आठवण
सांजवेळी येणार्या तूझ्या आठवणी
रात्री डोळ्यांनाही ओलावून जातात
आठवणींच्या कवेत तुझ्या
मनासही वेडावून जातात
अलगद सारे क्षण मग
नजरे समोर येतात
पहिल्या भेटीची आठवण
हळूच करुन जातात
भेटायला परत आता आतुर होते मन
आयुष्य तुझ्याशिवाय सरेल का रे पण?
-shahara_s-
माझा मार्ग, तुझा गोडवा,
पाषाणाला फुटेल मग उपळी.
तुझा मार्ग, माझा पावा,
काट्यालाही फुटेल मग कळी.-
आई ग तुझ्या कुशीतला स्पर्श.....
आईच्या मायेची महती कळवून गेला.....
आई तुझा प्रेमळ स्पर्श अदभुत आहे.....
आई तुझी ती कुश.....
तुझा तो मायेचा पहिला स्पर्श.....
लेकरांप्रतीची अपार माया.....
तुझ्या बाहुपाशातील स्पर्श....
सर्वांगावरून फिरवलेला मऊसर स्पर्श....
ह्याक्षणीही ताजातवाना सारखा भासत आहे....
जणु स्वर्ग प्राप्तीचा स्पर्श तो ......
आई तुझ्या मायेच्या स्पर्शाची अनुभूती अपरंपार आहे
आई तुझ्या मायेची महिमा अप्रतिम आहे......
-
तुझा सहवास....
तुझा सहवास हा मला आयुष्यभरासाठी हवा आहे.
तुझ्या सहवासात राहून एक नवं आयुष्य मला जगायचं आहे.
तुझ्या सहवासातील जे सुंदर क्षण आहेत त्या क्षणांना मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवायचं आहे.
तुझ्या सहवासाने हे आयुष्य असच बहरत ठेवायचं आहे.-
आसवे ओघळ ली अन्
ओंजळीत तुझ्या तु टिपले,
सहवासात असता तुझ्या
बोचरे क्षण ही हसले...-
मी तुझा तो आठवणींचा कोपरा,
अनवाणी रक्ताळलेल्या पावलांनी चालणारा..
तुझ्या विरहाची असते मला खरी साथ,
मांडल्या संसारावर मग मोडल्या संसाराची मात..
इथेच भेटते मला तुटलेपणाचे व्याकुळविश्व
पळू लागतात अश्रूंच्या धारा घेऊन विरहाचे अश्व..
उलघडा त्या प्रत्येक क्षणाचा इथेच तर होतो,
क्षणाक्षणात गुंतल्या मनाचा इथेच तर निवाडा होतो..
तुझ्या हृदयात दडला मीच तो आठवणींचा कोपरा,
सोबतीने माझ्या कर आयुष्यातील प्रत्येक क्षण साजरा..
-
तू शब्दात गुंततो
कवितेत उतरवतो
मनात दडून ठेवतो
कधी सर्वाना सांगतो
एकदा कधी सांगशील काय रे ..!!
त्या लिहिलेल्या प्रत्येक शब्दात
तू कुणाला रेखाटतो ??
कधी तरी मला माझ्या
समोरच म्हणशील काय ??
मी तुझा ..!-
मी वाट तुझी वळणा वळणाची,
तू पाऊलवाट माझ्या स्वप्नांची....
मी चांदणी तुझ्या कल्पनेतली,
तु चंद्र माझ्या कल्पकतेतला.....
मी ओघवणारी लाट तुझी,
तू विस्तीर्ण किनारा माझा.....
-
त्याचा हेवा वाटावा असं काहीच आता नयी
कारण प्रसंगच तसा घडला की वो ताई.
वाटावा म्हणलं होतं,
लग्नात आमच्या मेवा
मधेच आमच्या प्रेमाची गाडी,
पंक्चर झाली की रें भावा
आता कसला हेवा अन कसला मेवा
डोक्याला हात लावून बसने
एवढंच राहील की रें भावा...
🤐🙄😷🤕😄😆🤣-