~सागरिका🌊~   (~स्वप्नमयी💜~)
692 Followers · 43 Following

read more
Joined 29 March 2018


read more
Joined 29 March 2018
7 NOV 2021 AT 13:47

वयाचं मोजमाप बहुतांशी वाढणाऱ्या वर्षांपेक्षा अनुभवांमुळे जास्त असत...

-


26 JUL 2021 AT 18:53

Age is just a number अस आपण बरेचदा ऐकलय अन वाचलंय सुद्धा... आयुष्य जगताना अन छंद जपताना ते लागू होत सुद्धा... पण वयानुसार वाढत गेलेल्या maturity आणि अनुभवासाठी age is just not a number....काही गोष्टी ह्या प्रसंगानुरूप अनुभव देतातच पण बऱ्याचश्या गोष्टी वय आणि जगलेले दिवस शिकवतात....तुमच्या पेक्षा जास्त पावसाळे आम्ही पाहिले आहेत ते काही उगाचच नाही हे तेव्हा पटतच....

-


18 JUL 2021 AT 18:52

विचारांच्या पल्याड गोष्टी घडू लागल्या की
आपलं वागणं ही आचारांच्या पल्ल्याडच होतं जात...

-


18 JUL 2021 AT 11:22

आपलं मन हे शब्दांपेक्षा कैक अधिक पटीने
स्पर्शाला पारखं असतं...

-


16 JUL 2021 AT 10:17

डोळ्यासमोर असंख्य प्रश्नांचा गराडा.... कपाळावर हजार आठ्या अन मनात कैक प्रश्नचिन्ह....सगळ्याला बाजूला सारत स्वतःच्याच चेहऱ्यावरील चिमुकल हास्य स्वतःलाच प्रेरणा देऊन जात.... या हास्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा आयुष्य हजार प्रश्न करत असत अन आपण गोंधळात न पडता हास्याने त्याचा सामना करतो....

-


20 JUN 2021 AT 9:43

शोधायला गेलो तर ,
मावशीत आई मिळते
बहिणीतही आई मिळते अन
वहिनीतही आई मिळते...
मिळतं नाही तो "बापच"...
कोणत्याच नात्यात...
पितृदिनाच्या शुभेच्छा...

-


29 MAY 2021 AT 10:25

आठवणींचे प्रकार तरी किती? एक ना तर अनेक....काही व्यक्त होणाऱ्या असतात तर काही कायम मनात साठवून ठेवलेल्या ....काही आठवणी कायम आठवणीत असतात तर काही आठवणीत असूनही विसरल्याच निमित्त केलं जातं....
आठवणींना आयुष्य केवढं !
आपल्याच आयुष्याएव्हढं ....
मला वाटतं आयुष्य संपलं की
आठवणीही संपतातच आपल्या बरोबरच ....!!!

-


28 MAY 2021 AT 11:34

तश्या तर बऱ्याचदा करते मी आयुष्याच्याच गोष्टी
पण पण ,आयुष्याच्या गोष्टी करायला उद्या जर आयुष्यच नसेल तर?????

-


14 APR 2021 AT 12:55

एखादी गोष्ट जर हरवली असेल तर आपण तिला आपल्याला हव्यात्याच ठिकाणी वारंवार शोधत राहतो परिणामी ती वस्तू दुसऱ्या ठिकाणी मिळते जिथं आपलं लक्ष्यच जात नाही  आपण आपल्याच सोयी नुसार पाहत राहतो म्हणून .... आयुष्यातील सुख दुःखाचा काळ याला समर्पक म्हणावा वाटतो, आपण नेहमी सुख आणि दुःख हे आपल्याला पाहायच आहे त्याच तराजूत ठेऊन पाहतो.... त्यामुळे काही सुख ही "सुख" असूनही कधी कधी ती आपल्याला "दुःखा"समान वाटतात....

-


13 APR 2021 AT 14:13


बिना रंगाची जशी रांगोळी पूर्ण होत नाही
तसंच विना स्वप्नांचं आयुष्य अपूर्ण असतं......

-


Fetching ~सागरिका🌊~ Quotes