स्वप्नांचा चांदवा कधी हाती आलाचं नाही
चकवा देवून झुलवत रात्रीला चांदण्यांचा कल्प राही
तिष्ठला बिचारा चकोर तृष्णा कधी शमलीच नाही
पावसाळी सर अवचित उगाच काही आठवत राही...-
भार उदरी उन्हाचे उष्ण सोहळे भोगताना
हरवली वाट माझी मी पुन्हा चालताना
भास नुसते तुझे खेळ सारा आभासी अर्थ जाणून घे भावगंध शब्दांसी-
ओंजळीत मिटले किती हुंदके, उसासे
अजाण, वेड्या मनां किती द्यावे दिलासे
मुके शब्द झाले गोठल्या भावनाही
वेदनेच्या डोहात विरल्या जाणीवाही-
माणसाच्या कातडीबरोबर त्याच्या अस्तित्वाला ही जी सदैव चिकटून राहते ती म्हणजे जात...माझी काय तुझी काय ..कशास उगा बाऊ इतका?मातीत मिसळून जाणार त्या तूही मीही ..मग सरू दे भेदाची ती काळी रात
-
सर होऊनी कधी बरसावे, दुखावलेल्या कधी हर्षावे जाता जाता या जगाला स्वप्नं देखणे देवून जावे
-
काय भरवसा असे उद्याचा ? क्षण आताचा जगून जा मागून हुरहूर कशास वेड्या मनमोकळे हसून जा...
-
निःशब्द होते सांज धुके मन हलके हलके उडते
माखल्या धुळीतून गर्द सावल्या गूढ नाते जडते
थबकत थबकत चोर पाऊली स्मृतींच्या या लहरी
व्यापून टाकी मन गाभारा आर्त घुमते बासरी-
इथं प्रत्येकजण फिरतो हातात भळभळलेलं काळीज घेऊन ,तुटलेल्या स्वप्नांच्या काचा स्वतःच्याच पायांनी तुडवत.खुश असल्याचा अभिनय उत्तम करतो. स्वतःला फसवत आहोत हे मात्र जाणतो.सांगणार कुणाला?बोलणार कोणाशी?खूप गाळ साचलायं मनाच्या तळाशी..आभाळात खूप ढग दाटून आलेत पण...बरसायला जमीनच सापडत नाही..
-
सोपं नसतं शब्दांशी खेळणं...कधी-कधी शब्दही रुसतात, रागावतात, हट्टी होतात.तुम्ही कितीही बोलावलं तरी ते येतच नाहीत. म्हणून शब्दांवर हुकमत गाजवण्यापेक्षा त्यांना शरण जाणं रास्त....मग लहान, निरागस बाळाप्रमाणे ते तुमच्या कुशीत अलगद शिरतात..
-
सुकून भरी जिंदगी ।अब तो मुझे जीणे दो।
बहुत रोया हू अक्सर मै।अब जी भर मुझे हसणे तो दो।हाले गम का जीक्र कीया नही कभी। छोटी छोटी खुशी मुझे बाटने तो दो।-