जगण्याची भाषा तशी थोडी क्लिष्टच
पण सुवाश्चीत अक्षरात तिला कोरावी लागतं....
तेव्हा कुठे अक्षरांची मनाशी तडजोड होवुन
शब्दातील अर्थ नि अर्थातील मर्म कळायला लागत....
-
जिथं हक्कं असूनंही मी,
समजूतदारपणाने मला हवं ते सोडूनं दिलं...
तडजोडं करूनं आयुष्याने,
मला बरचं काही शिकवलं...-
आयुष्यात पाहिजे ते जेव्हा मिळत नाही
तेव्हा तडजोड हा एकच पर्याय राहतो,
आणि या तडजोडी वरच आयुष्य काढावं लागतं.
प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात
जेव्हा मनासारखं काही होत नसेल
तेव्हा तडजोड करूनच आपल
आयुष्य जगत असतो.-
तडजोड केली तिने तिच्या स्वप्नांची,
तडजोड केली तिने तिच्या भावनांची,
तडजोड केली तिने तिच्या स्वभावाची,
पण तडजोड करू शकली नाही ती
तिच्या "स्त्रित्वाची"!!!...-
खर्या प्रेमासाठी केलेल्या तडजाेडीमध्ये,
दुसर्याच मनही जपता येते नि..©®MDK
स्वत:ला सुखही मिळते ! !-
संकटांशी तडजोड करून आयुष्य शमलेच नाही
रुसलेल्या क्षणांना मनवणे कधी जमलेच नाही
अपयशाच्या डोंगरात वळलेली वाट माझी
प्रयत्न करूनही विजयासाठी क्षण मुळी थांबलेच नाही
वाटलं होतं देव पावेल भाग्य घेऊन हाती
नशिबापुढे आकाश टेकलेले पुन्हा उठलेच नाही
उगवणारा दिवस रोज नित्याने मावळलेला
निराशेच्या गर्द सावलीत आशेला पान फुटलेच नाही
एक स्वप्न सोडून नव्याने दुसरे स्वप्न पाहण्या
त्यातच शेवटी आयुष्य कधी सरले कळलेच नाही-
मनाच्या या जडण घडणीत
एक कवडसा गावला
तडजोड त्याच्याशी करता
चंद्रच ओंजळीत आला
रंग लेखणी परिवार
उपक्रम : शब्द चारोळी
शब्द : तडजोड
02.03.2020..✍️
सौ.कल्पना रमेश हलगे ( वानरे )
-
समजूतदारपणाच्या नावाखाली
तडजोड केलेली असते
मनातली भावना मात्र
तीळ तीळ तुटत असते-