अमूल्य ठेवा शिवरायांच्या संस्कारांचा,
तू नुसताच जपून ठेऊ नको...
अंमल कर त्या विचारांवर...
आणि मग अभिमानाने मिरव,
शिवबांचा मावळा म्हणून.-
काहि कहाण्या अधुऱ्याश्या
मनात ठेवून बसले आहे...
ऐकण्या कोणी आपले येईल का
ही आस धरून बसले आहे...-
लिहीत होते एक कहाणी
राधाकृष्ण ह्या नावाची
थांबली नाही लेखणी माझी
कधी कोणत्याच अडथळ्यांनी....
नशीब माझं खराब होतं
शाई लेखणीतील संपली....
अन ही कहाणी अर्धीच राहून गेली
ठसे आठवणीचे उमटवून गेली....
अर्ध्या कहानीला पुसटसा अपूर्णविराम देऊन
मी ही कहाणी इथेच थांबवली....
पाणावलेल्या डोळ्यांनी,
भरलेल्या हृदयाने,
दाटलेल्या कंठाणे,
अन थरथरणाऱ्या हातांनी,
मी ही कहाणी,
कृष्णास सु्फूर्त केली...-
बाप...
शब्दात माझा बाप मला मांडता येईना,
प्रेम त्याचे माझ्या परी मापता येईना,
"हारून जाऊ नको आयुष्यात
नेहमी जोमाने उभी रहा...
वंशाचा दिवा नको पण ;
ह्या बापाचा कणा होऊन
उभी रहा "
हे शब्द त्यांचे मला प्रत्येक पावली
आणखी मजबुती देतात...
म्हणून तर ह्या मुलीला,
तिच्या बापाचं प्रेम शब्दात मांडता येईना...
प्रेम त्याचं तिच्या परी तिला मापता येईना...-
भावनेचा अस्त केला,
गुंतला धागा तोडला,
आता उरलेत फक्त अवशेष..
तुझ्या गोड आठवांचे......-
भावनेचा अस्त केला,
गुंतला धागा तोडला,
आता उरलेत फक्त अवशेष..
तुझ्या गोड आठवांचे......-
भावनेचा अस्त केला,
गुंतला धागा तोडला,
आता उरलेत फक्त अवशेष..
तुझ्या गोड आठवांचे......-
भावनेचा अस्त केला,
गुंतला धागा तोडला,
आता उरलेत फक्त अवशेष..
तुझ्या गोड आठवांचे......-
स्त्रीत्व
जोरात एक किंकाळी तिने ही फोडली असेल...
स्वरक्षण करण्या ती त्या दुष्टांशी एकटीच नडली असेल...
तिने त्या वेळी त्या दुष्टांच्या डोळ्यात ती हैवानियत पाहिली असेल...
त्या वेळी नक्कीच तिला द्वापारयुगातल्या कृष्णाची आठवण झाली असेल..
दुर्दैव तिचं अन आमचं ही,
अन्याय होण्या लागतो फक्त एक क्षण,
न्यायासाठी वाट पाहावी लागते वर्षानुवर्षे,
म्हणून सांगते....
चला सख्यानो जागृत व्हा...
स्वतःचा न्याय स्वतः करा...
दुर्गा, काली, झाशीची राणी..
आज तुमच्यात ही निर्माण करा...
दुष्टांचा संहार करून
आपल्या स्त्रीत्वाचा न्याय करा...
-
वेड लावून गेला
सहवास तुझा...
शोधून थकले
माझ्यात मी मला...
आरश्यात जरी पाहिलं स्वतःला
दिसते आकृती तुझीच मजला...
(प्रेम वेडी राधा कृष्णाच्या आठवणीत...)-