तेरी बेवफ़ाई का एक एक किस्सा हो जाएगा बेनकाब
मेरी कलम से अब होगा तेरे हर एक बेवफाई के किस्से का हिसाब-
An entrepreneur, Writer, Poet, Actor...https://www.yourquote.i... read more
कुछ बातें ज़ुबान से नहीं,दिल से कि जाती है।
कुछ बातें दिमाग़ से नहीं,मन से कि जाती है।
कुछ बातें समझाईं नहीं,समझकर कि जाती है।
कुछ बातें हालतों में नहीं, होशोहवास में कि जाती है-
औकात
जिंदगी जीने के लिए तुम्हारी 'औकात'की जरूरत नहीं होती है ।
बस तुम में जिंदगी से लडने की 'औकात' होनी जरूरी है ।
सफ़र को तैय करने के लिए अंदाज की जरूरत नहीं होती है ।
बस तुम में मंजिल को लक्ष्य मानकर चलने का अंदाज जरुर होना चाहिए ।
दोस्ती निभाने के लिए तुम्हारी 'औकात' की जरूरत नहीं होती है ।
बस एक तुम्हारी सच्ची नियत और साथ निभाने की औकात ज़रुरी है ।
-
"मित्र"
खरंच खूप नशीबवान असतात ती माणसं
ज्यांना मित्र असतात
काही खूप जास्त नशीबवान असतात ज्यांना मित्र वारंवार भेटतात
आणि काही तितकीच कमनशिबी असतात ज्यांची 'मित्र भेट' फक्त मृगजळा प्रमाणे पुढे पुढे सरकते!
खूप मित्र असणं उत्तमच
पण जेवढी आहे ती वारंवार भेटणं अतिउत्तम !
जीवनात पांढऱ्या पेशी प्रमाणे वावरतात ही मित्र
जगण्यातला समतोल राखतात ही मित्र
जगण्यातला खरा आनंद असतात ही मित्र
जेव्हा नसतात बरोबर तेव्हा जगणं असह्य करतात ही मित्र
तरी बरं आठवणींच्या आयुष्यभर पुरणाऱ्या शिदोरी सारखी असतात ही मित्र
करु नका कंटाळा भेटण्यास मित्रांना
टाळू नका समारंभास असतील जिथं मित्र
-
"माझ्या डिग्रीचा कागद" ! (भारतीय बेरोजगाराचं मनोगत)
कोणी घेत का हो
विकायला काढलं आहे
नवं कोर लॅमिनेशन केलेला
माझ्या डिग्रीचा कागद !
आश्वासनांच्या या गर्दीत
तुटवडा आहे नौकऱ्यांचा
सरकारी कागदा वरती जागा भरल्या आहेत
आणि पैसा भरुन पाहिजे असल्यास नौकरी तुमची पक्की आहेत
विचार केला खुपदा
डिग्री माझी न्याहाळत बसलो खुपदा
अभ्यास करुन युपीएससी-एमपीएसी ही दिल्या असत्या खुपदा
पण मी जरा "मध्यमच हुशार" आहे असे घरचे देखील म्हणतात खुपदा
मिडलक्लासचा शिक्का सोबत असल्याने धंदा-बिंदा स्वप्न आहे
सारासार विचार करून निर्णय घेतला शेवटी
विकायला काढला आहे माझ्या..
"माझ्या डिग्रीचा कागद" !-
"भूकेनंतरची भूक"
भूक लागते सर्वांना
भूक असते देखील सर्वांना
पोट भरत सर्वांचं
पोट दिसतं देखील सर्वांचं
कोणी पोटा साठी पळतं
कोणी अन्नासाठी पळतं
कोणी पोटभर खातं
कोणी खाता खाता रडतं
कोणी 'उपाशी' पोटी राहतं
कोणी पोटा साठी 'उपास' करत
कोणी कोणाला प्रेमानं भरवत
कोणाचं पोट नुसत प्रेमानंच भरतं
कोणी कष्ट करुन भूक भागवत
कोणी उपासमारीने भूक मारत
कोणी खाऊन तृप्त होत
कोणाला अपचनाचा त्रास होतो
कोणी कोणी तर पैसा ही खातं
कोणा नेत्यांचं आणि साहेबांचं संपुर्ण डिपार्टमेंट खातं
कोणी खाऊन खाऊन मरतं
कोणी खाऊ घालून घालून मारतं
अरे माणसा इतकं छोटं पोट घेऊन
तू इतका कसा खाऊ शकतो
भूकेनंतरची भूक तुझी
नक्की कधी शमणार आहे?
दगडातला देव सोडून
तू माणसातला देव कधी शोधणार आहे?
-
भय
छायेत भयाच्या प्रत्येक जण
करी विचार भयाचा प्रत्येक जण
भय मनात करते घर कोणाच्या?
भय वावरते घरात कोणाच्या?
भय शत्रू सम शिरकाव करते
भय देव्हाऱ्यात सतत वावरते
भय माणसाला आतून पोखरते
भय फक्त अदृश्य देखावे दाखवते
भय भर बाजारात विकले जाते
भय वेशीवर गावाच्या टांगले जाते
भय धर्मा धर्माचा प्रसार करते
भय प्रत्येक धर्मस्थळात जन्म घेते
करण्यास भयावर मात मनास करा सुदृढ
अन् आत्मविश्वासाने द्या भया विरुद्ध एकट्यानेच लढा-
काळ्याभोर मातीत.
या काळ्याभोर मातीत
घाम गाळीत,पायदळी तुडवीत
रक्ताचं पाणी आटवीत
शेतात सोनं पिकवीत
आईचं कर्ज फेडीत
या काळ्याभोर मातीत
जन्मोजन्मीच नातं फुलवीत
निस्वार्थ कर्म करीत
गायी गुरांना चरवीत
श्री कृष्णाचा पावा वाजवीत
या काळ्याभोर मातीत
निसर्गाचा समतोल राखीत
अभिमानाने "अन्नदाता" ब्रीद मिरवीत
पोटाला चिमटा काढीत
शिळ्या भाकरीचा तुकडा मोडीत
शेतकरी या "महान"देशाचा...,
तरीही दुर्लक्षित
-
मेरा तर्क
मानने से मैं भगवान का वजूद भी मान लेता हूं
जान ने से मैं खुद को भी अच्छे से जान लेता हूं
मेरा मानना और जानना मुझ तक ही सीमित है
क्योंकि इस धरती पर हर कोई अपना अपना तर्क रखते हैं-