक वसाहत अंबड,सातपुर,सिन्नर गोंदे
गारगोटी संग्रालय, वाईनरी
कांदा आणि द्राक्ष पंढरी
आरोग्य सुविधा योग्य उपचार
शब्दांना मर्यादा एकदा भेट द्या
-
चिंब चिंब भिजले नाशिक
पारदर्शी पावसाच्या धाऱ्यांनी
भरून तुडुंब वाहत आहे
गोदामाई पाण्याचा लाटांनी
चिंब भिजल्या वाटा अन् रस्ते
न्हाऊन निघाले वृक्ष वेली
चिंबचिंब झाली पानं फुलं
डोंगर घाट न्हाऊन गेली
चिंब चिंब पडत होत्या सरी
चिंब चिंब भिजली वसुंधरा
ओढे नाले अन् नद्या भरली
भिजून गेला आसमंत सारा
नकोस रे नभा डोळे वटारु
राग वहातोय रे बघ ढगातून
आवर घाल तुझ्या तांडवला
उगाच बळीराजा रडेल बसून
©ॐप्रकाश शर्मा-
जिथे जास्त प्रेम, काळजी असते तिथे भांडणे तर होणारच....
राग हा आपल्याच माणसांचा येतो....
तोच राग जास्त वेळ न ठेवता सोडून द्यायच आणि पुढे चालायचं ....
नातं जपणं आणि ते जास्त दिवस टिकवणे आपल्याच हातात असते.....
काल झालेल भांडण विसरून आज पुन्हा नव्याने सुरवात करायची....
कदाचित यालाच आयुष्य म्हणतात....
चला मग भूतकाळ विसरून,भविष्याची चिंता सोडून वर्तमानात आनंदात जगूया.....
नेहमी हसत राहा 😊❤️
-
निःशब्द झाला मृत्यूही, झाला केविलवाणा
जगण्याची धडपड सारी ठरला एक बहाणा
तूलाच ठावें तुझ्या मनीचे तुझं काय हवें ईश्वरा?
नकोस इतुका होऊ निष्ठूर आता फुटू दे पाझरा..
-
हे वीर पुत्रा ..
हे वीर धरणी पुत्र 'हेमंत'तुला त्रिवार वंदन
या धरणी मातेचा वीर तू,रक्षणार्थ तिच्या झिजलास
थोर तुझे उपकार या मातेवर वीर तू जाहलास
तुझ्या कर्तव्यास,शेवटच्या श्वासापर्यंत तू लढलास
वीर मातेचा तू सुपुत्र,वीर शब्दास जागलास
त्या शुर पित्याच्या पावलावर पाऊल तू ठेवलेस
अन् रक्षण्या ह्या भारतमातेच्या सीमेवर अढळ उभा ठाकलास
हे वीर धरणी पुत्र 'हेमंत'तुला त्रिवार वंदन
जगतांना ही ताठ मानेने मातीसाठी तू राहीलास
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावरचं सगळ्यांनाच तू जिंकलस
हेमंत आहे आणि हेमंत राहणार देशासाठी तू अमर झालास
तुझे अमरत्व आणि कार्य तुझे, सदा ह्या तू ह्या धरणीचा 'अमर जवान जाहलास '
'हेमंत तू अमर जवान जाहलास'
धन्य धन्य ते माता पिता अन् धन्य ती वीर पत्नी ..
हे वीर धरणी पुत्र 'हेमंत'तुला त्रिवार वंदन
या छोट्याश्या कवी कडून स्वीकार ही मानवंदना
कवी - क.दि.रेगे
नाशिक
-