प्रेम केले
नाही केला गुन्हा
विरहात तुझ्या
गुंतून जाते पुन्हा
— % &-
Manohar Bhavnath
(MB)
117 Followers · 58 Following
Social worker
Joined 13 August 2021
30 JAN 2022 AT 22:23
24 JAN 2022 AT 22:56
झाकले जरी ओठ
भाव काही लपत नाही
नयना तुझे बोलने
काही थांबवत नाही
-
22 JAN 2022 AT 21:52
मनात रुतल्या
खोलवर घुसल्या
नसली जरी तू
आठवणींच्या पाऊलखुणा
येता गाव तुझा
वळून पाहतो पुन्हा पुन्हा
नसलीस जरी तू
आठवणींच्या पाऊलखुणा
धडधड होते
फडफड होते
भास होतो पुन्हा पुन्हा
नसली जरी तू
आठवणींच्या पाऊलखुणा
दिवस जातो
रात्र येते
जागवते पुन्हा पुन्हा
नसली जरी तू
आठवणीच्या पाऊलखुणा
-
22 JAN 2022 AT 21:27
सजून धजून मी बसले राया
तुम्ही या ना इकडे, गडे
केसात माळा गजरा
राया तुम्ही
केसात माळा गजरा
येऊन माझे नटणे बघा
पदर सरकला बाई
राया तुम्ही करू नका घाई
हळूच माळा गजरा
-
22 JAN 2022 AT 8:53
बहाने इतने किए तुम्हारे करीब आने के
गालो को तुम्हारे होटो से छू लेने के-