सकाळ
प्रभाकर येता आकाशी
उजळल्या दिशा दाही
सकाळ येई घेऊन
गंध शब्दांच्या पाही
ॐप्रकाश शर्मा-
*अभियंता दिवस*
सर्व अभियंत्यांना अभियंता दिवसांच्या अभियांत्रिकी शुभेच्छा. त्यांच्या जिवनाचा गाडी दश पदरी द्रुत गती मार्गावर ध्वनी लहरी पेक्षा अधिक गतीने इच्छित ध्येयापर्यंत अचूक मार्गक्रमण करो अशी सदिच्छा.
©ॐप्रकाश शर्मा
🌹🚗🌹🚗🌹-
अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा जोशात साजरा करुया
बलिदान स्वातंत्र्य विरांचे आठवून नमन तया करुया
सीमेवर प्राणांची आहुती देऊन लढणाऱ्यांना वंदन करुया
तिरंगा उंच उंच फडकावून उत्साहाने झेंडावंदन करूया
आज पुन्हा एकदा देशप्रेमाची सुंदर गाणी गुणगुणुया
वंदेमातरम म्हणून बालगोपालात स्फुरण चढवूया
देशाची अखंडता राखण्यासाठी अहोरात्र मेहनतीने झटूया
वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढून हातात देवूया
श्रमाच्या पराकाष्ठेने धरणीमाता सुजलाम करुया
स्वच्छ भारत करण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवूया-
*मैत्री*
संपला गर्व अहंकार जेथे
तेथे मैत्रीचे अंकुर फुटते
आपुलकीचे अत्तर सांडून
तेथे मैत्रीचा सुगंध पसरते
जिव्हाळ्याच्या आठवणीत
जुळवून मनाचे मनाशी नाते
मैत्रीची मनमोहक बाग
हृदयात फुलवून जाते
मत्स्य द्वेष विरघळून
पंख आकाशी झेप घेते
आयुष्याच्या सागरी
आनंदाची भरती येते
©ॐप्रकाश शर्मा-
ढगांचा झोपाळ्यावर झुलत
भावनावेग नाही सरला
अबोल रात्र संपली तरी
प्रितीचा हिशोब नाही संपला-
जितनी खुली खुली सी जुल्फे आपकी उतना खुला खुला सा खूबसूरत मन.
शब्दो मे मचलती है हलचल
जब लहराता है नागिन सा तन-
सखीच्या हातातील गुलाब
हळुवार प्रेमाने सांगत होता
मनातील नाजूक स्पर्शाची
अबोल भाषा गुणगुणत होता-
एकनाथ झाले मुख्यमंत्री केवळ
दाढी मुखावर असता
चुकवू नका सत्तेची गाडी
देवेंद्रजी वाढवा दाढी आता-
काळ्या ढगांच्या बाहुपाशात
पांडव लेणीचा डोंगर भिजला
रात्रीच्या अंधारात खट्याळ
वारा ही स्पर्शाने शहारला-
मिश्किल हास्य गालावर
जणू ताजगी ही फुलांवर
शतायुषी होवो ही आस मनी
हीच सदिच्छा ह्या शुभ दिनी-