वैद्यकीय क्षेत्रात तूझा थाट
बहीणींना देते प्रेम भरमसाठ
कधीही गरज जर शाब्दिक आधाराची भासली
तूझी साथ मला तर नक्कीच लाभली
मध्य प्रदेशातील असली तरी महाराष्ट्रावरही करते प्रेम
मी तर तूझ्यासमोर जेमतेम
हिंदी सोबत कमाल मराठीच लाभल लेण
Highlighted लिखाणाला देते caption ने नवी देण
नाही करत ही कधी नात्यांत पोरखेळ
मराठी मनातल पण कळत हिला बरच असा हा मेळ-
जसा आंब्याला यावा मोहोर
तशी बहरून यावी तूझी लेखणीची लहर
जाईन तेव्हा जाईन मी सासरी
तूझ्यासारखा भाऊ लाभला तर राहणारच मी हसरी
कमेंट्स निराळ्या भरलेल्या प्रतिसादाने
उमटून पडतात वेगळ्या केल्या असाव्यात रेवूदादाने
बाजू लिखाणाच्या साऱ्या पाहतो निरखून
कमी जास्त काही भासले तरी घेतो समजून
सांगतोही हक्काने समजावून
बहिणीला हवे तरी काय
मानलेल हे नात असच कायम रहाव आणि काय
जणू असावस तू हरु न देता शाब्दिक बळ देणार
पाठीशी असाव खंबीर अन धीरगंभीर
बहिण भावाच्या नात्याचा हा वारसा
पारदर्शकता मोजायला नकोच इथे आरसा
ना कोई पिछे न कोई आगे
एकाने उसवता दूसऱ्याने शिवावे धागे
-
शंका ही नात कमकूवत करते
आणि
मोकळेपणाने ठेवलेला विश्वास नात्याला मजबूतीची विण विणून नात अधिक घट्ट करतो
-
हरवू किती तुझ्यात स्वतःला
विसरू किती माझीच मला
मनवू किती या वेड्या मनाला
गुंतवू किती प्रितीच्या धाग्याला
थांबू किती त्या वाटेला,
नेई ती वाट मला तुझिया दिशेला,
विसरू नको तुझ्या वाद्याला
देशील ना नाव आपल्या नात्याला....?
-
ती तो नि सांज
सांजवेळी
ती अंतरमनात अविरत तेवणारी मंद ज्योत
तो मनगाभा-याला उजळवणारा दिव्य प्रकाश
ती तो नि सांज अस हे अलौकिक नातं
-
तुझ्या छळास मनात कोरून ठेवले आहे
मनास मी मनात आसक्ती ने डांबून ठेवले आहे...!
विश्वासघात करून प्रीतीचा गळा तू चिरला
मीलनाच्या घावांना मी ओलेच बांधून ठेवले आहे...!
उसवले धागे रेशमी नाजूक नात्याचे
प्रितीच्या हळुवार धाग्यात गुंफून ठेवले आहे...!
हास्य अवीट ते दुभांगते मनास ह्या
निरागसता आज पुन्हा भांबावून सोडले आहे...!
जळत्या हृदयाचे व्रण अजुन भळभळतेच आहेत
उमलत्या भावनेस नव्याने खुंटून टाकले आहे...!
उत्तुंग भरारी घ्यावी का प्रितीच्या खगाने प्रश्न सतावे
प्रेम पराला अंगारत छाटून टाकले आहे...!-
रक्षाबंधन विशेष..
आज खास दिवस..रिकामे खिसे..नारळीभात अन् पुरणपोळीचा घमघमाट ह्याने तो बैचेन झाला... सासुरवाशीण बहीण येणार म्हणून त्याने मोडकी कडी लावून घर प्राक्तन होताच सोडलं......बहीण सांज होईंपर्यंत त्याची वाट पाहून कडीला एक पत्र अडकवून गेली...
रात्री कडी उघडताना त्याला बत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशत ते पत्र दिसलं..पत्रात एक धागा होता ..अन् चार ओळी तो वाचू लागला.. भुकेली होते तुझ्या प्रेमाची अन् तुझ्या आशीर्वादाची...बाकी कशाचीच मोहताज नव्हते दादा..तुझ प्रेमच अगाध होत माझ्यासाठी...नकळतच नेत्रांना भरती येऊन गाली सरिता वाहू लागली....अन् त्याने रक्षाबंधनाच्या दिवशी
बहिणीच्या प्रेमाला अभिषेक घातला.....
-
उसावले धागे नात्यांचे सांधून पुन्हा पाहिले
विरळेल्या मनाला जोडून पाहिले,
गैरसमजाच्या भिंती त्या मोठ्या गाठी घट्ट होत्या
भिंती तोडून विश्वासाचेसामर्थ्य ओतून पाहिले...
सांधनार कसे धागे ते होते तुटके फुसके झालेले
जोडणार कसे मन संशयाच्या डोहात बुडून लुप्त झालेले,
गाठी त्या छोटया छोटया कश्याचाच ना तग ठेवती
विश्वासाचे प्रघळ ना घट्ट मत्त झालेले...
गहन प्रगल्भ विचारात गुंतून पाहिले
भवांश सारे व्रणांचे घावात गहिरे दिसले,
आक्रोश चित्कार मनाचा हूंदक्यात सामावला
काळजाचे भाव आज मनाला परके झाले...
लेखणी साथीला जाणिवांच्या साहाय्याने संवेदना लिहायच्या
वेदना दडपल्या गाभुळ मन त्यागाच्या जलात ओतून पाहिले,
भाव सारे लुब्ध मन ही क्षणासाठी स्तब्ध झाले
समर्पणवृत्ती तच नात्याचे सौरभ आज नव्याने उमगले...
-